Monday, 28 November 2022

महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी२८ नोव्हेंबर २०२२

 *महात्मा ज्योतिबा फुलेंनी गरीब व निर्बलांना न्याय दिला*- सौ. किर्तीताई पांगारकर

 दि- २८ नोव्हेंबर( बीड प्रतिनिधी) शहरातील विनायक प्राथमिक शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त  आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे श्री.तन्वीर पठाण सर ,श्री.अशोक काशीद सर, दिलीप तकीक सर, भारती क्षीरसागर मॅडम.शैलजा बावसकर मॅडम, महानंदा मुंडे मॅडम, उत्तरेश्वर भारती सर, सुनिता चौधरी मॅडम,यांच्या शुभहस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यांचा आढावा श्री.शेख शहेबाज सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केला.विविध विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील मुलांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची केलेली वेशभूषा लक्ष वेधून घेत होती. अनिष्ठ रूढी परंपरेला न जुमानता क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी,स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले अजरामर होऊन गेले असे मौलिक विचार प्रमुख पाहुणे शाळेचे शिक्षक श्री. तन्वीर पठाण सर यांनी व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ. संजीवनी पवळ मॅडम, मनीषा चौधरी मॅडम, श्री. गव्हाणे विवेक सर, शैलजा बावस्कर मॅडम , शारदा बहिरमल मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम, महानंदा मुंडे मॅडम यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंच्या जीवनातील कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.स्त्री यांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, अनिष्ठ चालीरीती, समाजप्रबोधन, सामाजिक असमतोल नसावा, सर्व धर्म समभाव अशा विचारांची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले एक असामान्य विचारवंत, समाजसुधारक होऊन गेले. चूल आणि मूल या चौकटीत स्त्रियांना न ठेवता तिला स्वतंत्र करण्यासाठी खुप त्रास सहन केला अशा ज्योतिबा फुलेंमुळे आज महिला शिक्षित होऊन महत्वाच्या स्थानांवर कार्य करत आहेत, ज्योतिबांनी गरिबांना व निर्बलांना न्याय दिला.याचा अभिमान वाटतो असे आपल्या अध्यक्षीय समारोपीय सविस्तर मार्गदर्शनातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन व्यक्त केले. या  कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. अजीजराजा शेख सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले.








Saturday, 26 November 2022

संविधान दिन २६ नोव्हेंबर २०२२




 *विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा*

दि-२६नोव्हेंबर(बीड प्रतिनिधी)- विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार,संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेचे बाळू काळे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.  शाळेतील शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी भारतीय संविधानाचे विविध पैलू,संकल्पना याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.तन्वीर पठाण सर, अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर, शहेबाज शेख सर, प्रतिभा वाघमारे मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,सुनीता चौधरी मॅडम,मनिषा चौधरी मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर,अनिल लेहणे सर यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे प्रमुख होते.त्यांच्या अथक परिश्रमाने व अभ्यासाने आपल्याला २६ नोव्हेंबर १९४९ ला राज्यघटना मिळाली म्हणजेच संविधान मिळाले व प्रत्यक्षात ते अंमलात आणले.देशात राष्ट्रीय एकात्मता राहावी,आपले हक्क आपले सरकार ,आपली अभिव्यक्ती चे जतन आपल्याला संविधानाच्या निमित्ताने मिळतात म्हणून संविधान हे आपल्यासाठी, आपल्या देशात एकता, अखंडता राहण्यासाठी महत्वाचे आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.या संविधान दिनाच्या निमित्ताने  वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शाळेतील मुला मुलींनी विशेष सहभाग घेऊन प्राविण्य मिळवले.संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेतील मुला मुलींनी भारताचे संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली व तिचे तंतोतंत पालन करण्याची प्रतिज्ञा केली.

    हा संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार सिमा उदगीरकर मॅडम यांनी मानले

Sunday, 20 November 2022

विनायक प्राथमिक शाळेत सीईओ श्री. अजित पवार साहेबांची भेट

 *विनायक विद्यालयात श्री.अजित पवार साहेबांची सदिच्छा भेट*

(बीड प्रतिनिधी)- दि.१८ नोव्हेंबर रोजी विनायक प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेबांनी भेट दिली.त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंत मुंडे सर,आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा.राजाजी मचाले,मराठवाडा साथीचे संपादक श्री.चंदुलाल बियाणी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभू गोरे, प्रमुख व्याख्याते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शशिकांत कुलथे सर,मराठवाडा साथी चे जिल्हा प्रतिनिधी श्री.संदीप बेदरे या सर्वांची  विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रशांत पवळ सरांनी या सर्व अतिथी गणांचे शाळेच्या वतीने स्वागत केले व शाळेबद्दल ची माहिती करून दिली.शाळेच्या भौतिक सुविधा,शाळेच्या डिजीटल वर्गखोल्याची प्रत्यक्ष पाहणी करून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेब व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.यावेळी स्व. लोकनेत्या माजी खासदार केशरकाकूं क्षीरसागर व स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. अजित पवार साहेब व उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते करून व्याख्यानमालेचे उद्धघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्राचार्य प्रशांत पवळ सरांनी करून विनायक विद्यालयाचे शैक्षणिक कार्य, कल्पना, भविष्यातील विद्यार्थी घडवण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती करून दिली.अध्ययन अध्यापनातील संकल्पना राबवण्यासाठी शिक्षकांनी अधिकत्तर कौशल्यांचा अधिकाधिक वापर विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करून विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव दुर करण्यासाठी प्रयत्न केले तरच विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करेल अशी महत्वपूर्ण माहिती बीड जिल्ह्याचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. शशिकांत कुलथे सरांनी आपल्या विशेष व्याख्यानपर मनोगतातून व्यक्त केले. मी कसा घडलो? माझे शिक्षक मला महत्वाचे वाटते. त्यांनी दिलेले शिक्षण, आमच्याकडून करून घेतलेले परिसर कार्य आजही आठवतात.सरांनी आमच्याकडून उभारलेल्या शाळेच्या भिंतीच्या विटा आज मोठे झाल्यानंतर ही मी गावी गेल्यानंतर थांबून पाहतो व त्या आठवणी माझ्या मनात जाग्या करतो. शिक्षक हा महत्वपूर्ण असा घटक आहे त्यांनी अधिक प्रगतिशील राहून कार्य केले तर नक्कीच विद्यार्थी घडतील.विनायक विद्यालयात या स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमाला या उपक्रमाचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार साहेबांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून श्री.शशिकांत कुलथे सरांसारखे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आपल्या बीड जिल्ह्यातील आहे याचा खुप अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सरमल सरांनी केले तर उपस्थित अतिथी गणांचे विशेष असे आभार मराठवाडा साथी चे जिल्हा प्रतिनिधी श्री. संदिप बेदरे यांनी मानले.

Sunday, 13 November 2022

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन १४ नोव्हेंबर २०२२
















 *विनायक प्राथमिक शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी*

(बीड प्रतिनिधी)- दि.१४ नोव्हेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरुंच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे भारती क्षीरसागर मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर, शिवलिंग क्षीरसागर सर,वर्षा म्हेत्रे मॅडम, कविता घोडके मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,गणेश भागडे सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगतातून सिमा उदगीरकर मॅडमनी  पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.यावेळी शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून बाल दिन साजरा करण्यात आला. पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या अलौकिक कार्याची माहिती शाळेचे तन्वीर पठाण सरांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केली.मुलांना फुलाप्रमाणे समजणाऱ्या चाचा नेहरूंना मुलं खूप आवडायची असे  शाळेचे अशोक काशीद सरांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.समृद्ध भारत घडवायचा असेल तर मुलांच्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी आपण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीने बघितले पाहिजे. उद्याचे भविष्य या लहान मुलात आहे. त्यासाठी आपल्याला फुलाप्रमाणे मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रंग व आकार देऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी संकल्प करूया असे मौलिक विचार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांना वंदन करून आदरांजली व्यक्त केली.या बालकदिनाच्या निमित्ताने शाळेत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती संजीवनी पवळ मॅडमनी मानले.