*विनायक प्राथमिक शाळेत ७४ वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा*.
(बीड प्रतिनिधी)-दि.१७ सप्टेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सर,सौ.भारती क्षीरसागर,शाळेचे पर्यवेक्षक अमरापूरकर सर, सचिन भोज सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सरदार वल्लभभाई पटेल व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ,गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे महत्व विशद केले.मराठवाडा निजामांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ यांचे कार्य खुप महान होते म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सरांनी ही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तन्वीर पठाण सरानी केले तर उपस्थितांचे आभार श्री.शिवलिंग क्षीरसागर सरांनी मानले.
No comments:
Post a Comment