Wednesday, 1 December 2021

विनायक प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव २०२१

 *विनायक प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत*

 (बीड प्रतिनिधी) - दि १ डिसेंबर २०२१ रोजी विनायक प्राथमिक शाळेत नवीन इयत्ता १ ली प्रवेशीत विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन करून उत्साहपूर्ण  वातावरणात शालेय कामकाजाची सुरुवात करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी नवीन प्रवेशीत मुला मुलीचे पुष्पगुच्छ देऊन स्वा










गत करून त्यांचा उत्साह वाढवला .खुप मोठ्या उत्साहात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रवेशोत्सव आयोजीत करून शालेय वातावरण  उत्साहपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.. याप्रसंगी विविध पालकांनी शाळेला भेट देऊन   शालेय व्यवस्थापनेचा आढावा घेऊन परिस्थिती जाणून घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती दर्शवली. शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नियोजनानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळेतील सर्व मुला मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन शाळेत नियमित उपस्थित राहावे असे अहवान करण्यात आले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहिले.


Monday, 1 November 2021

गिराम सरांचा निरोप समारंभ ३१/१०/२०२१

 *शांत,संयमी स्वभावाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक वैजीनाथ गिराम सर*-सौ.किर्तीताई पांगारकर                (बीड प्रतिनिधी) दि.३१ऑक्टोबर-या रोजी बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत जेष्ठ शिक्षक श्री.वैजीनाथ गिराम सरांचा सेवानिवृत्तीचा समारंभ आयोजित करण्यात आला. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे नानासाहेब जाधव, पत्रकार इम्रानजी शाह,मार्गदर्शिका सौ.भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व स्व. लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.श्री.गिराम सरांच्या व्यक्तिपरीचयाची ओळख आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून श्री.अशोक काशीद सरांनी करून दिली. वयाच्या ५८ व्या वर्षी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे गिराम सर एक असामान्य व्यक्तिमत्व,ग्रामीण शहरी भागामध्ये परिचित आहेत.अत्यंत गरिबीमधून पुढे येत शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केले असे विचार नानासाहेब जाधव साहेबानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.शाळेमध्ये हसत, खेळत रमणारे, मोकळ्या स्वभावांच्या गुणांनी पूर्ण असणारे व्यक्तिमत्व सदैव साधे,सरळपणे विद्यार्थ्यांना प्रिय राहिले असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सौ.भारती क्षीरसागर मॅडम यांनी मांडले. वैजीनाथ गिराम सरांच्या आठवणींचा, कार्याचा उजाळा श्री. तन्वीर पठाण सरांनी आपल्या मनोगतातून घेतला.शाळेचे शिक्षक श्री.गणेश भागडे सर,  अजिंक्य चांदणे सर, शिवलिंग क्षीरसागर सर, संजीवनी पवळ मॅडम या सर्वांनी वैजीनाथ गिराम सरांचे वेगवेगळे शाळेतील पैलू व त्यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून कौतुक केले.सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या कौतुक सोहळ्यासाठी,सर्व उपस्थित मित्रपरिवार,नातेवाईक यांच्या उपस्थितीने वैजीनाथ गिराम सरांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांसाठी आयुष्यभर त्यांच्यासाठीच कार्य करेल असे प्रतिपादन सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री.वैजीनाथ गिराम सरांनी आपल्या भाषणातून विचार मांडले. वयोमानानुसार निवृत्त जरी झाला असताल तरी विनायक परिवाराच्या मनामधून निवृत्त नाही झालात. दिलेल्या जबाबदाऱ्या,दिलेलं काम तितक्याच विनम्रपणे स्वीकारून  पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे गिराम सर शांत,संयमी स्वभावाचे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून कार्यरत राहीले.या सेवानिवृत्ती नंतर त्यांची उणीव विनायक प्राथमिक शाळेला नक्कीच भासेल असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी वैजीनाथ गिराम सरांचे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार या सर्वांनी सरांचा सत्कार करून उपस्थिती दर्शवली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा सेवानिवृत्तीचा  कार्यक्रम संपन्न झाला.हा सेवानिवृत्ती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री.बाळू काळे सरांनी मानले..






*आज आपल्या शाळेचे जेष्ठ शिक्षक ,शांत संयमी व्यक्तिमत्व श्री. वैजीनाथ गिराम सर यांच्या सेवनिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे..... गिराम सरांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद.. आज आपण श्री. गिराम सरांना  शाळेतून निरोप  देतोय..  गिराम सरांनी विनायक प्राथमिक शाळेत गेली २८ वर्ष,४महिने,१६ दिवस अशी प्रदीर्घ सेवा केली.. बीड तालुक्यातील भवानवाडी या छोट्याशा गावांमध्ये दि. ५/१०/१९६३ ला एका गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला.. त्यांच्या वडिलांचे नाव भागूजी विठोबा गिराम व आईचे नाव गंगुबाई भागूजी गिराम. त्यांच्या आईवडिलांनी मोलमजुरी करून त्यांना घडवले, शिकवले.. गिराम सरांच्या वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गिराम सरांच्या आईचे निधन झाले.. तेंव्हापासून त्यांच्या वडिलांनी व त्यांच्या मोठ्या तीन भावांनी मोठे कष्ट करून त्यांना शिक्षणासाठी पुढे केले.. स्व. केशरकाकू क्षीरसागर, व जयदत्त (अण्णा) क्षीरसागर साहेब जेंव्हा १९९३ ला शिवणी भवानवाडी साठवण तलावाच्या परिसरात जनावरांच्या चारा छावणीच्या उद्धघाटनाला गेले होते तेंव्हा त्याकाळचे भवानवाडी या गावचे सरपंच प्रल्हादराव जगताप यांच्या शिफारशीनुसार अण्णासाहेबांनी दुसऱ्याच दिवशी विनायक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीची ऑर्डर दिली.आज गिराम सरांचा परिवार खूप मोठा आहे. तीन मोठे भाऊ, दोन बहिणी, पत्नी,दोन मुले, न एक मुलगी,जावई,नातवंडे असा मोठ्या सुखात आहे याचा अभिमान मला वाटतोय..एका मुलाने बी.एस्सी.केले तर दुसरा मुलगा कॉम्पुटर इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षात आहे... तस पाहिलं तर गिराम सरांचे विनायक प्राथमिक शाळेत महत्वपूर्ण योगदान राहिले.. शाळेतील मुलांच्या आणण्या,सोडण्यापासून तत्परतेने जबाबदारी त्यांनी स्विकारुन चांगले संस्कारमय अध्यापन कार्य केले त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे..आज नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होतायत.. खुप दुःखही वाटतेय..! एक विनायक परिवारातील एक आधार असणारे जेष्ट शिक्षक उद्या शाळेत वर्गामध्ये मुलांना शिकवताना दिसणार नाहीत .. ही खंत वाटतेय*.. *पण त्याला सामोरे जावेच लागेल..! गिराम सरांचे शैक्षणिक कार्य चांगले राहिले, शांत, संयमी,धीरोदत्त स्वभाव असे अंगी असणारे गुण आम्हाला आदर्श देऊन जाईल.. तुमची उणीव शाळेत नेहमीच भासेल..*! *तुम्ही आज निरोप घेताय आमचा, आले भरूनिया डोळे...     २८ वर्षांतील दिवस बनले,स्मृरणांच्या पुस्तिकेतील पाने*.... *शाळेसाठी तुम्ही दिलेले योगदान नेहमीच आठवणीत सदैव राहील*......... *निरोप तुम्हांला देतांना शब्द गोठून गेले,शाळेचे तुमच्या कामातून व्यक्त होऊन गेले*                             *आज निरोप देतांना तुम्हांला, आले डोळे भरून, देवाकडे आता एकच प्रार्थना, इच्छा साऱ्या तुमच्या द्यावा पूर्ण करून..*     गिराम सर मी *पाहिलं तुम्हांला आदर्शांचा गाडा हाकताना, स्वाभिमानी जगतांना, प्रेमाने पाठीवर हात फिरवताना, संस्काराच्या वेळी विद्यार्थ्यांना रागावतांना,संकटात वादळ थोपवतांना*... *असे बरेच अनुभव वेळोवेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देतांना,अध्यापन कार्य करतांना शाळेला मिळाले*.                              *निरोपाचा क्षण जणू, हळव्या त्या फुलांचा,आठवांची जणू गर्दी, क्षण हा विरहाचा*...                                *नको नको वाटे निरोप, घेऊन येतो दुःखद क्षण, पण ते गाठण्या यशोशिखर , घेऊ शपथ प्रत्येक जण*..                                       *निरामय आरोग्यदायी, निखळ आयुष्य जगा ही सदिच्छा, निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तुम्हांला शुभेच्छा..*                        *जीवनाचा आनंद पुरेपूर मिळावा, नाताच्या सुरांमध्ये सूर तुमचा जुळावा...*                                    *सर्व त्या इच्छा पूर्ण आता करा, जीवनाचा कलश आनंदाने भरा*..  *या शाळेच्या आठवणींनी कधी मन भरून येईल, नाताच्या बोबड्या बोलात विरघळून जाईल*...                                    *असं नाही म्हणत मी आम्हांला पूर्ण विसरून जा...काही क्षण तुमचे शाळेसाठीही द्या...*              *पूर्ण होवोत तुमच्या पुढील मनातल्या इच्छा... पुढील आयुष्यासाठी तुम्हांला खुप खूप शुभेच्छा*...! .......धन्यवाद......

Sunday, 17 October 2021

आदर्श मुख्याध्यापिका

 *मुख्याध्यापक* 

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

सोप नसतं राव..

शाळेचा मुख्याध्यापक होणं

आईच्या मायेनं

प्रत्येकाला समजावुन घेणं


नाराज होतात काही

कितीही राहा राईट

मुख्याध्यापकांना त्यावेळी

किती वाटत वाईट


जरी त्यांची त्यात

काहीच नसते चुक

तरी सुद्धा त्यांना

राहाव लागतय मुक


सर्वाचे हित त्यांना

मनात धरावे लागते

इच्छा नसली तरीही

एखाद्याला नाराज करावे लागते


काही सन्माननीय शिक्षक

कायम असतात गप्प

शाळेचा कारभार तेव्हा

होऊन जातो ठप्पं


तरी सुद्धा त्यांना

गप्प बसावं लागतं

इच्छा नसली तरीही

खोट खोट हसावं लागतं


प्रवास करावा सर्वानी पण

त्यांनाच भरावा लागतो टोल

चुकीच्या गोष्टीसाठी मात्र

त्यांनाच चुकवावे लागते मोलं


अल्पमतातील सरकार सारखं

त्याना निमुट बसाव लागत

कितीही चढला पारा तरी

शालिनतेनं राहाव व वागाव लागतयं


स्वत: सर्व सहन करुन

वसवतात जे आनंदाच गाव

माझ्या मते त्याचचं

मुख्याध्यापक हे नावं


बाकी सब कुछ बकवास है

अंधारलेल्या वाटेसाठी

मुख्याध्यापक असतात तारा

गुदमरणार्या जीवासाठी

मुख्याध्यापक असतात झुळझुळता वारा


रखरखणार्या वाळवंटातील

मुख्याध्यापक असतात हिरवळ

अंतराच्या कुपीतील

चहुकडे पसरणारा सुगंधी दरवळ


सुदाम्याच्या मनाची

मुख्याध्यापक असतात ओढ

शबरीच्या बोरा सारखच

मुख्याध्यापक असतात गोड


किलबिलणार्या पाखरांचा

मुख्याध्यापक असतात थवा

भळभळणार्या जखमांसाठी

मुख्याध्यापक असतात दवा


कोकिळेच्या कंठातील

मुख्याध्यापक असतात गीत

जणु यशोदा कृष्णाची

मुख्याध्यापक असतात प्रीत


कधी कधी फुल

तर कधी कधी अंगार

लढणार्या समशेरीची

मुख्याध्यापक असतात धार


*बहरणार्या प्रतिभेचा*

*मुख्याध्यापक असतात बहार*

*सरस्वतीच्या गळ्यातील*

*जणु अनमोल असा हार*


एक गोष्ट ध्यानात ठेवा

मुख्याध्यापक उगीचच नसतात

तुम्ही सर्व झोपी गेला तरी

मुख्याध्यापक सदैव जागेच असतात


कर्णासारख भरभरुन

मुख्याध्यापक सतत देतात दान

बघा बर किती मोठा

सर्वांना सतत देतात मान


*तुमच्या हाती हुकुमाचं*

*मुख्याध्यापक देतात पान*

*स्वत:च्या काळजात*

*मुख्याध्यापक देतात स्थान*


शब्दांच्या दरबारावर

मुख्याध्यापक देतात पहारा

जेव्हा कोणीच नसत तेव्हा

अडचणीत देतात सहारा


*वार्यावर झुलणार*

*मुख्याध्यापक असतात पातं*

*जीवापाड जपाव अस*

*यांच सर्वाशी असत नात*


अजुन काय व किती लिहु

बाकी सार काॅमन आहे

एवढचं म्हणतो शेवटी

मुख्याध्यापक सर तुम्हाला

त्रिवार वंदन आहे..



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹📚📚📚📚📚📚📚📚📚📚

Saturday, 9 October 2021

स्व. गोविंदराव मचाले मामा यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी पुण्यतिथी निमित्ताने आदरांजली वाहिली २०२१

 *एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.. ज्या व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी आज विनायक प्राथमिक शाळेत कार्य करत आहे,याचा अभिमान मला वाटतो ते म्हणजे स्व. गोविंदराव मचाले मामा . मामा म्हणजे एक समजूतदार व्यक्तिमत्व .. शैक्षणिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनुभवाला आलेले मामा खरंच अतुलनीय एक व्यक्तिमत्व मला भावले.*सगळ्यांना समजून घेणारं, आपलंसं वाटणारं नेतृत्व स्व. केशरकाकूंच्या  पाठीमागे खंभीरपणे  आधार देणारं व्यक्तिमत्व जे मी आदर्श मानते.. शांत संयमी स्वभाव  मी जवळून बघीतला आहे.. *कधी एखादी चूक झाली तर रागावून बोलणारी व्यक्ती गुण सुद्धा मी बघितला आहे.. आज तुमच्या या पावन स्मृती दिनानिमित्त मामांचे अलौकीक कार्य मला शब्द बद्ध करता येतील का नाही हे मला माहित नाही*.. *यामध्ये आज मी जे काही आहे स्व. गोविंदराव मचाले मामा यांचा सिंहाचा वाटा  आहे.. अलौकिक, अविस्मरणीय कार्य असणाऱ्या स्व. गोविंदराव मचाले मामांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन*..💐💐💐🙏🙏🙏.       *दुःखांकीत,*                                                      सौ. किर्ती पांगारकर/ सोळुंके


स्व.गोविंदराव मचाले मामा यांचा ८ वा स्मृतीदिन विनायक प्राथमिक शाळेत साजरा २०२१






 *स्व. गोविंदराव मचाले मामा एक भक्कम आधार देणारे व्यक्तिमत्त्व*- सौ. किर्तीताई पांगारकर(बीड प्रतिनिधी)-दि ८ ऑक्टोबर रोजी स्व.गोविंदराव मचाले मामा यांचा ८ व्या स्मृती दिनानिमित्ताने विनायक प्राथमिक शाळेत आदरांजली वाहण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते स्व. गोविंदराव मचाले मामा यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.भारतीताई क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये  करण्यात आले. स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्या शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, कार्याची ओळख जेष्ठ शिक्षक श्री.बाळू काळे सरांनी करून दिली.शाळेचे शिक्षक श्री.अशोक काशीद सर,श्रीमती भारतीताई क्षीरसागर,श्रीमती मंगल क्षीरसागर मॅडम,श्रीमती सिमा उदगीरकर मॅडम,श्रीमती प्रतिभा वाघमारे मॅडम,शेख शहेबाज सर यांनी स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.स्व. गोविंदराव मचाले मामा म्हणजे एक भक्कम आधार देणारे व्यक्तिमत्व स्व. केशरकाकू क्षीरसागरांचे भाऊ  होते.शांत,संयमी स्वभाव गुण असणारे, कधी चुकले तर रागावणारेही मामा मी जवळून पाहिले.स्व.काकूंच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असणारे गोविंदराव मचाले मामा अत्यंत दयाळू होते. त्यांचे शैक्षणिक,राजकीय, सामाजिक कार्य सदैव स्मृरणार्थ राहील अशी आदरांजली सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या भावना स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्या स्मृतिदिनी व्यक्त केल्या.या आदरांजली कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती राहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार श्री. तन्वीर पठाण सरांनी मानले.


Monday, 4 October 2021

स्व.केशरकाकू क्षीरसागर यांची १५ वी पुण्यतिथी विनायक प्राथमिक शाळेत साजरी.२०२१



 स्व.केशरकाकू क्षीरसागर एक














संघर्षशील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व*- सौ. किर्तीताई पांगारकर

दि.4 ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.बीड जिल्ह्याच्या माजी खा.लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांची १५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख  सौ.भारतीताई क्षीरसागर  यांच्या हस्ते स्व.केशरकाकू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.. प्रथम माजी खासदार  लोकनेत्या स्व.केशरकाकू यांच्या जीवनकार्याचा आढावा तन्वीर पठाण सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.गिराम सर , उत्तरेश्वर भारती, शारदा बहिरमल मॅडम, अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सर, मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम,महानंदा मुंडे मॅडम, मंगल क्षीरसागर मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,अजिंक्य चांदणे सर,अनिल लेहने सर, शहेबाज शेख सर,विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर ,अजीजराजा शेख सर यांनी स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर सादर केला, स्व.काकूंच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जडणघडणीत स्व .काकूंचा मोलाचा वाटा होता. आयुष्यभर त्या संघर्ष करत सामाजिक व राजकीय स्वतंत्र अस्तित्व त्यांनी आपले दाखवून दिले. गोरगरिबांची मुलं शाळेत शिकावी यासाठी त्यांनी खेडोपाड्यात शाळा सुरू केल्या आज हे शैक्षणिक जाळ खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. काकू नेहमी आपल्या शाळेतील अडचणी, प्रगती याबद्दल नेहमी विचारणा करायच्या.बीड जिल्ह्याच्या घराघरात काकू पोहचल्या होत्या. राजकीय, सामाजिक कार्यातून आपल्या स्वकर्तव्याने त्यांनी विविध संस्था, कारखाना, सूतगिरणी उभा केल्या यामागे काकूंचा दूरगामी विचार होता. माझ्या जीवनातील सदैव स्मृरणार्थी,माझं आदर्श व्यक्तिमत्व, माझी माया, ममता,माऊली काकूं आहेत.त्यांच्या विचारांचा गाढा आम्ही पुढे घेऊन जाऊ. स्व. केशरकाकू क्षीरसागर हे एक अनमोल व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे कार्य खूप महान होते.आज काकूंची १५व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी काकूंच्या आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.दिलीप तकीक सरांनी केले तर आभार श्रीमती रिता वाघमारे मॅडम यांनी मानले..

Saturday, 2 October 2021

विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.२०२१


 विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*...(बीड प्रतिनिधी)-दि-२ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, सौ.भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा  श्री.पठाण तनवीर सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले, भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे ,'जय जवान जय किसान' या घोषणेचे प्रणेते लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून श्री.अजीजराजा शेख सरांनी त्यांचे कार्य व्यक्त केले.गांधीजी हे एक अनमोल रत्न भारतास लाभले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती श्री.अजिंक्य चांदणे सरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत श्री.अशोक काशीद सरांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले.सत्य, अहिंसा, सहिष्णुता अंगी असणारे महात्मा गांधीजी भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधींच्या जीवनातील भारताच्या स्वतंत्र चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहेत त्यांचे कार्य भारताच्या इतिहासात ओळखले जाते.गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.भागडे सरांनी केले तर आभार श्री.गव्हाणे सरांनी मानले..

Friday, 17 September 2021

विनायक प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर२०२१


 *विनायक प्राथमिक शाळेत ७४ वा  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा*.

  (बीड प्रतिनिधी)-दि.१७ सप्टेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला.

  या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सर,सौ.भारती क्षीरसागर,शाळेचे पर्यवेक्षक अमरापूरकर सर, सचिन भोज सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सरदार वल्लभभाई पटेल व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ,गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमांचे पूजन  करून ध्वजारोहण करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे महत्व विशद केले.मराठवाडा निजामांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ यांचे कार्य खुप महान होते म्हणूनच भारताच्या  स्वातंत्र्यानंतर मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सरांनी ही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तन्वीर पठाण सरानी केले तर उपस्थितांचे आभार श्री.शिवलिंग क्षीरसागर सरांनी मानले.