*बहीण व भाऊ हे बंधन खूपच प्रेमाचे* :किर्तीताई पांगारकर
बीड : बीड मधील विनायक प्राथमिक शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते सरस्वती चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी रक्षाबंधनाचे महत्व गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.शाळेतील मुलींनी मुलांना राखी बांधून औक्षण केले.बहीण व भावाचे अतूट नाते या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त समृद्ध होते असे आपल्या मनोगतातून श्री. भागडे सरांनी व्यक्त केले. बहीण व भाऊ हे बंधन खूपच प्रेमाचे, आपुलकीचे,मायेचे असते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण नेहमी रक्षाबंधनाच्या प्रसंगी प्रार्थना करते,भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी राखी बांधून घेत तिच्या पाठीमागे खंभीरपणे उभा राहण्याचा संकल्प करतो असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व मुला-मुलींना राखीपोर्णिमेच्या शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. भारती सर, चौधरी मॅडम, गिराम सर, जमाले सर, पठाण नईम सर, पवळ मॅडम, बहिरमल मॅडम, देशमुख मॅडम,फुलमाळी मामा, यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पठाण तन्वीर सर यांनी केले तर आभार पवळ मॅडम यांनी मानले.
No comments:
Post a Comment