Tuesday, 14 January 2020

विनायक प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी२०२०

विनायक प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*... 
दि-१२ जानेवारी (बीड प्रतिनिधी)- राष्ट्रमाता ,राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस सोहळा विनायक प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे श्री.उत्तरेश्वर भारती सर, वैजिनाथ गिराम सर,श्रीमती सुनीता चौधरी मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,भारती क्षीरसागर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करून जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रथम जिजाऊंचे स्फूर्ती गीत गाऊन विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. जिजाऊंच्या जीवन कार्य आदर्श,पराक्रम,स्वाभिमान, कर्तबगारी, विचार, सर्वधर्म समभाव असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आढावा श्री.अशोक काशीद सरांनी प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील विविध मुली जिजाऊंच्या वेशभूशा करून लक्ष वेधत जिजाऊंचे व्यक्तीमत्वास साकारत होत्या.शाळेतील शौर्य क्षीरसागर, अजमत शेख, समीर शेख, पठाण कासीम, आरे आरोही, शेख माहीन, आरे आदर्श, शेख आरेज, वेताळ पायल,गायकवाड कुणाल,होसमाने आस्था, या मुलांनी राजमाता जिजाऊं बद्दल आपले विचार व्यक्त केले.हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या कार्याने शिवरायांच्या रूपाने प्रत्यक्षात हिंदवी स्वराज्य स्थापन,साकार करून घेणाऱ्या जिजाऊ एक कर्तबगार राजमाता होत्या असे वैजीनाथ गिराम सरांनी आपल्या मनोगतातून जिजाऊंच्या कार्याला गौरविले. आपल्या स्वाभिमानाने कठोरातले कठोर रितशीर निर्णय क्षमता असणाऱ्या जिजामाता कधीच मागे हटल्या नाहीत असे जिजाऊंच्या कार्याचे वर्णन शाळेच्या श्रीमती बावस्कर मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.जिजाऊंच्या आदर्शरूपी, जनतेविषयी असणारी आत्मीयता,भावना आपल्या खास शैलीत भारती क्षीरसागर मॅडम यांनी मांडल्या. तन्वीर पठाण सरांनी शिवरायांना घडवणाऱ्या व हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन जनतेच्या मना मनातल्या आदर्श अशा जिजामाता खरोखरच एक महान राष्ट्रमाता होऊन गेल्या असे आपल्या अभ्यास पूर्ण विचारातून जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची सखोल माहिती मनोगतातून व्यक्त केली. श्रीमती सुनीता चौधरी मॅडम, बाळू काळे सर,दिलीप तकीक सर,शिवलिंग क्षीरसागर सर,अजीजराजा शेख सर,अजिंक्य चांदणे सर, विवेक गव्हाणे सर,अमोल पाटोळे सर, अनिल लेहणे सर,प्रतिभा वाघमारे मॅडम,मनिषा चौधरी मॅडम,शारदा बहिरमल मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,सिमा उदगीरकर मॅडम,रिता वाघमारे मॅडम,मंगल क्षीरसागर मॅडम,महानंदा मुंडे मॅडम यांनी जिजाऊंच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले.राजमाता जिजाऊ यांच्या नावातच खासियत आहे.शिवरायांच्या आई जिजाऊ धन्य झाल्या,त्यांच्या पोटी शिवबांनी जन्म घेऊन जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न साकारले. शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता होत्या.स्वाभिमान, कर्तबगारीने, सडेतोड निर्णय क्षमता हे गुण त्यांच्या अंगी होते.जनतेला प्रेम, न्याय, जिंव्हाळा,आपुलकी दाखवणाऱ्या जिजाऊं खरोखरच एक रत्न व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात.आजही जिजाऊंच्या कार्याचे अभिमानाने गोडवे गायीले जाते असे त्यांचे महान कार्य आपल्याला प्रेरक, प्रेरणा देणारे उत्साह वाढवणारे आहे.जिजाऊ नसत्या तर नसते घडले शिवराय,नसते स्थापन करता आले हिंदवी स्वराज्य. निजामशाही,आदिलशाही, मुघलशाही उलथवून भारतीय मातृभूमीतून निष्ठेचा बाण निघावा आणि गणिमावर तो अग्नी म्हणून बरसावा असे केव्हढे अलौकिक शौर्य जिजाऊंच.इतिहासाच्या कालपटलावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमठवणाऱ्या एकमेव राजमाता, शिवरायांच्या माता आपणा सर्वांच्या राजमाता जिजाऊंना कोटी कोटी वंदन हे जिजाऊंचे आदर्श, प्रेरणा, विचार सदैव जिवंत ठेवू ,युवकांचे प्रेरणास्थान अभ्यासू स्वामी विवेकानंद यांचे कार्य खूप मोलाचे आहे त्यांचा जन्मदिवस आपण युवक दिन म्हणून साजरा करत आहोत आहे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदनाने करण्यात आली.जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खूप सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.गणेश भागडे सरांनी केले तर आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले.









No comments:

Post a Comment