Monday, 28 November 2022

महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी२८ नोव्हेंबर २०२२

 *महात्मा ज्योतिबा फुलेंनी गरीब व निर्बलांना न्याय दिला*- सौ. किर्तीताई पांगारकर

 दि- २८ नोव्हेंबर( बीड प्रतिनिधी) शहरातील विनायक प्राथमिक शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त  आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे श्री.तन्वीर पठाण सर ,श्री.अशोक काशीद सर, दिलीप तकीक सर, भारती क्षीरसागर मॅडम.शैलजा बावसकर मॅडम, महानंदा मुंडे मॅडम, उत्तरेश्वर भारती सर, सुनिता चौधरी मॅडम,यांच्या शुभहस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यांचा आढावा श्री.शेख शहेबाज सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केला.विविध विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील मुलांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची केलेली वेशभूषा लक्ष वेधून घेत होती. अनिष्ठ रूढी परंपरेला न जुमानता क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी,स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले अजरामर होऊन गेले असे मौलिक विचार प्रमुख पाहुणे शाळेचे शिक्षक श्री. तन्वीर पठाण सर यांनी व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ. संजीवनी पवळ मॅडम, मनीषा चौधरी मॅडम, श्री. गव्हाणे विवेक सर, शैलजा बावस्कर मॅडम , शारदा बहिरमल मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम, महानंदा मुंडे मॅडम यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंच्या जीवनातील कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.स्त्री यांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, अनिष्ठ चालीरीती, समाजप्रबोधन, सामाजिक असमतोल नसावा, सर्व धर्म समभाव अशा विचारांची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले एक असामान्य विचारवंत, समाजसुधारक होऊन गेले. चूल आणि मूल या चौकटीत स्त्रियांना न ठेवता तिला स्वतंत्र करण्यासाठी खुप त्रास सहन केला अशा ज्योतिबा फुलेंमुळे आज महिला शिक्षित होऊन महत्वाच्या स्थानांवर कार्य करत आहेत, ज्योतिबांनी गरिबांना व निर्बलांना न्याय दिला.याचा अभिमान वाटतो असे आपल्या अध्यक्षीय समारोपीय सविस्तर मार्गदर्शनातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन व्यक्त केले. या  कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. अजीजराजा शेख सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले.








Saturday, 26 November 2022

संविधान दिन २६ नोव्हेंबर २०२२




 *विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा*

दि-२६नोव्हेंबर(बीड प्रतिनिधी)- विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार,संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेचे बाळू काळे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.  शाळेतील शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी भारतीय संविधानाचे विविध पैलू,संकल्पना याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.तन्वीर पठाण सर, अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर, शहेबाज शेख सर, प्रतिभा वाघमारे मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,सुनीता चौधरी मॅडम,मनिषा चौधरी मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर,अनिल लेहणे सर यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे प्रमुख होते.त्यांच्या अथक परिश्रमाने व अभ्यासाने आपल्याला २६ नोव्हेंबर १९४९ ला राज्यघटना मिळाली म्हणजेच संविधान मिळाले व प्रत्यक्षात ते अंमलात आणले.देशात राष्ट्रीय एकात्मता राहावी,आपले हक्क आपले सरकार ,आपली अभिव्यक्ती चे जतन आपल्याला संविधानाच्या निमित्ताने मिळतात म्हणून संविधान हे आपल्यासाठी, आपल्या देशात एकता, अखंडता राहण्यासाठी महत्वाचे आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.या संविधान दिनाच्या निमित्ताने  वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शाळेतील मुला मुलींनी विशेष सहभाग घेऊन प्राविण्य मिळवले.संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेतील मुला मुलींनी भारताचे संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली व तिचे तंतोतंत पालन करण्याची प्रतिज्ञा केली.

    हा संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार सिमा उदगीरकर मॅडम यांनी मानले

Sunday, 20 November 2022

विनायक प्राथमिक शाळेत सीईओ श्री. अजित पवार साहेबांची भेट

 *विनायक विद्यालयात श्री.अजित पवार साहेबांची सदिच्छा भेट*

(बीड प्रतिनिधी)- दि.१८ नोव्हेंबर रोजी विनायक प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेबांनी भेट दिली.त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंत मुंडे सर,आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा.राजाजी मचाले,मराठवाडा साथीचे संपादक श्री.चंदुलाल बियाणी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभू गोरे, प्रमुख व्याख्याते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शशिकांत कुलथे सर,मराठवाडा साथी चे जिल्हा प्रतिनिधी श्री.संदीप बेदरे या सर्वांची  विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रशांत पवळ सरांनी या सर्व अतिथी गणांचे शाळेच्या वतीने स्वागत केले व शाळेबद्दल ची माहिती करून दिली.शाळेच्या भौतिक सुविधा,शाळेच्या डिजीटल वर्गखोल्याची प्रत्यक्ष पाहणी करून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेब व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.यावेळी स्व. लोकनेत्या माजी खासदार केशरकाकूं क्षीरसागर व स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. अजित पवार साहेब व उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते करून व्याख्यानमालेचे उद्धघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्राचार्य प्रशांत पवळ सरांनी करून विनायक विद्यालयाचे शैक्षणिक कार्य, कल्पना, भविष्यातील विद्यार्थी घडवण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती करून दिली.अध्ययन अध्यापनातील संकल्पना राबवण्यासाठी शिक्षकांनी अधिकत्तर कौशल्यांचा अधिकाधिक वापर विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करून विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव दुर करण्यासाठी प्रयत्न केले तरच विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करेल अशी महत्वपूर्ण माहिती बीड जिल्ह्याचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. शशिकांत कुलथे सरांनी आपल्या विशेष व्याख्यानपर मनोगतातून व्यक्त केले. मी कसा घडलो? माझे शिक्षक मला महत्वाचे वाटते. त्यांनी दिलेले शिक्षण, आमच्याकडून करून घेतलेले परिसर कार्य आजही आठवतात.सरांनी आमच्याकडून उभारलेल्या शाळेच्या भिंतीच्या विटा आज मोठे झाल्यानंतर ही मी गावी गेल्यानंतर थांबून पाहतो व त्या आठवणी माझ्या मनात जाग्या करतो. शिक्षक हा महत्वपूर्ण असा घटक आहे त्यांनी अधिक प्रगतिशील राहून कार्य केले तर नक्कीच विद्यार्थी घडतील.विनायक विद्यालयात या स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमाला या उपक्रमाचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेबांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून श्री.शशिकांत कुलथे सरांसारखे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आपल्या बीड जिल्ह्यातील आहे याचा खुप अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सरमल सरांनी केले तर उपस्थित अतिथी गणांचे विशेष असे आभार मराठवाडा साथी चे जिल्हा प्रतिनिधी श्री. संदिप बेदरे यांनी मानले.

Sunday, 13 November 2022

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन १४ नोव्हेंबर २०२२
















 *विनायक प्राथमिक शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी*

(बीड प्रतिनिधी)- दि.१४ नोव्हेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरुंच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे भारती क्षीरसागर मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर, शिवलिंग क्षीरसागर सर,वर्षा म्हेत्रे मॅडम, कविता घोडके मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,गणेश भागडे सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगतातून सिमा उदगीरकर मॅडमनी  पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.यावेळी शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून बाल दिन साजरा करण्यात आला. पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या अलौकिक कार्याची माहिती शाळेचे तन्वीर पठाण सरांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केली.मुलांना फुलाप्रमाणे समजणाऱ्या चाचा नेहरूंना मुलं खूप आवडायची असे  शाळेचे अशोक काशीद सरांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.समृद्ध भारत घडवायचा असेल तर मुलांच्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी आपण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीने बघितले पाहिजे. उद्याचे भविष्य या लहान मुलात आहे. त्यासाठी आपल्याला फुलाप्रमाणे मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रंग व आकार देऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी संकल्प करूया असे मौलिक विचार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांना वंदन करून आदरांजली व्यक्त केली.या बालकदिनाच्या निमित्ताने शाळेत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती संजीवनी पवळ मॅडमनी मानले.

Tuesday, 4 October 2022

लोकनेत्या स्व. माजी खासदार केशरकाकूंचा स्मृतिदिन ४ ऑक्टोबर २०२२

 *विनायक प्राथमिक शाळेत स्व.मा. खा. केशरकाकूंचा  स्मृतिदिन साजरा*

  दि. ४ सप्टेंबर-(बीड )- बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत स्व.लोकनेत्या केशरकांकुची पुण्यतिथी निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते स्व.काकूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मंगल क्षीरसागर मॅडम,  शैलजा बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,वर्षा म्हेत्रे मॅडम,मनीषा चौधरी मॅडम, महानंदा मुंडे मॅडम,श्री.दिलीप तकीक सर, अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर, शिवलिंग क्षीरसागर सर, उत्तरेश्वर भारती सर,अनिल लेहने सर यांची प्रमुख उपस्थिती राहिली. शाळेतील विद्यार्थ्यांना स्व.केशरकाकूंच्या जीवनकार्याची ओळख आपल्या प्रास्ताविकपर विचारांतून श्री.तन्वीर पठाण सरांनी करून दिली.बीड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकनेत्या म्हणजेच ' केशरकाकूं' आजही सदैव आठवतात असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक श्री.बाळू काळे सरांनी स्व.केशरकाकूंच्या जीवनावर प्रकाश टाकून वातावरण स्तब्ध केले.  या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शाळेत वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.शाळेतील शिक्षकांनी स्व.काकूंच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आलेल्या अनुभवातून शब्दबद्ध केले.अलौकीक समाज कार्य करणाऱ्या  'कांकू' माझ्या सर्वस्व गुरू म्हणून पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या.माझ्या आदर्श आहेत. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकरानी भावना व्यक्त करून स्व. काकूंना आदरांजली वाहीली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश भागडे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार विवेक गव्हाणे  सरांनी मानले.

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती २ ऑक्टोबर २०२२

 विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री  यांची जयंती साजरी   

बीड-दि-२ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर व भारतीताई क्षीरसागर मॅडम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा पठाण तन्वीर सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले, भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून श्री. शहेबाज शेख सरांनी त्यांचे कार्य व्यक्त केले.गांधीजी हे एक अनमोल रत्न भारतास लाभले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती श्रीमती चौधरी मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत श्री.काळे सरांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले. महात्मा गांधींच्या जीवनातील भारताच्या स्वतंत्र चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहेत त्यांचे कार्य खूप मोठे होते गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लाभले, या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. भागडे सर यांनी केले तर आभार श्रीमती






बहिरमल मॅडम यांनी मानले..

Thursday, 18 August 2022

१५ आगस्ट २०२२

 *विनायक प्राथमिक शाळेत ७६ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा*

 बीड दि-१५ आगस्ट रोजी विनायक प्राथमिक शाळेत ७६ व्या स्वातंत्र दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर,माजी नगरसेवक अमोल पवळ,महेबूब बागवान, पत्रकार इम्रानजी शहा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व.लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व  श्री.बाळू काळे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून विद्यार्थ्यांना संभोधीत केले. शाळेतील विविध मुलामुलींनी, विद्यार्थी पालकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांची माहिती सांगितली.आझादी का अमृमहोत्सव म्हणजेच एक भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण असे आपल्या अध्यक्षीय विचारांतून सर्व उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे ,विद्यार्थ्यांना ७६ व्या स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा सौ. किर्तीताई पांगारकर यांनी दिल्या. यावेळी या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी  यांची उपस्थिती राहिली,. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थितीतांचें आभार तन्वीर पठाण सरांनी मानले..


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव १३ ऑगस्ट ते १५ आगस्ट २०२२



 *विनायक प्राथ.व माध्य. शाळेच्या 'हर घर तिरंगा' प्रभातफेरीने उत्साह वाढला*

 बीड दि.-१३ ऑगस्ट/(बीड प्रतिनिधी) बीड शहरातील पेठ बीड विभागातील अग्रगण्य असणाऱ्या विनायक प्राथमिक व माध्यमिक शाळेत भव्य अशा हर घर तिरंगा, देशाच्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त  तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे माजी शिक्षणाधिकारी तथा बीड जिल्हा परिषद शालेय पोषण आहाराचे अधिक्षक  श्री.अजयकुमार बहिर साहेब, आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.राजीव मचाले सर,पेठ बीड पोलीस निरीक्षक श्री. पालवे साहेब, विनायक प्राथमिक

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांतजी पवळ सर,बीड शिक्षण विभागाचे  चाटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य अशा तिरंगा यात्रेची प्रभातफेरी पेठ बीड विभागात निघाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या जयघोषणेने राष्ट्रीय ध्वज डोलाने फडकत राहिला. देशाची शान अन बाण ती एकच म्हणजे तिरंगा. या तिरंगा यात्रेने अवघा पेठ बीड परिसरामधील लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला.छोटी छोटी मुलं देशाच्या स्वातंत्र्याविषयी जयघोषणा करत राहिली. भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पाडण्यासाठी ,देशाचा राष्ट्रध्वज तिरंग्याचे महत्त्व लक्षात राहण्यासाठी घरोघरी तिरंगा प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी बीड जि.प.शालेय पोषण आहाराचे  अधीक्षक  श्री.अजयकुमार बहिर साहेबांच्या हस्ते,श्री.राजीव जी मचाले सर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी  विनायक प्राथमिक शाळेचे कब बुल बुल पथकातील मुला- मुलींचे कौतुक  श्री.अजयकुमार बहिर साहेबांनी केले. याप्रसंगी शाळेतील मुला मुलींना शालेय गणवेशाचे  वाटप  करण्यात आले.हर घर तिरंगा अभियानात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Wednesday, 3 August 2022

अण्णाभाऊ साठेजयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी १ ऑगस्ट २०२२

 *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळक एक प्रेरक समाजसुधारक-  किर्तीताई पांगारकर*

    (बीड प्रतिनिधी )-१ऑगस्ट या रोजी विनायक प्राथमिक शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे उत्तरेश्वर भारती सर,अजिंक्य चांदणे सर,अशोक काशीद सर, दिलीप तकीक सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन प्रतिभा वाघमारे मॅडमनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा सांगितला, त्यानंतर विविध लहान मुलां- मुलींनी या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले, प्रमुख वक्ते अजिंक्य चांदणे सरांनी  लोकमान्य टिळकांची राष्ट्रभक्ती, त्याग, प्रगल्भता, आक्रमकपणा, स्वाभिमानी बाणा या टिळकांच्या पैलूंवर प्रकाश टाकला तर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र लेखन, शाहीर, लोककला मातंग समाजातील यथार्थ चित्रण, शैक्षणिक, सामाजिक धोरण, अंगी असणारी शाहीरीतुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रवृत्त करणारी लेखनशैली खूप प्रेरणादायी आहे असे आपल्या भाषणांतून व्यक्त केले, त्यानंतर श्री. तन्वीर पठाण सरांनी आपल्या खास शैलीत दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनातील वास्तवता त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले, संगिता वडमारे मॅडम व शेख शेहेबाज सरांनी टिळकांचा बाणेदारपणा व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील गोष्टी बालकांना सांगून,टिळक व साठे यांचे चित्र डोळ्यासमोर आणून मार्गदर्शन केले,त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून, या महान व्यक्तिमत्वाच्या प्रभावी जीवनकार्याचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांच्या समोर उभा केले, टिळकांचा जहाल विचार व केलेले संघटन देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रेरक ठरले, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण, गरीबी, यामधून पुढे येऊन समाज जागृत करण्यासाठी लेखन कला, शाहीरी, कथा-कादंबऱ्या, पोवाड्याच्या माध्यमातून समाज जीवनाचं वास्तव दर्शन विशद केले दोन्हीही व्यक्तिमत्व एक प्रेरक समाजसुधारक म्हणून सदैव स्मृरणात राहील.या महान व्यक्तीला अभिवादन करण्यात आले.या पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन बाळू काळे सरांनी केले तर आभार शारदा बहिरमल मॅडम यांनी मानले....

Saturday, 30 July 2022

स्व. सोनाजीराव क्षीरसागर यांची पुण्यतिथी ३० जुलै २०२२




 *विनायक प्राथमिक शाळेत स्व. सोनाजीराव क्षीरसागर यांची पुण्यतिथी साजरी*

बीड प्रतिनिधी)-दि.३० जुलै रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी करून अभिवादन केले. यावेळी शाळेच्या जेष्ट शिक्षिका मुंडे मॅडम, शाळेतील सर्व  शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शाळेचे शिक्षक अशोक काशीद सर,तन्वीर पठाण सरांनी स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदानाची माहिती शाळेतील  विद्यार्थ्यांना करून दिली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना हे एक उत्तम पैलवान होते,व्यायामाची आवड असल्यामुळे भारदस्त शरीरयष्टीचे मल्ल सुप्रसिद्ध होते.आपल्या पत्नीला राजकीय योगदानाची संधी देण्यात सिहांचा वाटा त्यांचा होता.स्वतःपाठीमागे राहून स्व.केशरकाकूंना राजुरीच्या सरपंच पदापासून ,बीड पंचायत समिती सभापती,सलग तीन वेळेस बीडच्या खासदार,आशिया खंडातील पहिल्या महिला गजानन साखर कारखान्याच्या अध्यक्षा,शैक्षणिक संस्था अशा विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये स्व.सोनाजीराव क्षीरसागरांची भक्कम अशी साथ लाभली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना लोकनेत्या स्व.केशरकाकूंचे एक आधारस्तंभ होते.ग्रामीण भागामधील लोकांना आयुर्वेदिक वनऔषधी सांगत होते.आपल्या परिवारावर त्यांचा धाक होता,दबदबा होता म्हणूनच त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केले.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून आपल्या भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या.या पुण्यतिथी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सिमा उदगीरकर मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले.












Thursday, 23 June 2022

प्रवेशोत्सवजून 15 २०२२






 *विनायक प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत*


 (बीड प्रतिनिधी) - दि १५ जुन २०२२ रोजी विनायक प्राथमिक शाळेत नवीन इयत्ता १ ली प्रवेशीत विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन करून उत्साहपूर्ण  वातावरणात शालेय कामकाजाची सुरुवात करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी नवीन प्रवेशीत मुला मुलींचे त्यांच्या आईवडिलांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांचा उत्साह वाढवला .खुप मोठ्या उत्साहात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रवेशोत्सव आयोजीत करून शालेय वातावरण  उत्साहपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी विविध पालकांनी शाळेला भेट देऊन  शालेय व्यवस्थापनेचा आढावा घेऊन परिस्थिती जाणून घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती दर्शवली. शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नियोजनानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळेतील सर्व मुला मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन शाळेत नियमित उपस्थित राहावे,शालेय अभ्यासक्रम नियमित करण्यात यावा दररोजचा अभ्यास,गृहपाठ नियमितपणे करावा असे अहवान करण्यात आले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहिले.