Saturday, 9 October 2021
स्व.गोविंदराव मचाले मामा यांचा ८ वा स्मृतीदिन विनायक प्राथमिक शाळेत साजरा २०२१
*स्व. गोविंदराव मचाले मामा एक भक्कम आधार देणारे व्यक्तिमत्त्व*- सौ. किर्तीताई पांगारकर(बीड प्रतिनिधी)-दि ८ ऑक्टोबर रोजी स्व.गोविंदराव मचाले मामा यांचा ८ व्या स्मृती दिनानिमित्ताने विनायक प्राथमिक शाळेत आदरांजली वाहण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते स्व. गोविंदराव मचाले मामा यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.भारतीताई क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले. स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्या शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, कार्याची ओळख जेष्ठ शिक्षक श्री.बाळू काळे सरांनी करून दिली.शाळेचे शिक्षक श्री.अशोक काशीद सर,श्रीमती भारतीताई क्षीरसागर,श्रीमती मंगल क्षीरसागर मॅडम,श्रीमती सिमा उदगीरकर मॅडम,श्रीमती प्रतिभा वाघमारे मॅडम,शेख शहेबाज सर यांनी स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.स्व. गोविंदराव मचाले मामा म्हणजे एक भक्कम आधार देणारे व्यक्तिमत्व स्व. केशरकाकू क्षीरसागरांचे भाऊ होते.शांत,संयमी स्वभाव गुण असणारे, कधी चुकले तर रागावणारेही मामा मी जवळून पाहिले.स्व.काकूंच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असणारे गोविंदराव मचाले मामा अत्यंत दयाळू होते. त्यांचे शैक्षणिक,राजकीय, सामाजिक कार्य सदैव स्मृरणार्थ राहील अशी आदरांजली सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या भावना स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्या स्मृतिदिनी व्यक्त केल्या.या आदरांजली कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती राहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार श्री. तन्वीर पठाण सरांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment