Thursday, 18 August 2022

१५ आगस्ट २०२२

 *विनायक प्राथमिक शाळेत ७६ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा*

 बीड दि-१५ आगस्ट रोजी विनायक प्राथमिक शाळेत ७६ व्या स्वातंत्र दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर,माजी नगरसेवक अमोल पवळ,महेबूब बागवान, पत्रकार इम्रानजी शहा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व.लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व  श्री.बाळू काळे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून विद्यार्थ्यांना संभोधीत केले. शाळेतील विविध मुलामुलींनी, विद्यार्थी पालकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांची माहिती सांगितली.आझादी का अमृमहोत्सव म्हणजेच एक भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण असे आपल्या अध्यक्षीय विचारांतून सर्व उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे ,विद्यार्थ्यांना ७६ व्या स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा सौ. किर्तीताई पांगारकर यांनी दिल्या. यावेळी या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी  यांची उपस्थिती राहिली,. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थितीतांचें आभार तन्वीर पठाण सरांनी मानले..


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव १३ ऑगस्ट ते १५ आगस्ट २०२२



 *विनायक प्राथ.व माध्य. शाळेच्या 'हर घर तिरंगा' प्रभातफेरीने उत्साह वाढला*

 बीड दि.-१३ ऑगस्ट/(बीड प्रतिनिधी) बीड शहरातील पेठ बीड विभागातील अग्रगण्य असणाऱ्या विनायक प्राथमिक व माध्यमिक शाळेत भव्य अशा हर घर तिरंगा, देशाच्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त  तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे माजी शिक्षणाधिकारी तथा बीड जिल्हा परिषद शालेय पोषण आहाराचे अधिक्षक  श्री.अजयकुमार बहिर साहेब, आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.राजीव मचाले सर,पेठ बीड पोलीस निरीक्षक श्री. पालवे साहेब, विनायक प्राथमिक

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांतजी पवळ सर,बीड शिक्षण विभागाचे  चाटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य अशा तिरंगा यात्रेची प्रभातफेरी पेठ बीड विभागात निघाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या जयघोषणेने राष्ट्रीय ध्वज डोलाने फडकत राहिला. देशाची शान अन बाण ती एकच म्हणजे तिरंगा. या तिरंगा यात्रेने अवघा पेठ बीड परिसरामधील लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला.छोटी छोटी मुलं देशाच्या स्वातंत्र्याविषयी जयघोषणा करत राहिली. भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पाडण्यासाठी ,देशाचा राष्ट्रध्वज तिरंग्याचे महत्त्व लक्षात राहण्यासाठी घरोघरी तिरंगा प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी बीड जि.प.शालेय पोषण आहाराचे  अधीक्षक  श्री.अजयकुमार बहिर साहेबांच्या हस्ते,श्री.राजीव जी मचाले सर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी  विनायक प्राथमिक शाळेचे कब बुल बुल पथकातील मुला- मुलींचे कौतुक  श्री.अजयकुमार बहिर साहेबांनी केले. याप्रसंगी शाळेतील मुला मुलींना शालेय गणवेशाचे  वाटप  करण्यात आले.हर घर तिरंगा अभियानात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Wednesday, 3 August 2022

अण्णाभाऊ साठेजयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी १ ऑगस्ट २०२२

 *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळक एक प्रेरक समाजसुधारक-  किर्तीताई पांगारकर*

    (बीड प्रतिनिधी )-१ऑगस्ट या रोजी विनायक प्राथमिक शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे उत्तरेश्वर भारती सर,अजिंक्य चांदणे सर,अशोक काशीद सर, दिलीप तकीक सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन प्रतिभा वाघमारे मॅडमनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा सांगितला, त्यानंतर विविध लहान मुलां- मुलींनी या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले, प्रमुख वक्ते अजिंक्य चांदणे सरांनी  लोकमान्य टिळकांची राष्ट्रभक्ती, त्याग, प्रगल्भता, आक्रमकपणा, स्वाभिमानी बाणा या टिळकांच्या पैलूंवर प्रकाश टाकला तर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र लेखन, शाहीर, लोककला मातंग समाजातील यथार्थ चित्रण, शैक्षणिक, सामाजिक धोरण, अंगी असणारी शाहीरीतुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रवृत्त करणारी लेखनशैली खूप प्रेरणादायी आहे असे आपल्या भाषणांतून व्यक्त केले, त्यानंतर श्री. तन्वीर पठाण सरांनी आपल्या खास शैलीत दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनातील वास्तवता त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले, संगिता वडमारे मॅडम व शेख शेहेबाज सरांनी टिळकांचा बाणेदारपणा व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील गोष्टी बालकांना सांगून,टिळक व साठे यांचे चित्र डोळ्यासमोर आणून मार्गदर्शन केले,त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून, या महान व्यक्तिमत्वाच्या प्रभावी जीवनकार्याचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांच्या समोर उभा केले, टिळकांचा जहाल विचार व केलेले संघटन देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रेरक ठरले, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण, गरीबी, यामधून पुढे येऊन समाज जागृत करण्यासाठी लेखन कला, शाहीरी, कथा-कादंबऱ्या, पोवाड्याच्या माध्यमातून समाज जीवनाचं वास्तव दर्शन विशद केले दोन्हीही व्यक्तिमत्व एक प्रेरक समाजसुधारक म्हणून सदैव स्मृरणात राहील.या महान व्यक्तीला अभिवादन करण्यात आले.या पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन बाळू काळे सरांनी केले तर आभार शारदा बहिरमल मॅडम यांनी मानले....