*विनायक प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा*
दि.5 सप्टेंबर-(बीड प्रतिनिधी)- विनायक प्राथमिक शाळेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे जेष्ठ शिक्षिका सौ.मंगल क्षीरसागर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या शिक्षक दिनाचे महत्व, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा शाळेचे शिक्षक श्री.तन्वीर पठाण सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त करून दिला.शाळेतील छोट्या छोट्या मुलां-मुलीनी शिक्षक दिना प्रसंगी ऑनलाईन विडिओ च्या माध्यमातून आपल्या शिक्षकांप्रति आदर,भावना व्यक्त करून, शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश देऊन स्वागत केले.शिक्षकांचा आदर आपण सन्मानाने करतो कारण संस्कार व जगण्यासाठी विनम्रता आपल्या अंगी बिंबवण्याचे काम शिक्षक करत असतात. आयुष्याच्या सुरुवातीपासून दिशा, मार्ग, संस्कार, शिस्त व कल्पना अंगी बाळगून शिक्षक सदैव परिश्रम घेत असतात त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो आपल्या मार्गदर्शनपर भाषणांतून शिवलिंग क्षीरसागर सरांनी विचार व्यक्त केले.याप्रसंगी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेतील श्री.अशोक काशीद सर,श्री.बाळू काळे सर, बावस्कर मॅडम,अजिंक्य चांदणे सर,विवेक गव्हाणे सरांनी शिक्षक दिना निमित्ताने मनोगत व्यक्त केले.शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कार, ज्ञान, दिशा देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.समता,बंधुता,राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महत्त्व पूर्ण योगदान शिक्षकांचे आहे.गुरुशिवाय आपण काहीच नाहीत,जीवनाच्या प्रवासात आई वडिलांबरोबर प्रमुख गुरू म्हणून शिक्षक असतात, कुंभार जसा चिखलाला आकार देऊन जसा घडवतो तसा शिक्षक मुलांना चांगले शिक्षण,शिस्त, मार्गदर्शनरुपी आकार देऊन घडवीत असतो,शिक्षकांचे योगदान सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात खुप मोठे आहे.राष्ट्रविकासाच्या प्रगतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्य समस्त शिक्षकांना प्रेरणा देते.शक्ती देते,सामर्थ्य देते.'आज मी जे घडले त्या माझ्या शिक्षकांमुळेच म्हणून त्यांचा हा विचार,ध्येय प्रामाणिकपणे पुढे चालवुन आपण सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन घडवू 'असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्या व्यक्त केल्या.शिक्षक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ.सिमा उदगीरकर मॅडम यांनी केले तर श्री. गणेश भागडे सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment