*विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा*
दि-२६नोव्हेंबर(बीड प्रतिनिधी)- विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार,संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेचे बाळू काळे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेतील शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी भारतीय संविधानाचे विविध पैलू,संकल्पना याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.तन्वीर पठाण सर, अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर, शहेबाज शेख सर, प्रतिभा वाघमारे मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,सुनीता चौधरी मॅडम,मनिषा चौधरी मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर,अनिल लेहणे सर यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे प्रमुख होते.त्यांच्या अथक परिश्रमाने व अभ्यासाने आपल्याला २६ नोव्हेंबर १९४९ ला राज्यघटना मिळाली म्हणजेच संविधान मिळाले व प्रत्यक्षात ते अंमलात आणले.देशात राष्ट्रीय एकात्मता राहावी,आपले हक्क आपले सरकार ,आपली अभिव्यक्ती चे जतन आपल्याला संविधानाच्या निमित्ताने मिळतात म्हणून संविधान हे आपल्यासाठी, आपल्या देशात एकता, अखंडता राहण्यासाठी महत्वाचे आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.या संविधान दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शाळेतील मुला मुलींनी विशेष सहभाग घेऊन प्राविण्य मिळवले.संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेतील मुला मुलींनी भारताचे संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली व तिचे तंतोतंत पालन करण्याची प्रतिज्ञा केली.
हा संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार सिमा उदगीरकर मॅडम यांनी मानले

.jpeg)

No comments:
Post a Comment