Saturday, 25 January 2020

विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यशवंतराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...२०२०

*विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांना 'यशवंतराव होळकर' आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*...
दि-१९ जानेवारी(बीड प्रतिनिधी) शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठान चा राजे 'यशवंतराव होळकर' राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांना बीड जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री मा.जयदत्त (अण्णा)क्षीरसागर साहेब, समाजसेविका सिंधुताई सपकाळ,मा.माजी मंत्री महादेव जानकर यांच्या शुभहस्ते आज बीड येथे प्रदान करण्यात आला यावेळी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील, विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांची उपस्थिती होती.जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठानचा हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहात बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे संपन्न झाला..।

No comments:

Post a Comment