*खरी कमाई विद्यार्थ्यांना स्वावलंबन समजवते*-
सौ.किर्तीताई पांगारकर
बीड-दि.२५जानेवारी(बीड प्रतिनिधी) या दिवशी विनायक प्राथमिक शाळेत खरी कमाई उपक्रमाअंतर्गत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले. या आनंदनगरी चे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ सपकाळ सर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील श्रीमती भारतीताई क्षीरसागर मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, बाळू काळे सर,सुनीता चौधरी मॅडम, अशोक काशीद सर, शिवलिंग क्षीरसागर सर,तन्वीर पठाण सर,अजिंक्य चांदणे सर, अजीजराजा शेख सर,विवेक गव्हाणे सर,सिमा उदगीरकर मॅडम,प्रतिभा वाघमारे मॅडम,मनीषा चौधरी मॅडम,रिता वाघमारे मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,अनिल लेहणे सर,शहेबाज शेख सर यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेतील लहान मुला-मुलींनी आपापले खाऊंचे दुकाने लावली होती.जो तो खरी कमाई करण्यात दंग होता.ही लहान मुले मोठ्या कौतुकाने आपले दुकान चालवत होती. विदयार्थी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताईनी प्रत्येक मुलांच्या दुकानाची भेट घेतली व मोठ्या आपुलकीने त्या मुलांशी व्यावहारिक ठोकताळे ,दुकानातील खाऊं प्रत्यक्ष खरेदी करून विद्यार्थ्यांना खरी कमाई यांचे महत्व समजावून सांगत होत्या.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी या आनंदनगरी मध्ये मुलांनी तयार करून आणलेले पदार्थ खरेदी करून त्यांना व्यवहाराचे महत्व समजावून सांगितले.या आनंदनगरी मध्ये वडापाव, कचोरी,समोसे,पापड, गुलाबजामुन,भेळपुरी,चहा,खमंग ढोकळा,अननस,चिक्की, पाणीपुरी,शैक्षणिक साहित्य,मजेशीर विविध खेळ, गंमती जमती,पावभाजी, शेंगदाणे, पाणी, गाजर हलवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपआपले टॉल मुलांनी लावले.यातून त्यांनी खूप खरी कमाई केली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताईंनी या खऱ्या कमाईचे महत्व सांगून खरी कमाई आपल्याला स्वावलंबन शिकवते.त्यामुळे आपल्याला नफा तोटा कळतो, नफा कसा मिळवायचा यासाठी आपण प्रयत्न करतो, जीवन जगण्यासाठी पैसे कमवावे लागतात यासाठी तुम्ही अभ्यास करा, मोठे व्हा, नोकरीला लागाल,काम कराल, मेहनत कराल तेंव्हा त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला पैसा मिळेल हीच तुमची खरी कमाई तुम्हांस स्वावलंबी बनवून तुमच्या जीवनात आनंद निर्माण करील अशा आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी आनंदनगरीच्या समारोपाप्रसंगी मत व्यक्त केले. शाळेतील शिक्षकांनी मुलांना खऱ्या कमाईचे महत्व समजावून सांगितले.या आनंदनगरी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण फुलमाळी,लक्ष्मण चव्हाण मामा यांचे मोलाचे योगदान लाभले.








No comments:
Post a Comment