Sunday, 20 November 2022

विनायक प्राथमिक शाळेत सीईओ श्री. अजित पवार साहेबांची भेट

 *विनायक विद्यालयात श्री.अजित पवार साहेबांची सदिच्छा भेट*

(बीड प्रतिनिधी)- दि.१८ नोव्हेंबर रोजी विनायक प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेबांनी भेट दिली.त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंत मुंडे सर,आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा.राजाजी मचाले,मराठवाडा साथीचे संपादक श्री.चंदुलाल बियाणी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभू गोरे, प्रमुख व्याख्याते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शशिकांत कुलथे सर,मराठवाडा साथी चे जिल्हा प्रतिनिधी श्री.संदीप बेदरे या सर्वांची  विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रशांत पवळ सरांनी या सर्व अतिथी गणांचे शाळेच्या वतीने स्वागत केले व शाळेबद्दल ची माहिती करून दिली.शाळेच्या भौतिक सुविधा,शाळेच्या डिजीटल वर्गखोल्याची प्रत्यक्ष पाहणी करून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेब व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.यावेळी स्व. लोकनेत्या माजी खासदार केशरकाकूं क्षीरसागर व स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. अजित पवार साहेब व उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते करून व्याख्यानमालेचे उद्धघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्राचार्य प्रशांत पवळ सरांनी करून विनायक विद्यालयाचे शैक्षणिक कार्य, कल्पना, भविष्यातील विद्यार्थी घडवण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती करून दिली.अध्ययन अध्यापनातील संकल्पना राबवण्यासाठी शिक्षकांनी अधिकत्तर कौशल्यांचा अधिकाधिक वापर विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करून विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव दुर करण्यासाठी प्रयत्न केले तरच विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करेल अशी महत्वपूर्ण माहिती बीड जिल्ह्याचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. शशिकांत कुलथे सरांनी आपल्या विशेष व्याख्यानपर मनोगतातून व्यक्त केले. मी कसा घडलो? माझे शिक्षक मला महत्वाचे वाटते. त्यांनी दिलेले शिक्षण, आमच्याकडून करून घेतलेले परिसर कार्य आजही आठवतात.सरांनी आमच्याकडून उभारलेल्या शाळेच्या भिंतीच्या विटा आज मोठे झाल्यानंतर ही मी गावी गेल्यानंतर थांबून पाहतो व त्या आठवणी माझ्या मनात जाग्या करतो. शिक्षक हा महत्वपूर्ण असा घटक आहे त्यांनी अधिक प्रगतिशील राहून कार्य केले तर नक्कीच विद्यार्थी घडतील.विनायक विद्यालयात या स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमाला या उपक्रमाचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेबांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून श्री.शशिकांत कुलथे सरांसारखे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आपल्या बीड जिल्ह्यातील आहे याचा खुप अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सरमल सरांनी केले तर उपस्थित अतिथी गणांचे विशेष असे आभार मराठवाडा साथी चे जिल्हा प्रतिनिधी श्री. संदिप बेदरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment