*डॉ.भारतभूषण क्षीरसागरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्रिडा स्पर्धा संपन्न*
बीड दि-१६ फेब्रु.( बीड प्रतिनिधी)- बीड नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील पेठ बीड भागातील विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, चित्रकला, थैली रेस, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व मुलामुलींनी सहभाग घेऊन अध्यक्ष साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर साहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची माहिती करून देण्यात आली.या स्पर्धेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाची साथ राहिली.
No comments:
Post a Comment