Sunday, 26 February 2023

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२३

 *मराठी कवितेतून भाषेचे


सौदंर्य फुलते*- सौ. किर्तीताई पांगारकर

(बीड प्रतिनिधी)दि.२७ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत जेष्ठ कवि वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतनिमित्ताने आयोजीत केलेल्या मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर आधारित प्रास्ताविकपर मनोगत श्री.अशोक काशीद सरांनी व्यक्त केले. कुसुमाग्रजांच्या आठवणीतील काव्यातील अजरामर अशी 'कणा' ही कविता श्री.विवेक गव्हाणे सरांनी गाऊन या कवितेचे शब्द,भाव चित्रण स्पष्ट केले.शाळेतील अनेक मुला-मुलींनी मराठी पाठ्यक्रमातील कविता गायन केले.शाळेतील सर्व शिक्षक शिवलिंग क्षीरसागर सर, भारतीताई क्षीरसागर मॅडम, दिलीप तकीक सर, तन्वीर पठाण सर, श्री.बाळू काळे सर, उत्तरेश्वर भारती सर,अनिल लेहने सर, सुनिता चौधरी मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,संजीवनी पवळ मॅडम ,गणेश भागडे सर,कविता घोडके मॅडम,अजीजराजा शेख सर,सिमा उदगीरकर मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम, शहेबाज शेख सर बालवाडीच्या देशमुख मॅडम यांनी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त विविध कविता सादर करून मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.मराठी भाषेचे सौदंर्य कवितेतून फुलते.परिस्थितीचे वास्तविक चित्रण शब्दांमध्ये शब्दबद्ध करणे हा हातखंडा वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा राहिला.अनेक प्रसिद्ध कविता, साहित्य लेखन करून मराठी भाषेला त्यांनी समृद्ध केले.त्यांच्या कविता आजही आपल्या मनामनामध्ये घर करून आहेत हेच त्यांचे लेखन वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितेत रस, आनंद, भावना यांचा संगम असतो असे अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त करून मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच कुसुमाग्रजांच्या कार्याला वंदन करून कुसुमाग्रजांची 'मौन' ही कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांचे सहकार्य लाभले.सुंदर असे सूत्रसंचालन अजिंक्य चांदणे सरांनी केले तर आभार रिता वाघमारे मॅडम यांनी मानले.


No comments:

Post a Comment