Wednesday, 15 February 2023

चंपावती महोत्सव ११ फेब्रुवारी २०२३

 *चंपावती महोत्सवामध्ये  विनायक प्राथमिक शाळेचे यश*

बीड दि-११( बीड प्रतिनिधी) फेब्रुवारी रोजी शहरातील आयोजित सांस्कृतिक चंपावती महोत्सव व डॉ.दिपाताई भारतभूषण क्षीरसागर करंडक या स्पर्धेमध्ये विनायक प्राथमिक शाळेने सहभाग घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले या चंपावती महोत्सवामध्ये डॉ. दिपाताई भारतभूषण क्षीरसागर करंडक या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यातील असंख्य शाळेंनी सहभागी राहिल्या. ३२४० विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक चळवळीत सहभाग घेतला होता.बीड शहरात नाविन्यपूर्ण उपक्रम प्रथमच आयोजित करून या चंपावती महोत्सवामध्ये विनायक प्राथमिक शाळेतील मुला- मुलींनी सहभागी होऊन रसिकांची वाहवा मिळवली.वर्ग १ ते३ या गटांमध्ये ईडा, पीडा, टळू दे व भरदे झोली  या समूह नृत्याला प्रथम क्रमांक मिळवला. वर्ग ४ ते ६ गटांमध्ये शिवरायांची युगत मांडली या समूह नृत्याने तिसरा क्रमांक पटकावला.पांडू चित्रपटातील विनोदी बुरुम बुरुम, केसरिया गीताने वातावरणात राष्ट्रीय एकात्मतेची बीज रोवली.देशभक्तीपर गीत केसरीया ने उत्कृष्ट असे नृत्य करून बीड शहरातील नाट्यगृहाला प्रेक्षकांनी खुप प्रतिसाद दिला.या सर्व एकापेक्षा एक गीतांचे सादरीकरण करून विनायक प्राथमिक शाळेने या चंपावती महोत्सव  व डॉ. दिपाताई भारतभूषण क्षीरसागर करंडक २०२३ मध्ये यशस्वी सहभाग घेऊन यश संपादन केले अशा कलाकार विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर ,शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांचे या यशाबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब,नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर साहेब,डॉ. दिपाताई भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, संस्थेचे  प्रशासन अधिकारी डॉ. राजाजी मचाले सर, कार्यवाहक एम. ए. राऊत सर, चंपावती महोत्सवाचे यशस्वी आयोजन करणारे डॉ.चंद्रकांत तोंडे,पत्रकार रवी उबाळे,कामराज शेख,गणेश मैंड, प्रतीक कांबळे,अमोल गायकवाड,निलेश येलगिरे, ऋषिकेश गिराम पाटील,अभीषेक दळवी,रोहीत नलावडे,श्रेयस नाईकवाडे यांनी यशस्वी सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीचे विशेष  अभिनंदन केले.












No comments:

Post a Comment