Wednesday, 10 October 2018

स्व. केशरकाकू क्षीरसागर पुण्यतिथी कार्यक्रम

*स्व.केशरकाकू क्षीरसागर एक अनमोल व्यक्तीमत्व...सौ. किर्तीताई पांगारकर*
   दि.4 ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.बीड जिल्ह्याच्या माजी खा. केशरकाकू क्षीरसागर यांची 12 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रमुख शिक्षक यांच्या हस्ते स्व.केशरकाकू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.. प्रथम माजी खासदार स्व. केशरकाकू यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री.भागडे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.गिराम सर, श्री.भारती सर, श्री.पठाण सर ,श्री गव्हाणे सर श्रीमती चौधरी मॅडम, बहिरमल मॅडम यांनी स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर सादर केला, स्व. काकूंच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जडणघडणीत स्व .काकूंचा मोलाचा वाटा होता. आयुष्यभर त्या संघर्ष करत सामाजिक व राजकीय स्वतंत्र अस्तित्व त्यांनी आपले दाखवून दिले. गोरगरिबांची मुलं शाळेत शिकावी यासाठी त्यांनी खेडोपाड्यात शाळा सुरू केल्या आज हे शैक्षणिक जाळ खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. काकू नेहमी आपल्या शाळेतील अडचणी, प्रगती याबद्दल नेहमी विचारणा करायच्या.बीड जिल्ह्याच्या घराघरात काकू पोहचल्या होत्या. राजकीय, सामाजिक कार्यातून आपल्या स्वकर्तव्याने त्यांनी विविध संस्था, कारखाना, सूतगिरणी उभा केल्या यामागे काकूंचा दूरगामी विचार होता. स्व. केशरकाकू क्षीरसागर हे एक अनमोल व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे कार्य खूप महान होते.आज काकूंची 12 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी काकूंच्या आठवणींना उजाळा दिला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. गव्हाणे सरांनी केले तर आभार श्रीमती पवळ मॅडम यांनी मानले..

No comments:

Post a Comment