*विनायक प्राथमिक शाळेत स्व. केशरकाकूंची जयंती साजरी*
दि. ३० मार्च -(बीड ) या रोजी बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत स्व. लोकनेत्या केशरकांकुची जयंती निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते स्व.काकूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मंगल क्षीरसागर मॅडम, शैलजा बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,महानंदा मुंडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती राहिली. शाळेतील विद्यार्थ्यांना स्व.केशरकाकूंच्या जीवनकार्याची ओळख आपल्या प्रास्ताविकपर विचारांतून श्री.तन्वीर पठाण सरांनी करून दिली.बीड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकनेत्या म्हणजेच ' केशरकाकूं' आजही सदैव आठवतात असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक श्री.बाळू काळे सरांनी स्व.केशरकाकूंच्या जीवनावर प्रकाश टाकून वातावरण स्तब्ध केले. शाळेतील मुलींनी ही स्व. काकूंच्या वेशभूषेत येऊन "मी कांकू बोलतेय" या विषयावर प्रत्यक्षपणे स्व.काकूंचे विचार, बोल, त्यांचा हावभाव करत बोलत होत्या. या जयंती निमित्त शाळेत वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.शाळेतील शिक्षकांनी स्व.काकूंच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आलेल्या अनुभवातून शब्दबद्ध केले.अलौकीक समाज कार्य करणाऱ्या 'कांकू' माझ्या सर्वस्व गुरू म्हणून पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या.माझ्या आदर्श आहेत. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकरानी भावना व्यक्त करून स्व. काकूंना आदरांजली वाहत मुलींनी केलेली काकूंची वेशभूषा पाहून कौतुक केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. गणेश भागडे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सिमा उदगीरकर मॅडम यांनी मानले.
No comments:
Post a Comment