*विनायक प्राथमिक शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी*
(बीड प्रतिनिधी)- दि.१४ नोव्हेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरुंच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे भारती क्षीरसागर मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर, शिवलिंग क्षीरसागर सर,वर्षा म्हेत्रे मॅडम, कविता घोडके मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,गणेश भागडे सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगतातून सिमा उदगीरकर मॅडमनी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.यावेळी शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून बाल दिन साजरा करण्यात आला. पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या अलौकिक कार्याची माहिती शाळेचे तन्वीर पठाण सरांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केली.मुलांना फुलाप्रमाणे समजणाऱ्या चाचा नेहरूंना मुलं खूप आवडायची असे शाळेचे अशोक काशीद सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.समृद्ध भारत घडवायचा असेल तर मुलांच्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी आपण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीने बघितले पाहिजे. उद्याचे भविष्य या लहान मुलात आहे. त्यासाठी आपल्याला फुलाप्रमाणे मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रंग व आकार देऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी संकल्प करूया असे मौलिक विचार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांना वंदन करून आदरांजली व्यक्त केली.या बालकदिनाच्या निमित्ताने शाळेत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती संजीवनी पवळ मॅडमनी मानले.















No comments:
Post a Comment