Thursday, 18 August 2022

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव १३ ऑगस्ट ते १५ आगस्ट २०२२



 *विनायक प्राथ.व माध्य. शाळेच्या 'हर घर तिरंगा' प्रभातफेरीने उत्साह वाढला*

 बीड दि.-१३ ऑगस्ट/(बीड प्रतिनिधी) बीड शहरातील पेठ बीड विभागातील अग्रगण्य असणाऱ्या विनायक प्राथमिक व माध्यमिक शाळेत भव्य अशा हर घर तिरंगा, देशाच्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त  तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे माजी शिक्षणाधिकारी तथा बीड जिल्हा परिषद शालेय पोषण आहाराचे अधिक्षक  श्री.अजयकुमार बहिर साहेब, आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.राजीव मचाले सर,पेठ बीड पोलीस निरीक्षक श्री. पालवे साहेब, विनायक प्राथमिक

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांतजी पवळ सर,बीड शिक्षण विभागाचे  चाटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य अशा तिरंगा यात्रेची प्रभातफेरी पेठ बीड विभागात निघाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या जयघोषणेने राष्ट्रीय ध्वज डोलाने फडकत राहिला. देशाची शान अन बाण ती एकच म्हणजे तिरंगा. या तिरंगा यात्रेने अवघा पेठ बीड परिसरामधील लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला.छोटी छोटी मुलं देशाच्या स्वातंत्र्याविषयी जयघोषणा करत राहिली. भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पाडण्यासाठी ,देशाचा राष्ट्रध्वज तिरंग्याचे महत्त्व लक्षात राहण्यासाठी घरोघरी तिरंगा प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी बीड जि.प.शालेय पोषण आहाराचे  अधीक्षक  श्री.अजयकुमार बहिर साहेबांच्या हस्ते,श्री.राजीव जी मचाले सर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी  विनायक प्राथमिक शाळेचे कब बुल बुल पथकातील मुला- मुलींचे कौतुक  श्री.अजयकुमार बहिर साहेबांनी केले. याप्रसंगी शाळेतील मुला मुलींना शालेय गणवेशाचे  वाटप  करण्यात आले.हर घर तिरंगा अभियानात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment