Friday, 7 September 2018

गुरू तुमचा वारसा आम्ही पुढे चालवू..

गुरू तुमचा वारसा, आम्ही पुढे चालवू....सौ.किर्तीताई पांगारकर

बीड-दि.5 सप्टेंबर--- विनायक प्राथमिक शाळेत शिक्षक दिन हा  उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक श्री. काळे सर, उगले सर,आदर्श शिक्षक पठाण सर, जमाले सर, गिराम सर, भारती सर यांच्या हस्ते करण्यात आले.या शिक्षक दिनाचे महत्व,  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री. गव्हाणे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेतील छोट्या छोट्या मुलां-मुलीनी,चि. शेख समीर, अनेराव आदिनाथ,घोडके तेजस, शेख अजमत या मुलांनी शिक्षक दिना प्रसंगी आपल्या शिक्षकांप्रति आदर,भावना व्यक्त करून, शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छागुच्छ देऊन स्वागत केले.विविध मुला- मुलींनी आपल्या शिक्षकांप्रती आदरभाव आपल्या भाषणातून व्यक्त करून उपस्थीत मान्यवरांकडून कौतुकाची थाप मिळवली, शिक्षकांचा आदर आपण सन्मानाने करतो कारण संस्कार व जगण्यासाठी विनम्रता आपल्या अंगी बिंबवण्याचे काम शिक्षक करतात आपल्या प्रमुख विचारांतून श्री.काळे सरांनी व्यक्त केले, आयुष्याच्या सुरुवातीपासून दिशा, मार्ग, संस्कार, शिस्त व कल्पना अंगी बाळगून शिक्षक सदैव परिश्रम घेत असतात त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणे हे मी कर्तव्य समजतो आपल्या  मार्गदर्शन भाषणांतून श्री. तन्वीर पठाण सरांनी विचार व्यक्त केले. गुरुशिवाय आपण काहीच नाहीत, जीवनाच्या प्रवासात आई वडिलांबरोबर प्रमुख गुरू म्हणून शिक्षक असतात, कुंभार जसा चिखलाला आकार देऊन जसा घडवतो तसा शिक्षक मुलांना चांगले शिक्षण, शिस्त, मार्गदर्शनरुपी आकार देऊन घडवीत असतो , मी जे घडले त्या माझ्या गुरुवर्यामुळे म्हणून त्यांचा हा  वारसा प्रामाणिकपणे पुढे चालवू असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी  आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व शिक्षकांना  शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्या व्यक्त केल्या..   
     हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्वश्री, बहिरमल मॅडम, पवळ मॅडम , नईम पठाण सर,देशमुख मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. भागडे सरांनी केले तर चौधरी मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून सर्व शिक्षक बांधवाना शिक्षक दिनाच्या शुभेच्या व्यक्त केल्या...






No comments:

Post a Comment