*स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले एक महान आदर्श महिला सदैव स्मरणात राहतील-सौ.किर्तीताई पांगारकर*
बीड दि.३ जानेवारी २०१९ रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व सावित्रीबाई फुलेंचे प्रेरणा गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व शाळेतील सर्व शिक्षक श्री.भारती सर,गिराम सर,गव्हाणे सर,भागडे सर,नइम पठाण,चौधरी मॅडम, बहिरमल मॅडम,देशमुख ताई,लक्ष्मण फुलमाळी उपस्थित राहीले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत विविध मुला-मुलींनी केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवनकार्या,आदर्श,समाजसुधारणांचा आढावा शाळेतील श्री.गव्हाणे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेतील विविध मुला-मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची ओळख करून दिली. सावित्रीबाईं फुलेंच्या वेशभूषेत मुली त्यांच्या आठवणीत दंग झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले महान व्यक्ती होऊन गेल्या.त्यांचे कार्य आजही आपणांस या मुलींच्या शिक्षणाच्या रुपात दिसते.जगाला आदर्श देणाऱ्या सावित्रीबाई फुले थोर समाजसुधारक होत्या. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा उलथवून टाकण्यासाठी, स्त्री-शिक्षणासाठी खूप त्रास सहन करून आपलं काम न डगमगता संपूर्ण आयुष्यामध्ये कार्य करत राहिल्या त्यांच्यामुळेच आज स्त्रियांना मानाचे पुरुषांच्या बरोबरीने स्थान आहे, अनेक महिलांनी आपल्या कर्तबगारीने उंच उंच यशाची शिखरे पार केले.सावित्रीबाई फुलेंचे विचार आदर्श घेऊन आपल्या शाळेच्या निर्मात्या स्व. केशरकाकूं क्षीरसागर यांनीपण आपल्या कार्याचा आदर्श निर्माण करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणा देत राहिल्या,खेडोपाडी, शहरी भागातील गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अनेक शाळा स्थापन करून, भारत देशात एक महिला साखर कारखाना निर्माण करणाऱ्या अध्यक्षा ठरल्या हा सन्मान मिळून गेल्या.म्हणून स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले एक थोर समाजसुधारक सदैव स्मरणात राहतील असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांचे आई वडील उसतोडणीसाठी बाहेर गेली आहेत त्या मुलीं आपल्या आजी-आजोबा सोबत राहात आहेत ते गरीब आहेत म्हणून त्यांना शाळेच्या वतीने थंडी वाजू नये म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई यांच्या हस्ते मुलींना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खास सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.भागडे सरांनी केले तर आभार श्रीमती चौधरी मॅडम यांनी मानले..

No comments:
Post a Comment