Friday, 3 January 2020

विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी..२०१९



*विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*
बीड- दि.३जानेवारी(बीड प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस विनायक प्राथमिक शाळेत 'बालिका दिन' म्हणून साजरा करण्यात आला.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विद्येची देवता सरस्वती, लोकनेत्या माजी खासदार सौ. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.शाळेतील सर्व मुलींचे बालिका दिनाचे औचित्य साधून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा शाळेचे शिक्षक श्री.अनिल लेहणे सरांनी प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील काही मुली सावित्रीबाई फुलें च्या वेषभूषेत आली होती व कार्यक्रमाचे खास लक्ष वेधत होती. सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जागर विविध मुला मुलींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यामध्ये कु.शेख माहीन गफार,होसमाने आस्था सुनील,आरे आरोही गणेश,चि.शेख समीर अब्बास,शेख अजमत गुलाब, शेख आरेज शकील,शेख सोफियान नसीर,आरे आदर्श गणेश,शेख जुनेद इस्माईल,सय्यद अलत्मश मुक्तार, गायकवाड कुणाल संदीप,पठाण कासीम कय्युम यांनी सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक शैक्षणिक योगदानाचे महत्व आपल्या भाषणांतून व्यक्त केले."जरी काळोख्या वाटा तरीही चालत सदैव जावे, जाता जाता या ओठावर, गीत क्रांतीचे गावे"या सावित्रीबाईंच्या कवितेतून शाळेच्या शिक्षिका संजीवनी पवळ मॅडमनी सावित्रीबाई फुलेंची महती गायली.शाळेतील शिक्षक अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर,बाळू काळे सर,शैला बावस्कर मॅडम,शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर,अमोल पाटोळे सर,गणेश भागडे सर,अजीजराजा शेख सर,भारती क्षीरसागर मॅडम,वर्षा म्हेत्रे



मॅडम,सुनिता चौधरी मॅडम,वैजीनाथ गिराम सर,मनिषा चौधरी मॅडम,अजिंक्य चांदणे सरांनी सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची ज्योत विद्यार्थी मनांमध्ये पेटवली.या महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले ते सावित्रीबाईंनी.समाजातील अज्ञान,अंधार दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी खुप कष्ठ घेतले.ज्ञानाची,शिक्षणाची ही गंगा मुलींना खुप लाख मोलाची आहे.सावित्रीबाईंच्या विचाराचा,सामाजिक विचारांचा, शैक्षणिक कामाचा हा अनमोल वारसा "आम्ही सावित्रीच्या लेकी पुढे नेऊ, त्यांच्या कर्तव्याचा जागर, स्त्रियांच्या मनामनात करवू,तुझे स्वप्न सावित्रीचे साकार करू"  सावित्रीबाईंच्या फुलेंच्या विचाराने प्रभावित होऊन स्व.लोकनेत्या माजी खा.केशरकाकू क्षीरसागरांनी एक महिला म्हणून केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गुणगौरव आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी भावना व्यक्त केल्या व सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची प्रेरणा,शक्ती,ऊर्जा देणाऱ्या स्फूर्ती गीतातून सावित्रीबाई फुलेंना आदरांजली वाहिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विवेक गव्हाणे सरांनी केले तर आभार शारदा बहिरमल मॅडम यांनी मानले.

No comments:

Post a Comment