*विनायक प्राथमिक शाळेचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न*
(बीड रिपोर्टर) दि.१२ मार्च-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२२ रोजी विनायक प्राथमिक शाळेचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई, लोकनेत्या स्व.माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सारिकाताई क्षीरसागर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षभरामध्ये राबवलेले शैक्षणिक उपक्रम, योजना, विविध आयोजित करण्यात आलेले अध्ययन, अध्यापनासाठी नवनवीन शैक्षणिक प्रयोग, संपूर्ण वार्षिक लेखाजोखा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून आढावा घेतला. वार्षिक कार्याची संक्षिप्त पुस्तकरूपी २०२१/ २२ या सत्रातील वार्षिक अहवालाचे प्रकाशन डॉ. सारीकाताई क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, सौ.भारतीताई क्षीरसागर, वार्षिक अहवाल लिहिणारे श्री. गव्हाणे सरांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षांचा शाळेने राबवलेल्या विविधांगी कार्याचा आढावा हा वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आला.. शाळेने राबवलेल्या संपूर्ण नियोजनपूर्वक कार्यासाठी सौ.सारिकाताई क्षीरसागर यांनी विशेष कौतुक केले. शाळेचा वर्षभराचा संपूर्ण कार्याचा आढावा ज्यांनी लिहिला त्या गव्हाणे सरांचे विशेष कौतुक केले.आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला भगिनींचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.या वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खुप सहकार्य केले. या वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. विवेक गव्हाणे सरांनी मानले...
No comments:
Post a Comment