विघ्नहर्ता श्री गणराया व विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी यांना वंदन करून, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत व विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचाराने प्रेरित होऊन विनायक प्राथमिक शाळेचे कार्य अविरत चालू असते. त्यानुरूप शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालाचा आढावा घेऊयात.आपल्या शाळेत येणारा विद्यार्थी हा झोपडपट्टी भागातील तसेच मराठी माध्यमाचा असल्यामुळे इंग्रजी भाषेचे आकलन होण्यास वेळ लागतो. यासाठी इयत्ता १ली व २री च्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयाचे वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अध्यापन करण्यात आले.अभ्यास एके अभ्यास म्हटलं की मुलांना कंटाळा येतो त्याच्या जोडीला खेळही हवेतच. खेळातूनच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाला वाव मिळतो व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते त्यादृष्टीने सालाबादाप्रमाणे शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापुरुषांविषयी आदर निर्माण व्हावा याकरिता प्रशालेमध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने उपक्रमशील प्रयोग म्हणून सर्व कार्यक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन आमच्या विद्यार्थ्यांकडूनच करून घेतले जाते. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सवा प्रतिची खरीखुरी अपेक्षा पूर्ततेचा प्रयत्न करण्याचा प्रयास आमच्याकडून केला जातो. त्यानुरूप गणेशोत्सव साजरा करत असताना विविध स्पर्धाबरोबर समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांची प्रेरणा जागृत करण्याचे कार्य प्रशालेच्या वतीने केले जाते व त्याबरोबर सांस्कृतिक वारसा जपण्याच्या हेतूने पारंपारिक वाद्यांच्या मदतीने श्रींची मिरवणूक लेझीम पथकासह साजरी केली. तसेच राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन, रस्ता सुरक्षा दिन, जागतिक एड्सदिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सका मार्फत राबविण्यात आलेल्या एड्स रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग.विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थी जेवढा महत्त्वपूर्ण आहे तेवढाच शिक्षकही. अध्ययन-अध्यापन कार्याबरोबर कृतिशील शिक्षक खऱ्या अर्थाने या शैक्षणिक कार्याला एक नवी दिशा देऊ शकतो, म्हणूनच आम्ही अशा कृतिशील शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी कृतिशील शिक्षक पुरस्कार देतो शाळेचा विकास व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव मा. श्री.जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी निरंतर प्रयत्न करत असतात. तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षण निदेशक, संगणक निदेशक, प्रयोगशाळा सहाय्यक व शिक्षकेतर कर्मचारी सदैव परिश्रम घेत असतात, त्यामुळेच शाळेने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अशी ही बीड शहरातील एक उपक्रमशील विनायक प्राथमिक शाळा होय. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर मॅडमनी आपल्या "किर्ती"नावाप्रमाणे प्रखरतेने व तेजाने नव वर्गरुपी ग्रहांची माला यशस्वीरीत्या सांभाळून कार्यक्षमपणे येणाऱ्या अडचणींवर मात करत आमच्यासाठी नेतृत्व व मार्गदर्शन करत असतात. यातूनच आमचा शाळारूपी रथ अविरत यशस्वीपणे घौडदौड करतो आहे.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक व प्रोत्साहनात्मक मदत वेळोवेळी करत असतात आणि त्यांचे सामाजिक भान ठेऊन समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थी व खेळाडूंना नेहमीच सहकार्य करत असतात. विद्यार्थी हा घडत असतो तो म्हणजे घर, शाळा आणि समाजामध्ये. या दृष्टीने शाळा सह-शालेय उपक्रमांचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना निसर्गसौंदर्याचा व पर्यटनस्थळांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या शाळेची इयत्ता१ ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय सहलीचे शिवदरा,शांतीवन, बिंदुसरा तळे येथे आयोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment