Monday, 27 February 2023

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी



*मराठी कवितेतून भाषेचे सौदंर्य फुलते*- सौ. किर्तीताई पांगारकर
(बीड प्रतिनिधी)दि.२७ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत जेष्ठ कवि वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतनिमित्ताने आयोजीत केलेल्या मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर आधारित प्रास्ताविकपर मनोगत श्री.अशोक काशीद सरांनी व्यक्त केले. कुसुमाग्रजांच्या आठवणीतील काव्यातील अजरामर अशी 'कणा' ही कविता श्री.विवेक गव्हाणे सरांनी गाऊन या कवितेचे शब्द,भाव चित्रण स्पष्ट केले.शाळेतील अनेक मुला-मुलींनी मराठी पाठ्यक्रमातील कविता गायन केले.शाळेतील सर्व शिक्षक शिवलिंग क्षीरसागर सर, भारतीताई क्षीरसागर मॅडम, दिलीप तकीक सर, तन्वीर पठाण सर, श्री.बाळू काळे सर, उत्तरेश्वर भारती सर,अनिल लेहने सर, सुनिता चौधरी मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,संजीवनी पवळ मॅडम ,गणेश भागडे सर,कविता घोडके मॅडम,अजीजराजा शेख सर,सिमा उदगीरकर मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम, शहेबाज शेख सर बालवाडीच्या देशमुख मॅडम यांनी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त विविध कविता सादर करून मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.मराठी भाषेचे सौदंर्य कवितेतून फुलते.परिस्थितीचे वास्तविक चित्रण शब्दांमध्ये शब्दबद्ध करणे हा हातखंडा वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा राहिला.अनेक प्रसिद्ध कविता, साहित्य लेखन करून मराठी भाषेला त्यांनी समृद्ध केले.त्यांच्या कविता आजही आपल्या मनामनामध्ये घर करून आहेत हेच त्यांचे लेखन वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितेत रस, आनंद, भावना यांचा संगम असतो असे अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त करून मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच कुसुमाग्रजांच्या कार्याला वंदन करून कुसुमाग्रजांची 'मौन' ही कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांचे सहकार्य लाभले.सुंदर असे सूत्रसंचालन अजिंक्य चांदणे सरांनी केले तर आभार रिता वाघमारे मॅडम यांनी मानले.

Sunday, 26 February 2023

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२३

 *मराठी कवितेतून भाषेचे


सौदंर्य फुलते*- सौ. किर्तीताई पांगारकर

(बीड प्रतिनिधी)दि.२७ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत जेष्ठ कवि वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतनिमित्ताने आयोजीत केलेल्या मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर आधारित प्रास्ताविकपर मनोगत श्री.अशोक काशीद सरांनी व्यक्त केले. कुसुमाग्रजांच्या आठवणीतील काव्यातील अजरामर अशी 'कणा' ही कविता श्री.विवेक गव्हाणे सरांनी गाऊन या कवितेचे शब्द,भाव चित्रण स्पष्ट केले.शाळेतील अनेक मुला-मुलींनी मराठी पाठ्यक्रमातील कविता गायन केले.शाळेतील सर्व शिक्षक शिवलिंग क्षीरसागर सर, भारतीताई क्षीरसागर मॅडम, दिलीप तकीक सर, तन्वीर पठाण सर, श्री.बाळू काळे सर, उत्तरेश्वर भारती सर,अनिल लेहने सर, सुनिता चौधरी मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,संजीवनी पवळ मॅडम ,गणेश भागडे सर,कविता घोडके मॅडम,अजीजराजा शेख सर,सिमा उदगीरकर मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम, शहेबाज शेख सर बालवाडीच्या देशमुख मॅडम यांनी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त विविध कविता सादर करून मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.मराठी भाषेचे सौदंर्य कवितेतून फुलते.परिस्थितीचे वास्तविक चित्रण शब्दांमध्ये शब्दबद्ध करणे हा हातखंडा वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा राहिला.अनेक प्रसिद्ध कविता, साहित्य लेखन करून मराठी भाषेला त्यांनी समृद्ध केले.त्यांच्या कविता आजही आपल्या मनामनामध्ये घर करून आहेत हेच त्यांचे लेखन वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितेत रस, आनंद, भावना यांचा संगम असतो असे अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त करून मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच कुसुमाग्रजांच्या कार्याला वंदन करून कुसुमाग्रजांची 'मौन' ही कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांचे सहकार्य लाभले.सुंदर असे सूत्रसंचालन अजिंक्य चांदणे सरांनी केले तर आभार रिता वाघमारे मॅडम यांनी मानले.


संत गाडगेबाबा जयंती २३ फेब्रुवारी२०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबांची जयंती साजरी*

(बीड प्रतिनिधी)- दि.२३फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा आढावा शाळेचे श्री.अशोक काशीद सरांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना करून दिला. देव दगडात नाही, अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे. संत गाडगेबाबा  यांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संताने अंधश्रध्देला प्रखर विरोध केला.अनेक प्रसंगी स्वतः पुढाकर घेऊन सामान्य माणसांना अंधश्रध्देपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले असे प्रतिपादन आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर विचारांतून  श्री.बाळू काळे सरांनी  मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेतील मंगल क्षीरसागर मॅडम, महानंदा मुंडे मॅडम,तन्वीर पठाण सर, अजिंक्य चांदणे सर,शैला बावसकर मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम,श्री. उत्तरेश्वर भारती सर, शिवलिंग क्षीरसागर सर, दिलीप तकीक सर, अजीजराजा शेख सर, वर्षा म्हेत्रे मॅडम, विवेक गव्हाणे सर ,सुनीता चौधरी मॅडम ,संजीवनी पवळ मॅडम, शारदा बहिरमल मॅडम, अनिल लेहने सर,कविता घोडके मॅडम यांनी संत गाडगेबाबा यांची माहिती विद्यार्थ्यांना भाषणांतून करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय समारोपातून स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रध्देचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला.असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय.समाजजागृती मध्ये गाडगेबाबांचे योगदान महत्वाचे आहे.माणसातील देव ओळखायला शिका.प्राणीमात्रांवर दया करा. निसर्गावर प्रेम करा.असे ते कीर्तनातून लोकांना सांगत होते.गाडगेबाबांच्या हातातील झाडूंनी कमाल केली.स्वच्छतेचा मंत्र त्याचबरोबर लोकांच्या वैचारिकतेला स्वच्छ केले.दिवसभर गाव स्वच्छ करायचे तर रात्री स्वतःच्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोकी,लोकांचे विचार स्वच्छ करण्याचे काम संत गाडगेबाबांनी त्या काळामध्ये केले.समाज सुधारण्यासाठी समाजातील तळागाळात त्यांनी वैचारिकतेचा प्रकाश टाकला.असे मौलिक विचार,विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे खास सूत्रसंचालन  गणेश भागडे सरांनी केले तर उपस्थित अध्यक्ष, प्रमुख  पाहुणे यांचे आभार मनिषा चौधरी  मॅडम यांनी मानले.







Sunday, 19 February 2023

विनायक प्राथमिक शाळेचा वार्षिक अहवाल २०२२-२३

 विघ्नहर्ता श्री गणराया व विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी यांना वंदन करून, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत व विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचाराने प्रेरित होऊन विनायक प्राथमिक शाळेचे कार्य अविरत चालू असते. त्यानुरूप शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालाचा आढावा घेऊयात.आपल्या शाळेत येणारा विद्यार्थी हा झोपडपट्टी भागातील तसेच मराठी माध्यमाचा असल्यामुळे इंग्रजी भाषेचे आकलन होण्यास वेळ लागतो. यासाठी इयत्ता १ली  व २री च्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयाचे वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अध्यापन करण्यात आले.अभ्यास एके अभ्यास म्हटलं की मुलांना कंटाळा येतो त्याच्या जोडीला खेळही हवेतच. खेळातूनच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाला वाव मिळतो व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते त्यादृष्टीने सालाबादाप्रमाणे शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापुरुषांविषयी आदर निर्माण व्हावा याकरिता प्रशालेमध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने उपक्रमशील प्रयोग म्हणून सर्व कार्यक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन आमच्या विद्यार्थ्यांकडूनच करून घेतले जाते. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सवा प्रतिची खरीखुरी अपेक्षा पूर्ततेचा प्रयत्न करण्याचा प्रयास आमच्याकडून केला जातो. त्यानुरूप गणेशोत्सव साजरा करत असताना विविध स्पर्धाबरोबर समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांची प्रेरणा जागृत करण्याचे कार्य प्रशालेच्या वतीने केले जाते व त्याबरोबर सांस्कृतिक वारसा जपण्याच्या हेतूने पारंपारिक वाद्यांच्या मदतीने श्रींची मिरवणूक लेझीम पथकासह साजरी केली. तसेच राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन, रस्ता सुरक्षा दिन, जागतिक एड्सदिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सका मार्फत राबविण्यात आलेल्या एड्स रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग.विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थी जेवढा महत्त्वपूर्ण आहे तेवढाच शिक्षकही. अध्ययन-अध्यापन कार्याबरोबर कृतिशील शिक्षक खऱ्या अर्थाने या शैक्षणिक कार्याला एक नवी दिशा देऊ शकतो, म्हणूनच आम्ही अशा कृतिशील शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी कृतिशील शिक्षक पुरस्कार देतो शाळेचा विकास व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव मा. श्री.जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी निरंतर प्रयत्न करत असतात. तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षण निदेशक, संगणक निदेशक, प्रयोगशाळा सहाय्यक व शिक्षकेतर कर्मचारी सदैव परिश्रम घेत असतात, त्यामुळेच शाळेने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अशी ही बीड शहरातील एक  उपक्रमशील विनायक प्राथमिक शाळा होय. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर मॅडमनी आपल्या "किर्ती"नावाप्रमाणे प्रखरतेने व तेजाने नव वर्गरुपी ग्रहांची माला यशस्वीरीत्या सांभाळून कार्यक्षमपणे येणाऱ्या अडचणींवर मात करत आमच्यासाठी नेतृत्व व मार्गदर्शन करत असतात. यातूनच आमचा शाळारूपी रथ अविरत यशस्वीपणे घौडदौड करतो आहे.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक व प्रोत्साहनात्मक मदत वेळोवेळी करत असतात आणि त्यांचे सामाजिक भान ठेऊन समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थी व खेळाडूंना नेहमीच सहकार्य करत असतात. विद्यार्थी हा घडत असतो तो म्हणजे घर, शाळा आणि समाजामध्ये. या दृष्टीने शाळा सह-शालेय उपक्रमांचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना निसर्गसौंदर्याचा व पर्यटनस्थळांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या शाळेची इयत्ता१ ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय सहलीचे शिवदरा,शांतीवन, बिंदुसरा तळे येथे आयोजन करण्यात आले.

स्व. सोनाजीराव क्षीरसागर यांची जयंती१५ फेब्रुवारी२०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत स्व. सोनाजीराव क्षीरसागर यांची जयंती साजरी*

बीड प्रतिनिधी)-दि.१५ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना यांचा जयंती साजरी करण्यात आली.स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी करून अभिवादन केले. यावेळी  शाळेतील सर्व  शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शाळेचे शिक्षक अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सरांनी स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदानाची माहिती शाळेतील  विद्यार्थ्यांना करून दिली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना हे एक उत्तम पैलवान होते,व्यायामाची आवड असल्यामुळे भारदस्त शरीरयष्टीचे मल्ल सुप्रसिद्ध होते.आपल्या पत्नीला राजकीय योगदानाची संधी देण्यात सिहांचा वाटा त्यांचा होता.स्वतःपाठीमागे राहून स्व.केशरकाकूंना राजुरीच्या सरपंच पदापासून ,बीड पंचायत समिती सभापती,सलग तीन वेळेस बीडच्या खासदार,आशिया खंडातील पहिल्या महिला गजानन साखर कारखान्याच्या अध्यक्षा,शैक्षणिक संस्था अशा विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये स्व.सोनाजीराव क्षीरसागरांची भक्कम अशी साथ लाभली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना लोकनेत्या स्व.केशरकाकूंचे एक आधारस्तंभ होते.ग्रामीण भागामधील लोकांना आयुर्वेदिक वनऔषधी सांगत होते.आपल्या परिवारावर त्यांचा धाक होता,दबदबा होता म्हणूनच त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केले.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून आपल्या भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या.या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रतिभा वाघमारे मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती बहिरमल शारदा मॅडम यांनी मानले.



डॉ. भारतभूषण क्षीरसागर वाढदिवसाच्या निमित्ताने विविध स्पर्धा १६ फेब्रुवारी २०२३

 *डॉ.भारतभूषण क्षीरसागरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्रिडा स्पर्धा संपन्न*

बीड दि-१६ फेब्रु.( बीड प्रतिनिधी)- बीड नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील पेठ बीड भागातील विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  संगीत खुर्ची, चित्रकला, थैली रेस, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व मुलामुलींनी सहभाग घेऊन अध्यक्ष साहेबांचा वाढदिवस  उत्साहात साजरा केला. यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर साहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची माहिती करून देण्यात आली.या स्पर्धेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाची साथ राहिली.


































शिवजयंती १९ फेब्रुवारी २०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी*

(बीड प्रतिनिधी)- दि.१९ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील शिक्षिकांनी शिवजन्मोत्सव च्या निमित्ताने शिवरायांचा पाळणा गायला गेला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून शिवरायांच्या नामाचा गजर करण्यात आला.