*विनायक प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन महोत्सव 2018 संपन्न*
बीड--दि.19 सप्टेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे बीड तालुका गटशिक्षणाधिकारी श्री.मोराळे साहेब, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.जरांगे सर, विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते,जेष्ठ विस्तार अधिकारी श्री. पवार सर,क्षीरसागर सर,शिंदे सर,विनायक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सपकाळ सर, उपमुख्याध्यापक श्री.सपाटे सर, श्री. सचिन भोज सर,रामकुंड प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री.देवमाने सर,नवगण प्रा.शा.बीड चे मुख्याध्यापक श्री.वाघ सर, संभाजी प्रा.शा.शिवाजीनगर, बीड च्या मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम, अशोकनगर केंद्रप्रमुख श्री. पठाण सर,गटसाधन केंद्राचे श्री. पवार सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन महोत्सवाचे उदघाटन संपन्न झाले उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सपकाळ सर यांनी केले.याप्रसंगी शाळेतील मुला-मुलींनी वेगवेगळे प्रयोग सादर केले.विद्यार्थ्यांनी आपला कल्पक दृष्टिकोन लक्षात ठेवून पारंपरिक शेती व आधुनिक शेती तंत्र, पाणी आडवा पाणी जिरवा,हवेचे वेगवेगळे गुणधर्म,स्मार्ट सिटी, पवन ऊर्जानिर्मिती, सोलर ऊर्जा निर्मिती,हवेचे रॉकेट, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, मिक्सर बनवणे, कुलर बनवणे,जंगली प्राणी-पाळीव प्राणी, मातीचे उपयोग,कुंभारकाम, विविध शैक्षणिक शब्दांचे चार्ट, जीवनसत्वे, विविध फळांचे,आकाशगंगा, संगणक, चवीचे गुणधर्म,रंगकाम,अंक ओळख, दिशादर्शक यंत्र, भूकंपसूचक यंत्र, फुफ्फुस कार्य तपासणी यंत्र,पक्षी पकड यंत्र, पाण्याचे गुणधर्म, हवेला दाब असतो, मनोरंजनात्मक व कलात्मक असे वेगवेगळे प्रयोग या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दाखवून प्रात्यक्षिक करून त्या प्रयोगाबद्दलची माहिती करून दिली. या विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा सहभाग खूप मोठा होता. या विविध प्रयोगाने विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटत होता. त्यांच्या कल्पनेला वाव व व्यासपीठ मिळवून दिले आनंददायी शिक्षणाचे महत्त्व, अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजते. आत्मविश्वासाने प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण करत होते. आपल्या शोधक कलेतून वैज्ञानिक, चिकित्सक वृत्ती या गुणांना वाव अशा विज्ञान प्रदर्शनातून निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.अभ्यासाची आवड, गोडी निर्माण होत असते. अत्यंत खेळीमेळीने,कुतहुलाने ही मुले आपले प्रयोग सादर करत होती. बीड चे गटशिक्षणाधिकारी श्री. मोराळे साहेबांनी विज्ञान प्रदर्शनातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रयोग मोठ्या कौतुकाने पाहत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची संपूर्ण माहिती घेऊन,विनायक प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन, केल्याने कौतुक केले.
या सर्व विज्ञान प्रदर्शन महोत्सवासाठी शाळेतील सर्वश्री शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत कला सादर केल्या.

No comments:
Post a Comment