*विनायक प्राथमिक शाळेत ७६ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा*
बीड दि-१५ आगस्ट रोजी विनायक प्राथमिक शाळेत ७६ व्या स्वातंत्र दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर,माजी नगरसेवक अमोल पवळ,महेबूब बागवान, पत्रकार इम्रानजी शहा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व.लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व श्री.बाळू काळे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून विद्यार्थ्यांना संभोधीत केले. शाळेतील विविध मुलामुलींनी, विद्यार्थी पालकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांची माहिती सांगितली.आझादी का अमृमहोत्सव म्हणजेच एक भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण असे आपल्या अध्यक्षीय विचारांतून सर्व उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे ,विद्यार्थ्यांना ७६ व्या स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा सौ. किर्तीताई पांगारकर यांनी दिल्या. यावेळी या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती राहिली,. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थितीतांचें आभार तन्वीर पठाण सरांनी मानले..
No comments:
Post a Comment