Wednesday, 19 December 2018

विज्ञान प्रदर्शन 2018 बातमी

*विनायक प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन महोत्सव 2018 संपन्न*

बीड--दि.19 सप्टेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे बीड तालुका गटशिक्षणाधिकारी श्री.मोराळे साहेब, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.जरांगे सर, विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते,जेष्ठ विस्तार अधिकारी श्री. पवार सर,क्षीरसागर सर,शिंदे सर,विनायक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सपकाळ सर, उपमुख्याध्यापक श्री.सपाटे सर, श्री. सचिन भोज सर,रामकुंड प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री.देवमाने सर,नवगण प्रा.शा.बीड चे मुख्याध्यापक श्री.वाघ सर, संभाजी प्रा.शा.शिवाजीनगर, बीड च्या मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम, अशोकनगर केंद्रप्रमुख श्री. पठाण सर,गटसाधन केंद्राचे श्री. पवार सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन महोत्सवाचे उदघाटन संपन्न झाले उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सपकाळ सर यांनी केले.याप्रसंगी शाळेतील मुला-मुलींनी वेगवेगळे प्रयोग सादर केले.विद्यार्थ्यांनी आपला कल्पक दृष्टिकोन लक्षात ठेवून पारंपरिक शेती व आधुनिक शेती तंत्र, पाणी आडवा पाणी जिरवा,हवेचे वेगवेगळे गुणधर्म,स्मार्ट सिटी, पवन ऊर्जानिर्मिती, सोलर ऊर्जा निर्मिती,हवेचे रॉकेट, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, मिक्सर बनवणे, कुलर बनवणे,जंगली प्राणी-पाळीव प्राणी, मातीचे उपयोग,कुंभारकाम, विविध शैक्षणिक शब्दांचे चार्ट, जीवनसत्वे, विविध फळांचे,आकाशगंगा, संगणक, चवीचे गुणधर्म,रंगकाम,अंक ओळख, दिशादर्शक यंत्र, भूकंपसूचक यंत्र, फुफ्फुस कार्य तपासणी यंत्र,पक्षी पकड यंत्र, पाण्याचे गुणधर्म, हवेला दाब असतो, मनोरंजनात्मक व कलात्मक असे वेगवेगळे प्रयोग या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दाखवून  प्रात्यक्षिक करून त्या प्रयोगाबद्दलची माहिती करून दिली. या विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा सहभाग खूप मोठा होता. या विविध प्रयोगाने विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटत होता. त्यांच्या कल्पनेला वाव व व्यासपीठ मिळवून दिले आनंददायी शिक्षणाचे महत्त्व, अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजते. आत्मविश्वासाने प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण करत होते. आपल्या शोधक कलेतून वैज्ञानिक, चिकित्सक वृत्ती या गुणांना वाव अशा विज्ञान प्रदर्शनातून निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.अभ्यासाची आवड, गोडी निर्माण होत असते. अत्यंत खेळीमेळीने,कुतहुलाने ही मुले आपले प्रयोग सादर करत होती. बीड चे गटशिक्षणाधिकारी श्री. मोराळे साहेबांनी विज्ञान प्रदर्शनातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रयोग मोठ्या कौतुकाने पाहत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची संपूर्ण माहिती घेऊन,विनायक प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या  विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन, केल्याने कौतुक केले.
  या सर्व विज्ञान प्रदर्शन महोत्सवासाठी शाळेतील सर्वश्री शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत कला सादर केल्या.




Saturday, 8 December 2018

लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्याविषयी विशेष मनोगत

*जयदत्त आण्णा क्षीरसागर एक कुशल नेतृत्व राजुरी(न) गावात जन्मलेले एक अतुलनीय व्यक्तीमत्व आपल्या कार्यामुळे जनतेच्या अविरतपणे असणाऱ्या प्रेमामुळे एक उमलत नेतृत्व उभा राहीले आहे.. बीड जिल्ह्यातील एक थोरले घर म्हणून या घराकडे पाहिले जाते... राजकारणाचे अनेक अष्टपैलू बाळकडू स्व. लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील लोकांच्या मना मनातील हृदयात पोहचलेल एक असामान्य व्यक्तिमत्व अविरतपणे विकास हाच ध्यास, विकास हाच धर्म, विकास हीच जात समजून सर्व समाजातील, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करत  आहे... आज पर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची व नोकरीची संधी उपलब्ध करणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर एक आजातपुरुष आहे... गजानन साखर कारखाना, गजानन सूतगिरणी, गजानन सहकारी बँक बीड बाजार समिती, बीड दूध संघ, पं. स.,जि. प. यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील आपल्या कौशल्याची ओळख करून देतात... निवडणुकीपूरते राजकारण व नंतर फक्त समाजकारण व विकास यासाठी त्यांचे विरोधी पक्षातील असूनसुद्धा त्यांना मानाचे स्थान असते... स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर आज बघितले तर अण्णासाहेबाकडे पाहावे लागेल.. आजही त्यांच्या नावाचा दबदबा, रुबाब कायम आहे.. अनेक मातब्बर नेते आज अण्णांच्या विचारांना मानतात, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच महत्वाचे असते.. लाखो लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात आण्णा सदैव बरोबर असतात..
हजारो लोकांच्या हाताला काम देणारा, हजारो लोकांच्या घरात उद्योगधंदे निर्माण करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध संधीचे सोने करणारे जयदत्त आण्णा यांचे निपुण भविष्यातील वेध घेणारे ध्येय साध्य करणारे ठरतात...आजच्या या परिस्थिती मध्ये आपल्या उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे भल्या भल्या
 राजकारणातील रथी, महारथीनां  आपल्या शांत व संयमी दूरदृष्टीने, चाणाक्ष पद्धतीने आपलेसे करणारे नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर आज जिल्ह्यातील धुरंधर लोकनेते आहेत... समाजातील वंचित ,उपेक्षीत लोकांच्या बरोबर असणारे, कार्यकर्त्याला बळ देणारे बीड जिल्ह्यातील लोकांच्याहृदयात आहेत... वादळे येतात..जातात पण क्षणभर सुद्धा आपल्या विकासाच्या ध्यासाचा वसा न सोडता आज ते मार्गक्रमण करत आहेत... संघर्ष, शक्ती, व संघटन कौशल्य आत्मसात असणारे अण्णा धुरंधर योद्धे आहेत...आपल्या बीड तालुका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रमुख असणाऱ्याकार्यकर्त्यांच्या नावांची तोंडपाठ ओळख असणारे व्यक्तिमत्व किती विलक्षण आहे हे दिसून येते... जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून विकासाचा हा महापुरुष आज समाज मनात व ग्रामीण जीवनात बदल घडवणारा अभियंता आमदार आहेत... आपल्या जनमानसातील स्वच्छ प्रतिमा, शांत व संयमी स्वभावाने ते नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात.. बीड जिल्ह्यातील विकासासाठी आपल्या कल्पक दूरदृष्टीने मोठं मोठे प्रकल्प हाती घेऊन जनतेच्या सेवेसाठी सामाजिक बांधीलकी समजून मोफत महाआरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमघेऊन सदैव ते प्रयत्नशील असतात...
क्षेत्र कोणतेही असो आम्ही विकासासाठी सदैव पुढे राहू ही भूमिका ठेवून त्यांची विकासाची गंगा वाहत असते... आजही क्षीरसागरांचा बंगला सदैव 24 तास जनतेच्या अडीअडचणी  सोडवणारा घरांचा दबदबा खूप काही प्रेरणा देतो.विकासाची ही गंगा वाहती ठेवून, आपल्या अथक, कल्पक दूरदृष्टी असणारे लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे कार्य खूप मोठे आहे..बीड शहराचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, डॉ.विठ्ठल क्षीरसागर,परिवारातील सर्व सदस्य अण्णांच्या पाठीमागे खंभीरपणे उभे आहेत... स्व.काकू नाना क्षीरसागर यांचा सक्षमपणे वारसा चालवणारे विकासाचे महामेरू जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांच्या वाढदिवसाच्याप्रसंगी त्यांच्या कामाचे मूल्यांकन शब्दात वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहे.. अशा शांत,संयमी सदैव तत्पर असणाऱ्या,  समाजसेवेचा  वसा, विकासाचा एकच ध्यास घेऊन सर्वसामान्यांच्या मना मनातील लोकनेता आ.जयदत्त(अण्णा) क्षीरसागर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*...
               🖋गव्हाणे विवेक

जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांचा वाढदिवसविशेष

*विनायक प्राथमिक शाळेत आ.जयदत्त (अण्णा) क्षीरसागरांचा वाढदिवस साजरा*....
  बीड- दि-7 डिसेंबर 2018  रोजी विनायक प्राथमिक शाळेत लोकनेते आ.जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले , शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कब्बडी, खोखो, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, प्रश्नमंजुषा, दोरीवरच्या उड्या, संगीतखुर्ची, अशा स्पर्धा झाल्या, या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व मुलांनी सहभागी होऊन प्राविण्य मिळवले.. या प्रसंगी झालेल्या बक्षीस वितरण समारंभातून बीड जिल्ह्याचे भाग्यविधाते आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव आ.जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री. भागडे सरांनी करून दिला.जयदत्त अण्णा म्हणजे एक कर्मयोद्धा.. आपल्या कामात सतत अग्रेसर.. आपल्या शांत व संयमी व्यक्तिमत्वाने जनतेच्या मनात राज्य करणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर सदैव विकास हीच जात, विकास हाच धर्म हे ब्रीद ठाणून जनतेच्या कल्यानाचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत .अण्णासाहेब हे एक अदभूत दूरगामी,शांत व संयमी व्यक्तिमत्व, स्व.खा केशरकाकू क्षीरसागर यांचा विकासाचा भगीरथ अविरतपणे चालवणारा कर्मयोद्धा, राजकीय ,सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रांतून जनतेचा आर्थिक विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस एक करताहेत हे अवघड काम सहज पेलावत आपल्या नावाचा दबदबा संबंध बीड जिल्ह्यातील लोकांच्या मना मनात अखंडपणे कायम ठेवून स्वाभिमान व रुबाबदार बाणा जपला आहे. आण्णासाहेबांच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात विनामूल्य शिक्षण घेत आहे. आज हजारो युवक याठिकाणी नोकरी करत आहेत.समाजातील प्रत्येक घटकावरती अण्णांचे विशेष लक्ष असते.त्यांच्या कल्पनेतून आज बीड जिल्हा विकासाच्या माध्यमातून प्रगती करत आहे हे अविरत काम करत आहेत येथुनपुढेही क्षीरसागरांचा बंगला सदैव आपल्यासोबत असेल या वाढदिवसाच्या प्रसंगी अण्णांना चांगले आरोग्य, तुम्ही आमचा आधारस्तंभ आहात, आपणांस दीर्घायुष्य लाभो.. ही प्रार्थना करते 68 व्या वाढदिवसाच्या तुम्हां सर्वांतर्फे, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी आपले विचार व्यक्त करून या वाढदिवसाप्रसंगी शाळेतील मुलांना बक्षीस, शैक्षणिक साहित्य वाटप करून जयदत्त अण्णांच्या जीवनकार्याची संपूर्ण माहिती आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केली.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक श्री.भारती सर,शिवलिंग क्षीरसागर, काळे सर,  काशीद सर, तकीक सर, चांदणे सर, श्रीमती भारती मॅडम,चौधरी मॅडम,वाघमारे मॅडम,म्हेत्रे मॅडम, मुंडे मॅडम, बावसकर मॅडम, चौधरी मनीषा मॅडम, रिता वाघमारे मॅडम, तन्वीर पठाण सर,गव्हाणे सर, गिराम सर, बहिरमल मॅडम, लेहणे सर, अजीजराजा शेख सर, पाटोळे सर, शहेबाज शेख सर,लक्ष्मण फुलमाळी मामा,चव्हाण लक्ष्मण, नईम पठाण सर यांनी जयदत्त ( अण्णा) क्षीरसागर यांच्या कार्याचा आपापला अनुभव शब्दामध्ये व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. शाळेतील सर्व मुलामुलींना फळांचे वाटप करण्यात आले. विविध शैक्षणिक साहित्य या वाढदिवसाच्या प्रसंगी सर्व मुलां मुलींना वाटप करून जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांचा हा 68 वा वाढदिवस खूप उत्साहात शाळेत संपन्न झाला.
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे खुप सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन भागडे सरांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीमती पवळ मॅडम यांनी मानले



Monday, 15 October 2018

15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम

*वाचनाने व्यक्तिमत्त्व घडत जाते, "वाचाल तर वाचाल"!..सौ.किर्तीताई पांगारकर*

दि-15 ऑक्टोबर या दिवशी विनायक प्राथमिक शाळा पेठ, बीड या शाळेत डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने वाचन-प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर प्रमुख पाहुणे श्रीमती बहिरमल मॅडम, चौधरी मॅडम, पवळ मॅडम, देशमुख मॅडम यांनी भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पि.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती, वाचन प्रेरणा दिनाचे महत्व श्री.गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम हे गरीब कुटुंबातील एक मुलगा परिस्थितीतुन पुढे येऊन शिक्षण घेऊन भारताच्या इतिहासात एक अजरामर व्यक्ती होऊन गेले असे आपल्या खास शैलीत तन्वीर पठाण सरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्व पटवून दिले. खडतर आयुष्यातून त्यांचे पायलट होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन झाले असे श्रीमती चौधरी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून वाचनाचे फायदे सांगितले. शिक्षण हे खूप महत्वाचे आहे. जो शिकेल तो वाचेल, वाचाल तर वाचाल, डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांना वाचनाची गोडी, छंद होता म्हणून आपल्या देशाचे वैज्ञानिक झाले, भारताच्या संरक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान खूप महत्वाचे होते. डॉ. कलाम यांचे कार्य खूप महान होते, आयुष्याच्या शेवटपर्यंत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिले,वाचनाने व्यक्तिमत्त्व घडत असते, डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांचे जीवन,आदर्श नक्कीच आपल्याला एक आदर्श देऊन जाते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले.. त्यांनतर मुलांना त्यांनी काही पुस्तके वाचण्यासाठी भेट दिली
  वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
  कार्यक्रमाचे खास सूत्रसंचालन श्री. भागडे सरांनी केले तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार श्रीमती पवळ मॅडम यांनी मानले.



Wednesday, 10 October 2018

सौ. किर्तीताई पांगारकर या स्व. गोविंदराव मचाले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी आदरभाव ...

*आमचे स्फूर्तिस्थान आधारवड आदरणीय स्व. गोविंदराव मचाले मामा यांच्या आठवणीने खूप गहिवरून येतेय.. तुमचे शैक्षणिक व सामाजिक काम खूप मोठे होते...क्षीरसागर व मचाले परिवारातील एक मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून मामा परिचित होते.. स्वभाव जरी वरून कडक वाटला तरी आतून प्रेमळ व शांत स्वभावाचे मामा होते..आयुष्याच्या शेवटपणे तुम्ही सतत आपल्या आदर्श शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सतत विद्यार्थी व शिक्षकांना व आम्हांला मार्गदर्शन करत होतात, अनेकांना तुम्ही खूप मदत केली स्व. काकूंच्या पाठीमागे भाऊ म्हणून खंभीर साथ तुम्ही दिली.. आपले हे अमूल्य कार्य आम्हाला सतत प्रेरणा देत जाईल.. तुम्ही चाललेल्या मार्गाने आम्ही पुढे चालू .. आजही जेंव्हा मी संस्थेच्या परिसरात जाते तेंव्हा तुमची खूप आठवण येते तुम्ही ऑफिस मध्ये आहेत असं वाटतं.. आजही तुमची उणीव आम्हांला नेहमी जाणवते..तुमचं अतुलनीय , कुशल मार्गदर्शन,विचार आमच्या साठी लाख मोलाचे असतील..सदैव तुम्ही माझ्या कायम स्मरणात राहाल, तुमचे आदर्श विचार आम्ही जपू..ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.. तुमच्या प्रेमळ, अतुलनीय शैक्षणिक कार्याला मी कोटी कोटी प्रणाम करते... आजही तुम्ही आमच्यात आहात.. तुमच्या पावन स्मृतिस भावपूर्ण विनम्र अभिवादन*..💐💐💐
        -----🖋सौ. किर्ती पांगारकर/साळुंके

स्व. केशरकाकू क्षीरसागर पुण्यतिथी कार्यक्रम

*स्व.केशरकाकू क्षीरसागर एक अनमोल व्यक्तीमत्व...सौ. किर्तीताई पांगारकर*
   दि.4 ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.बीड जिल्ह्याच्या माजी खा. केशरकाकू क्षीरसागर यांची 12 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रमुख शिक्षक यांच्या हस्ते स्व.केशरकाकू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.. प्रथम माजी खासदार स्व. केशरकाकू यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री.भागडे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.गिराम सर, श्री.भारती सर, श्री.पठाण सर ,श्री गव्हाणे सर श्रीमती चौधरी मॅडम, बहिरमल मॅडम यांनी स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर सादर केला, स्व. काकूंच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जडणघडणीत स्व .काकूंचा मोलाचा वाटा होता. आयुष्यभर त्या संघर्ष करत सामाजिक व राजकीय स्वतंत्र अस्तित्व त्यांनी आपले दाखवून दिले. गोरगरिबांची मुलं शाळेत शिकावी यासाठी त्यांनी खेडोपाड्यात शाळा सुरू केल्या आज हे शैक्षणिक जाळ खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. काकू नेहमी आपल्या शाळेतील अडचणी, प्रगती याबद्दल नेहमी विचारणा करायच्या.बीड जिल्ह्याच्या घराघरात काकू पोहचल्या होत्या. राजकीय, सामाजिक कार्यातून आपल्या स्वकर्तव्याने त्यांनी विविध संस्था, कारखाना, सूतगिरणी उभा केल्या यामागे काकूंचा दूरगामी विचार होता. स्व. केशरकाकू क्षीरसागर हे एक अनमोल व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे कार्य खूप महान होते.आज काकूंची 12 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी काकूंच्या आठवणींना उजाळा दिला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. गव्हाणे सरांनी केले तर आभार श्रीमती पवळ मॅडम यांनी मानले..

Tuesday, 2 October 2018

रंगभरण स्पर्धेत ताईंची उपस्थिती

आपल्या शाळेच्या या संकुलामध्ये आपण वेगवेगळे उपयोजनात्मक उपक्रम आपण राबवतो त्या पाठीमागे आपला हेतू फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठंतरी पुढे आले पाहिजे त्यांच्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना कुठंतरी संधी आपण पुढे उपलब्ध करून दिली तर नक्कीच ही मुले पुढे येऊन आपली कौशल्य दाखवतील म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या कल्पनेतून साकारलेली ही रंगभरण स्पर्धा खूपच चांगल्या प्रकारे पार पडली यामध्ये सौ. किर्तीताई पांगारकर या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चित्राला देणाऱ्या रंगाचे परीक्षण करून या लहान मुलांच्या आनंददायी या स्पर्धेमध्ये त्याही सहभागी होऊन आपल्या अंगी हातात असणाऱ्या रंगाच्या सुबक छटाना रंग देऊन या लहान लहान मुलांमध्ये बसून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये समरस झाल्या होत्या. विद्यार्थ्यांप्रति असणारी किर्तीताई यांची तळमळ,आपुलकी पाहून सर्व शिक्षक शिक्षिकाही या रंगभरण स्पर्धेमध्ये आनंदाने सहभागी होऊन या लहान मुलांच्या  रंगभरण स्पर्धेचा आनंद सर्वांनी मिळून द्विगुणित केला...

गणेशोत्सव रंगभरण स्पर्धा कार्यक्रम

*गणेशोत्सवा निमित्त रंगभरण स्पर्धा व क्रीडास्पर्धा संपन्न*..

दि-24/09/2018 बीड--विनायक प्राथमिक शाळेत गणेशोत्सवा निमित्त विविध शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व लहान मुलां- मुलींनी सहभाग घेतला. आपल्या सुंदर कल्पनेने मनमोहक रंग गणरायाच्या चित्रात देण्यासाठी तल्लीन होऊन प्रत्यक्ष गणपतीचे हुबेहूब रंगछटा चित्रास देऊन आपले कौशल्य दाखवत होती या रंगभरण स्पर्धेचे परीक्षण आदरणीय मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर,श्री.भारती सर,जमाले सर,गिराम सर,पठाण तन्वीर सर,गव्हाणे सर, भागडे सर, चौधरी मॅडम, पवळ मॅडम, बहिरमल मॅडम यांनी केले.या रंगभरण स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सौ. किर्तीताई यांनी सुद्धा या रंगभरण स्पर्धेत स्वतः भाग घेऊन गणरायाच्या प्रतिमेस आपल्या कल्पक, रंगानी रंग दिला. अशाप्रकारे हा अतिशय आगळावेगळा उपक्रम विनायक प्राथमिक शाळेत राबवून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या अंगी असलेले कल्पक उपजत गुण यांना संधी उपलब्ध करून हा शालेय उपक्रम कार्यक्रम स्पर्धा खूप उत्साहात संपन्न झाला...

अभिनंदन व शुभेच्छा पठाण तन्वीर सरांना

शिक्षण या पवित्र क्षेत्रात काम करत असताना कळत नकळत विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे शिक्षक खूप महत्वाचे असतात..शिक्षक म्हटलं की अंगात भीती वाटत असायची आज आनंददायी शिक्षणाबरोबर ज्ञानरचनावाद व मनोरंजनातून शिक्षण द्यावे लागते त्या भूमिका त्या कल्पना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी शिक्षकाचे कौशल्य खूप महत्वाचे असते .असेच विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथील शिक्षक त्यांच्या कामाचे कौतुक करावे ते थोडे होईल.अंगामध्ये असणाऱ्या उपजत कलांना ओळखून त्या प्रत्यक्षपणे अनुभवातून प्रगट करून दगडाला आकार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारा शिक्षक खूपच महत्वाचा आहे.परिस्थिती कशीही असुद्या पण सक्षमपणे पेलवण्याची टाकत ठेवतो तो शिक्षक खूपच महत्वाचा वाटतो.
     आमच्या शाळेतील पठाण तन्वीर सर हे एक अनमोल रसायन आहे.विविध प्रकारच्या कला गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या आपल्या शिक्षक सहकाऱ्यांचे कौतुक करावे ते थोडे असेल..अंगी , मनी एकच ब्रीद व तळमळ लक्षात घेता त्याप्रमाणे हसत खेळत विद्यार्थी हे आपले दैवत समजून पूर्णपणे त्यामध्ये झोकून देणारा व्यक्ती आम्ही जवळून बघितलाय.
 अशा या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याची नोंद घेऊन वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण असणारे व्यक्तिमत्व खूप उजळावे, हर्षावे, उंच उडावे म्हणून सतत कलात्मक प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रामधून सामाजिक ,शैक्षणिक योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या यशातील बक्षीस असते.
    तन्वीर पठाण सर एक हुशार व हजरजबाबी माणूस खूप महत्वाचा आहे त्यांना वेगवेगळया सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार आणखी बळ वाढवणारे असते. तन्वीर पठाण सरांना आपल्या अल्पावधीच्या कालावधीतून मिळालेले पुरस्कार हे यशाचे लाखमोलाचे आहेत.सतत विद्यार्थी व तन्वीर पठाण सर हे आपल्या कामावर  मन लावून लहान होऊन आनंद घेत असतात.
    या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना अत्यंत प्रभावीपणे आपल्या कौशल्याने आत्मविश्वासाने समरस होऊन विद्यार्थी दैवताच्या पूजनेसाठी नवनवीन सहशालेय उपक्रमाची व अभ्यासाची गोडी लावणारा अवलिया खूपच प्रेरणादायी असतो.
   तन्वीर पठाण सरांच्या या अनमोल योगदानाबद्दल त्यांचे संपूर्ण जीवनप्रवास शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही .अनेक व्यक्तीच्या नावाने दिले जाणारे आदर्श पुरस्काराचे मानकरी आम्हां सोबती लाभले याचा सार्थ अभिमान आम्हांस वाटतो.
  त्यांची प्रेरणा, मार्ग, दिशा  ही समर्थपणे चालवण्यासाठी आम्हांस ती प्रेरक ,दिशादर्शक ठरेल यांचा आम्हाला हेवा वाटतो म्हणून त्यांच्या शैक्षणिक कार्यांचा हा लेखाजोखा याचे बक्षीस म्हणजे त्यांना मिळालेले विविध आदर्श शिक्षक पुरस्कार हे त्यांचे भाग्य कर्म यांचे यथार्थपणे स्वीकारलेले अंगीकृत असे बक्षीस वाटते...
    त्यांच्या या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानांकन दिलेल्याव त्यांना निवडलेल्या विविध प्रतिष्ठानचे कौतुक करावे ते थोडे असेल..
अशा हुरहुन्नरी व हसमुख व्यक्तित्वास पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!
   
                   🖋 श्री विवेक गव्हाने सर

पुरस्कार अभिष्टचिंतन, पठाण तन्वीर सर

श्री. पठाण तनवीर बाबासाहेब
 आदर्श  शिक्षण संस्था,बीड विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड  येथे गेल्या 13 वर्षापासून सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे.     ही शाळा स्व.खा. केशरकाकू क्षीरसागर यांनी लावलेलं रोपटे तिचा वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आ. जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब यांच्या आशीर्वादाने या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही शाळा प्रगतीपथावर आहे या शाळेत पेठ भागातील गरीब कुटुंबातील मुलं मुली शिक्षण घेत आहे या मुलांचे आई वडील मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात त्याशिवाय त्यांच्या घरातील चूल पेटत नाही हे शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांना  माहिती आहे म्हणून मुख्याध्यपिका किर्तीताई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत, शाळेत आली पाहिजे त्यांची जी काही अडचणी असतील त्या आपण सोडवू त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करू हे एक अवघड होते पण हे काम शाळेतील शिक्षक  पठाण तन्वीर बाबासाहेब यांनी  विविध स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या सर्व मुलांना शालेय साहित्य मिळवुन दिले
   शाळेत कार्यरत झाल्या पासून
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड ,सतत पालक संपर्क करून मा मुख्यध्यापिका कीर्ती ताई पांगारकर याचा मार्गदर्शनाने व सहकार्याच्या मदतीने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवली.वृक्षारोपण, प्रत्यक्ष मूर्ति कशी बनवतात प्रत्यक्ष पाहणी करून विदयार्थ्यांना उद्योग कौशल्याची माहिती दिली. वेगवेगळ्या संकल्पना शाळेत राबवुन त्या प्रत्यक्ष पणे साकारण्यासाठी धरपड करत विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव दिला.शिक्षणाच्या या प्रवाहात कुणीही वंचीत राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी
कुलूप सारख्या लघुचित्रपट निर्माण करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्वांसमोर मांडला या चित्रपटास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. शाळेमध्ये विविध उपक्रम मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी सदैव तत्पर असतात.
दन्त शिबीर,सामाजिक प्रबोधन कार्यक्रम,कब बुलबुल पथकाचे संचालन,सलग दोन वर्षे क्रमांक1,2 पटकावला.शाळेत सहकार्याच्या मदतीने विविध संस्थेचे कार्यक्रम शाळेत राबवले.रोटरी क्लब,सेवाभावी संस्था, व स्वखर्चातून मुलांन साठी शालेय साहित्यची मदत केली.या
 कार्याची दखल घेऊनअनेक संस्थांनी  त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे , त्यांच्या कार्याचा हा आलेख उंच उंच गगनभरारी घेत आहे म्हणून आज पुन्हा त्यांच्या यशस्वी कार्याची सामाजिक उपक्रमाची कामगिरी बघून शिक्षण क्षेत्रातील हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती


*सत्य, अहिंसेचे, पुरस्कर्ते महात्मा  गांधीजी थोर राष्ट्रपिता होते--सौ. किर्तीताई पांगारकर*

बीड-दि-२ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा पठाण तन्वीर सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले, भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून श्री. गव्हाणे सरांनी त्यांचे कार्य व्यक्त केले.गांधीजी हे एक अनमोल रत्न भारतास लाभले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती श्रीमती चौधरी मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत श्री . जमाले सरांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले.सत्य, अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधीजी राष्ट्रपिता होते, महात्मा गांधींच्या जीवनातील भारताच्या स्वतंत्र चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहेत त्यांचे कार्य खूप मोठे होते गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लाभले, या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. भागडे सर यांनी केले तर आभार श्रीमती बहिरमल मॅडम यांनी मानले..

Monday, 24 September 2018

आदर्श शिक्षक

तन्वीर पठाण सर...
    शिक्षण या पवित्र क्षेत्रात काम करत असताना कळत नकळत विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे शिक्षक खूप महत्वाचे असतात..शिक्षक म्हटलं की अंगात भीती वाटत असायची आज आनंददायी शिक्षणाबरोबर ज्ञानरचनावाद व मनोरंजनातून शिक्षण द्यावे लागते त्या भूमिका त्या कल्पना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी शिक्षकाचे कौशल्य खूप महत्वाचे असते .असेच विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथील शिक्षक त्यांच्या कामाचे कौतुक करावे ते थोडे होईल.अंगामध्ये असणाऱ्या उपजत कलांना ओळखून त्या प्रत्यक्षपणे अनुभवातून प्रगट करून दगडाला आकार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारा शिक्षक खूपच महत्वाचा आहे.परिस्थिती कशीही असुद्या पण सक्षमपणे पेलवण्याची टाकत ठेवतो तो शिक्षक खूपच महत्वाचा वाटतो.
     आमच्या शाळेतील पठाण तन्वीर सर हे एक अनमोल रसायन आहे.विविध प्रकारच्या कला गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या आपल्या शिक्षक सहकाऱ्यांचे कौतुक करावे ते थोडे असेल..अंगी , मनी एकच ब्रीद व तळमळ लक्षात घेता त्याप्रमाणे हसत खेळत विद्यार्थी हे आपले दैवत समजून पूर्णपणे त्यामध्ये झोकून देणारा व्यक्ती आम्ही जवळून बघितलाय.
 अशा या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याची नोंद घेऊन वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण असणारे व्यक्तिमत्व खूप उजळावे, हर्षावे, उंच उडावे म्हणून सतत कलात्मक प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रामधून सामाजिक ,शैक्षणिक योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या यशातील बक्षीस असते.
    तन्वीर पठाण सर एक हुशार व हजरजबाबी माणूस खूप महत्वाचा आहे त्यांना वेगवेगळया सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार आणखी बळ वाढवणारे असते. तन्वीर पठाण सरांना आपल्या अल्पावधीच्या कालावधीतून मिळालेले पुरस्कार हे यशाचे लाखमोलाचे आहेत.सतत विद्यार्थी व तन्वीर पठाण सर हे आपल्या कामावर  मन लावून लहान होऊन आनंद घेत असतात.
    या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना अत्यंत प्रभावीपणे आपल्या कौशल्याने आत्मविश्वासाने समरस होऊन विद्यार्थी दैवताच्या पूजनेसाठी नवनवीन सहशालेय उपक्रमाची व अभ्यासाची गोडी लावणारा अवलिया खूपच प्रेरणादायी असतो.
   तन्वीर पठाण सरांच्या या अनमोल योगदानाबद्दल त्यांचे संपूर्ण जीवनप्रवास शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही .अनेक व्यक्तीच्या नावाने दिले जाणारे आदर्श पुरस्काराचे मानकरी आम्हां सोबती लाभले याचा सार्थ अभिमान आम्हांस वाटतो.
  त्यांची प्रेरणा, मार्ग, दिशा  ही समर्थपणे चालवण्यासाठी आम्हांस ती प्रेरक ,दिशादर्शक ठरेल यांचा आम्हाला हेवा वाटतो म्हणून त्यांच्या शैक्षणिक कार्यांचा हा लेखाजोखा याचे बक्षीस म्हणजे त्यांना मिळालेले विविध आदर्श शिक्षक पुरस्कार हे त्यांचे भाग्य कर्म यांचे यथार्थपणे स्वीकारलेले अंगीकृत असे बक्षीस वाटते...
    त्यांच्या या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानांकन दिलेल्याव त्यांना निवडलेल्या विविध प्रतिष्ठानचे कौतुक करावे ते थोडे असेल..
अशा हुरहुन्नरी व हसमुख व्यक्तित्वास पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!

गणेशोत्सवा निमित्त विविध शालेय स्पर्धा, रंगभरण स्पर्धेचे आयोजन...

आपल्या शाळेच्या या संकुलामध्ये आपण वेगवेगळे उपयोजनात्मक उपक्रम आपण राबवतो त्या पाठीमागे आपला हेतू फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठंतरी पुढे आले पाहिजे त्यांच्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना कुठंतरी संधी आपण पुढे उपलब्ध करून दिली तर नक्कीच ही मुले पुढे येऊन आपली कौशल्य दाखवतील म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या कल्पनेतून साकारलेली ही रंगभरण स्पर्धा खूपच चांगल्या प्रकारे पार पडली यामध्ये सौ. किर्तीताई पांगारकर या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चित्राला देणाऱ्या रंगाचे परीक्षण करून या लहान मुलांच्या आनंददायी या स्पर्धेमध्ये त्याही सहभागी होऊन आपल्या अंगी हातात असणाऱ्या रंगाच्या सुबक छटाना रंग देऊन या लहान लहान मुलांमध्ये बसून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये समरस झाल्या होत्या. विद्यार्थ्यांप्रति असणारी किर्तीताई यांची तळमळ,आपुलकी पाहून सर्व शिक्षक शिक्षिकाही या रंगभरण स्पर्धेमध्ये आनंदाने सहभागी होऊन या लहान मुलांच्या  रंगभरण स्पर्धेचा आनंद सर्वांनी मिळून द्विगुणित केला...
*गणेशोत्सवा निमित्त रंगभरण स्पर्धा व क्रीडास्पर्धा संपन्न*..

दि-24/09/2018 बीड--विनायक प्राथमिक शाळेत गणेशोत्सवा निमित्त विविध शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व लहान मुलां- मुलींनी सहभाग घेतला. आपल्या सुंदर कल्पनेने मनमोहक रंग गणरायाच्या चित्रात देण्यासाठी तल्लीन होऊन प्रत्यक्ष गणपतीचे हुबेहूब रंगछटा चित्रास देऊन आपले कौशल्य दाखवत होती या रंगभरण स्पर्धेचे परीक्षण आदरणीय मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर,श्री.भारती सर,जमाले सर,गिराम सर,पठाण तन्वीर सर,गव्हाणे सर, भागडे सर, चौधरी मॅडम, पवळ मॅडम, बहिरमल मॅडम यांनी केले.या रंगभरण स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सौ. किर्तीताई यांनी सुद्धा या रंगभरण स्पर्धेत स्वतः भाग घेऊन गणरायाच्या प्रतिमेस आपल्या कल्पक, रंगानी रंग दिला. अशाप्रकारे हा अतिशय आगळावेगळा उपक्रम विनायक प्राथमिक शाळेत राबवून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या अंगी असलेले कल्पक उपजत गुण यांना संधी उपलब्ध करून हा शालेय उपक्रम कार्यक्रम स्पर्धा खूप उत्साहात संपन्न झाला...

Friday, 7 September 2018

रक्षाबंधन


*बहीण व भाऊ हे बंधन खूपच प्रेमाचे* :किर्तीताई पांगारकर
 बीड :  बीड मधील विनायक  प्राथमिक शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते सरस्वती चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  या प्रसंगी रक्षाबंधनाचे महत्व  गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.शाळेतील मुलींनी मुलांना राखी बांधून औक्षण केले.बहीण व भावाचे अतूट नाते या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त समृद्ध होते असे आपल्या मनोगतातून श्री. भागडे सरांनी व्यक्त केले. बहीण व भाऊ हे बंधन खूपच प्रेमाचे, आपुलकीचे,मायेचे असते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण नेहमी रक्षाबंधनाच्या प्रसंगी प्रार्थना करते,भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी राखी बांधून घेत तिच्या पाठीमागे खंभीरपणे उभा राहण्याचा संकल्प करतो असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व मुला-मुलींना राखीपोर्णिमेच्या शुभेच्या दिल्या. 
    याप्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्री. भारती सर, चौधरी मॅडम, गिराम सर, जमाले सर, पठाण नईम सर, पवळ मॅडम, बहिरमल मॅडम, देशमुख मॅडम,फुलमाळी मामा, यांचे सहकार्य लाभले.
    कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पठाण तन्वीर सर यांनी केले तर आभार पवळ मॅडम यांनी मानले.



गुरू तुमचा वारसा आम्ही पुढे चालवू..

गुरू तुमचा वारसा, आम्ही पुढे चालवू....सौ.किर्तीताई पांगारकर

बीड-दि.5 सप्टेंबर--- विनायक प्राथमिक शाळेत शिक्षक दिन हा  उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक श्री. काळे सर, उगले सर,आदर्श शिक्षक पठाण सर, जमाले सर, गिराम सर, भारती सर यांच्या हस्ते करण्यात आले.या शिक्षक दिनाचे महत्व,  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री. गव्हाणे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेतील छोट्या छोट्या मुलां-मुलीनी,चि. शेख समीर, अनेराव आदिनाथ,घोडके तेजस, शेख अजमत या मुलांनी शिक्षक दिना प्रसंगी आपल्या शिक्षकांप्रति आदर,भावना व्यक्त करून, शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छागुच्छ देऊन स्वागत केले.विविध मुला- मुलींनी आपल्या शिक्षकांप्रती आदरभाव आपल्या भाषणातून व्यक्त करून उपस्थीत मान्यवरांकडून कौतुकाची थाप मिळवली, शिक्षकांचा आदर आपण सन्मानाने करतो कारण संस्कार व जगण्यासाठी विनम्रता आपल्या अंगी बिंबवण्याचे काम शिक्षक करतात आपल्या प्रमुख विचारांतून श्री.काळे सरांनी व्यक्त केले, आयुष्याच्या सुरुवातीपासून दिशा, मार्ग, संस्कार, शिस्त व कल्पना अंगी बाळगून शिक्षक सदैव परिश्रम घेत असतात त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणे हे मी कर्तव्य समजतो आपल्या  मार्गदर्शन भाषणांतून श्री. तन्वीर पठाण सरांनी विचार व्यक्त केले. गुरुशिवाय आपण काहीच नाहीत, जीवनाच्या प्रवासात आई वडिलांबरोबर प्रमुख गुरू म्हणून शिक्षक असतात, कुंभार जसा चिखलाला आकार देऊन जसा घडवतो तसा शिक्षक मुलांना चांगले शिक्षण, शिस्त, मार्गदर्शनरुपी आकार देऊन घडवीत असतो , मी जे घडले त्या माझ्या गुरुवर्यामुळे म्हणून त्यांचा हा  वारसा प्रामाणिकपणे पुढे चालवू असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी  आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व शिक्षकांना  शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्या व्यक्त केल्या..   
     हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्वश्री, बहिरमल मॅडम, पवळ मॅडम , नईम पठाण सर,देशमुख मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. भागडे सरांनी केले तर चौधरी मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून सर्व शिक्षक बांधवाना शिक्षक दिनाच्या शुभेच्या व्यक्त केल्या...






Wednesday, 1 August 2018

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विनायक प्राथमिक शाळेत साजरी

*विनायक प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*..
   या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यपिका सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री. भागडे सरांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा सांगितला, त्यानंतर विविध लहान मुलां- मुलींनी या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. गव्हाणे सरांनी लोकमान्य टिळकांची राष्ट्रभक्ती, त्याग, प्रगल्भता, आक्रमकपणा, स्वाभिमानी बाणा या टिळकांच्या पैलूंवर प्रकाश टाकला तर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र लेखन, शाहीर, लोककला मातंग समाजातील यथार्थ चित्रण, शैक्षणिक, सामाजिक धोरण, अंगी असणारी शाहीरीतुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रवृत्त करणारी लेखनशैली खूप प्रेरणादायी आहे असे आपल्या भाषणांतून व्यक्त केले, त्यानंतर श्री. तन्वीर पठाण सरांनी आपल्या खास शैलीत दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनातील वास्तवता त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले,चौधरी मॅडम यांनी टिळकांच्या बाणेदारपणा व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील गोष्टी बालकांना सांगून,टिळक व साठे यांचे चित्र डोळ्यासमोर आणून मार्गदर्शन केले,त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून, या महान व्यक्तिमत्वाच्या प्रभावी जीवनकार्याचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांच्या समोर उभा केले, टिळकांचा जहाल विचार व केलेले संघटन देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रेरक ठरले, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण, गरीबी, यामधून पुढे येऊन समाज जागृत करण्यासाठी लेखन कला, शाहीरी, कथा-कादंबऱ्या, पोवाड्याच्या माध्यमातून समाज जीवनाचं वास्तव दर्शन विशद केले,दोन्हीही या महान व्यक्तीला अभिवादन करून मनोगत व्यक्त केले.
   या पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. भारती सर, श्री जमाले सर, फुलमाळी लक्ष्मण यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन पवळ मॅडम यांनी केले तर आभार श्री.नईम पठाण यांनी मानले....





Wednesday, 25 July 2018

गुरुपौर्णिमेच्या कृतज्ञता

*स्फूर्तीच्या अखंड खळखळणाऱ्या प्रेरणादायी झऱ्यामुळे विनायक प्राथमिक शाळेची उत्तुंग वटवृक्षाकडे वाटचाल*
      आज गुरूपोर्णिमेच्या दिवशी आमच्या गुरुतुल्य मुख्याध्यापिका विषयी कृतज्ञता व्यक्त करत आहोत गोरगरिबांच्या मुलांसाठी,सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून स्व. खा.केशरकाकू क्षीरसागर यांनी लावलेलं हे छोटेशे रोपटे आ.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर,डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विनायक प्राथमिक शाळा आज शैक्षणिक पातळीवर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील एक नामांकीत शैक्षणिक माहेरघर असणारा वटवृक्ष आज प्रगतीचे उत्तुंग यश संपादन करून वाटचाल करत आहे, शाळेमध्ये विविधांगी उपक्रम राबविले जातात. बालकांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून विविध परीक्षा, काव्यगायन, प्रश्नमंजुषा, खेळ, नाट्य,  विविध कला, चित्रकला या उपक्रमाचे आवर्जून आयोजन केले जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका ताई स्वतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव आव्हानात्मक अडचणींचा सामना करत या गोर गरिबांच्या मुला- मुलींसाठी सदैव तत्पर असतात. या मुलांच्या शिक्षणासाठी कोणताही उपक्रम राबविण्यात खर्चाची कधीही पर्वा करत नाही. आपला आनंद या गरीब मुलांच्या शिक्षणात आहे. आयुष्यात जे काही करता येईल तेव्हढे आपल्याला या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून मिसळून केले पाहिजे हे ताईचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देणारे त्यांचे विचार आम्हाला खूप खूप स्फूर्ती ,शक्ती देतात,या आदर्शाने, विचाराने आमच्या मनात स्फूर्ती येते शाळेसाठी झोकून द्यावे वाटते...
या आयुष्यात काय सोबत आपल्या येणार आहे या छोट्या छोट्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण झोकून देऊन ज्ञानदानाचे  पवित्र कार्य यापेक्षा काय मोठे काम आहे असे नेहमी ताई सर्व शिक्षकांना सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. शालेय  स्तरांवर या मुलांसाठी वेगवेगळ्या योजनेखाली आपल्याला काय मदत करता येईल यामागे त्या खंभीर पाठपुरावा करत असतात.शाळेत विविध बौद्धिक क्षमता विकसीत होण्यासाठी उपयोजनात्मक उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात नेहमी अग्रेसर असतात, शाळा हे एक मंदीर आहे आपण त्याचे कळस आहोत ही भूमिका ताई आम्हांला नेहमी सांगत असतात आम्ही मोठ्या कौतुकाने ऐकुन पुढील कर्तव्य बजावण्यात एक वेगळाच आनंद मिळतो यांच्यासारखे दुसरे कार्य काय असेल?
आमच्या शालेय  योगदानाचा पुरेपूर आढावा आमच्या ताई घेत असतात .
शाळेतील कोणत्याही प्रकारची अडचणी आमच्या ताई सदैव सोडवण्यास तत्पर असतात. कुणाचे सुख असो वा दुःख सदैव खंभीरपणे आधार देतात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
 जीवनात बरेच लोक भेटतात परंतु जीवनाचे सार्थक करण्यासाठी इतरांचे आयुष्य फुलवण्यासाठी अविरत साथ लाभते त्या ताईच्या व्यक्तिमत्वाने सर्व  शाळा ही उजळून निघते याचा आम्हांला खूप हेवा वाटतो..
     या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कल्पक अभ्यासिका तुम्ही वापरा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तुमच्या पाठीमागे खंबीर उभी असेल असे आमच्या ताईचे विचार आमच्या हृदयाला भावतात आणि म्हणून विनायक प्राथमिक शाळा आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.त्यांच्या अथक,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील,गोर गरीब, लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल आजच्या या खास गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या गुरुतुल्य मुख्याध्यापिका विषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते...आदरणीय किर्तीताई व,सर्व गुरुवर्यानां गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....
                   ----- सर्व शिक्षक,
                      *विनायक प्रा. शाळा,पेठ बीड*

Monday, 16 July 2018

विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते मोफत शालेय गणवेश वाटप संपन्न

*विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न*
   विनायक प्राथमिक शाळेत मोफत गणवेश वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात  मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आदरणीय किर्तीताई पांगारकर या लाभल्या , सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून श्री. गव्हाणे सरांनी शालेय गणवेश वाटपाच्या कार्यक्रमाचा उद्देश, महत्व भूमिका मांडली, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय किर्तीताई पांगारकर यांनी शाळेतील गरीब, वंचित, पीडित दुर्बल घटकातील,शाळेतील नवीन प्रवेशीत  विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील मुला मुलींना मोफत शालेय गणवेश वाटप करून विद्यार्थ्यांना आपल्या मौलिक मनोगतातून  शालेय गणवेश, शिस्त, महत्व याबद्दल यथोचित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षातील ध्येय व उद्दीष्ठे, उपक्रम नियोजन आढावा घेऊन विदयार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शाळेतील सर्व मुला मुलींना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. जमाले सर,भारती सर, गिराम सर,नइम पठाण सर, चौधरी मॅडम, बहिरमल मॅडम, पवळ मॅडम, देशमुख मॅडम फुलमाळी लक्ष्मण यांचे मोलाचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन भागडे सर यांनी केले तर आभार श्री. तन्वीर पठाण सर यांनी मानले


Friday, 27 April 2018

एक सत्य...

प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच.... ______________________________

     कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
        मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.... त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.
       *सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.*
     *त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही.*
      *तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.*
     *यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. ' हेचि फल काय मम तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.*
      *कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.*
             *आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.*
           *शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू  शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे.*

Monday, 2 April 2018

राजकारण

*राजकारण करायचे असल्यास युवा नेते बनण्यापूर्वी निदान स्वतःच्या दोन वेळच्या भाकरीची तजवीज करून ठेवा...*

व्याजाने पैसे आणून कितीही मोठ मोठाले होर्डिंग्ज लावले तरी घरी कुणीही धान्य आणून देत नसतं...

तुमची उपयुक्तता संपली की तुम्हाला तुमचे आदर्श नेते खरूज लागलेल्या कुत्र्याप्रमाणे फाटकाबाहेर हाकलून देतील...

तुम्ही हातात मोठ्या अभिमानाने मिरविलेले पिवळे भगवे, निळे आणि हिरवे झेंडे तुमच्या अवस्थेवर खो खो हसतील...

नोकरी किंवा व्यवसाय नसलेल्या तरुणांचा भविष्यकाळ अत्यंत बिकट असणार आहे...

जे लोक तुम्हाला करियर डेव्हलपमेंटच्या गोष्टी सांगतात, ते स्वतःच कुणाची तरी भाड खाऊन कुटुंबनिर्वाह करतात...
कुणी आपला स्वाभिमान विकलेला आहे, कुणी कळलाव्या नारदाची भूमिका बजावत आहे, अशा वाममार्गानेच तुमचे आवडते नेते पैशांनी गब्बर झालेले आहेत व येथून पुढे राजकारण हे त्यांच्याच अवती भवतीच फिरणार आहे...

पक्ष, पक्ष- संस्कार, पक्षाची विचारधारा या निव्वळ पोकळ गप्पा असून या भाकडकथा तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना फुकटात राबवून घेण्यासाठीच रचलेल्या आहेत...

जेवढा वेळ आपण नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवितो, तेवढ्या वेळात एखाद्या कपड्याच्या दुकानात काम करून महिन्याकाठी ५ ते १० हजार रुपये कमवून आपण आपल्या आई वडिलांच्या हाती देऊ शकत असू, तर या जगात आपल्यापेक्षा मोठा विकासपुरुष अन्य कुणीही असू शकत नाही...

आपल्या एकामुळे जगाचे काहीही बरे-वाईट होत नाही. आपण स्वतःचा विकास केल्यास राष्ट्राचा विकास आपोआप होतो. ५० लाखांच्या गाडीत हिंडणाऱ्या व्यक्तीस गरीबाशी, बेरोजगाराशी काहीही देण घेण नसतं, तो फक्त आपला स्वार्थ जपत असतो. त्यामुळे आपली घरची परिस्थिती बेताची असल्यास नेत्यांच्या अजिबात मागे लागू नका...

आपल्याला पुढे आर्थिक चणचण, शुगर, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, राजकारणाच्या नादी लागून फुकटचे विकत घेतलेले शत्रुत्व व बेरोजगारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, जेव्हा तुमचे आवडते नेते तुम्हाला १ रुपयाची सुद्धा मदत करणार नाही...

तुमचं तारुण्य निघून गेल्यावर कुणीही तुम्हाला दारू पाजणार नाही किंवा मटन खाऊ घालणार नाही, कारण तुमचा उपयोग संपल्यावर अन्य कुणी तरी दुसरा मूर्ख तरुण रिक्रुटमेंटसाठी कायम नेत्यांपुढे तयार असेलच. मग चोरी, गुन्हेगारी किंवा आत्महत्या या तीन पर्यायांखेरीज अन्य कुठचाही पर्याय तुमच्याजवळ शिल्लक नसेल...

स्वतःला सावरून आयुष्य संपन्न बनविण्याचे हेच वय असते. हे वय नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवू नका...

Thursday, 29 March 2018

शाळेस पत्र

प्रिय शाळेस...

ओळखलस का मला... एके काळी तुझ्याच अंगणात खेळलेला, बागडलेला मी तुझा एक माजी विद्यार्थी... तुझ्या सहवासात असतांना तुला खूपदा औपचारिक पत्र लिहिली... पण, आज मुद्दाम तुला हे अनौपचारिक पत्र लिहित आहे... कारण, मला येणारी तुझी आठवण औपचारिक पत्रात नीटशी व्यक्त करता येणार नाही...

१० वी च्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर जात होतो पण, त्यावेळी त्याच इतकसं दुःख मला जाणवलं नव्हतं कारण, ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका होणारं... आता आकाशात मी स्वच्छंद भरारी घेणार... या कल्पनेनच मी सुखावलो होतो...

पण तुला सांगू का... या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या आकाशापेक्षा तुझा तो पिंजराच खूप सुरक्षित होता याची आता मला जाणीव होतेय...

मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय...
पाठीवर दप्तर घेउन तुझ्याकडे यायचंय...
ते राष्ट्रगीत, ती प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणायचीय...
आणि फळ्यावर सुंदर अक्षरात एक सुविचारही लिहायचाय...

विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहायचेत...
बैजिक राशी अन् भूमितीची प्रमेयं सोडवायचीत...
मंत्रमुग्ध करणारा इतिहास ऐकायचाय...
आणि हो मराठीचं व्याकरण, संस्कृतातली सुभाषितं सुद्धा शिकायचीत...

मधल्या सुट्टीतला पोषण आहार, आणि मित्रांचा डबा खायचाय...
पीटीच्या तासाला मनसोक्त कबड्डी, खो-खो खेळायचंय
ग्रंथालयातली गोष्टीची छान पुस्तक वाचायचीत...
आणि एखाद्या मोकळ्या तासाला बाकावर कान ठेवून तबलाही वाजवायचाय...

स्वातंत्र्य दिनाला स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायचंय...
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचंय...
निबंध स्पर्धेतही पहिला नंबर मिळवायचाय...
आणि, नाट्यवाचनाच्या स्पर्धेत तुझ्यासाठी बक्षीस आणायचंय...

विज्ञान प्रदर्शनासाठी एक ‘भन्नाट’ प्रकल्प करायचाय...
शरद मल्हार महोत्सवात समूहगीत गायचंय...
वार्षिक स्नेहसंमेलनात नाच करायचाय...
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एकदो करतही चालायचय...

सहलीला जाऊन नुसती धम्माल करायचीय...
परीक्षेच्या आधी खूप सारा अभ्यास करायचाय...
आणि पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय...

खरतरं मला तुझ्या सानिध्यात घालवलेल्या एकूणच क्षणांची पुनरावृत्ती करायचीय... तुझ्या सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत... यासाठी तू मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?

निरोप समारंभाच्या वेळी मुख्याध्यापक सर म्हणाले होते “तुमचे शाळेतले दिवस हे सुवर्णाक्षरात कोरलेले दिवस आहेत.. कितीही किंमत मोजलीत तरी ते तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...”
त्यामुळं तुझ्यासोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण माझ्या वाटेला परत येणार नाहीत... याचीही मला अगदी पुरेपूर जाणीव आहे...

पण, मला तुझे मनापासून आभार मानायचेत... या समाजाच्या अथांग आकाशात झेप घेण्यासाठी तू माझ्या पंखांना बळ दिलेस... माझ्यातील नीतिमूल्यांचा तू आविष्कार घडवलास... माझ्यात जे काही चांगल आहे हे तुझ्याचं संस्कारांचं देण आहे... आणि याकरिता मी तुझा सदैव कृतज्ञ राहील...

माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक यशातून मी तुझे नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल...

                                                  तुझा आजन्म ऋणी असलेला
              एक माजी विद्यार्थी