Wednesday, 30 March 2022

स्व. लोकनेत्या केशरकाकूंची जयंती २०२२





 *विनायक प्राथमिक शाळेत स्व. केशरकाकूंची जयंती साजरी*

  दि. ३० मार्च -(बीड ) या रोजी बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत स्व. लोकनेत्या केशरकांकुची जयंती निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते स्व.काकूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मंगल क्षीरसागर मॅडम,  शैलजा बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,महानंदा मुंडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती राहिली. शाळेतील विद्यार्थ्यांना स्व.केशरकाकूंच्या जीवनकार्याची ओळख आपल्या प्रास्ताविकपर विचारांतून श्री.तन्वीर पठाण सरांनी करून दिली.बीड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकनेत्या म्हणजेच ' केशरकाकूं' आजही सदैव आठवतात असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक श्री.बाळू काळे सरांनी स्व.केशरकाकूंच्या जीवनावर प्रकाश टाकून वातावरण स्तब्ध केले. शाळेतील मुलींनी ही स्व. काकूंच्या वेशभूषेत येऊन "मी कांकू बोलतेय" या विषयावर प्रत्यक्षपणे स्व.काकूंचे विचार, बोल, त्यांचा हावभाव करत बोलत होत्या. या जयंती निमित्त शाळेत वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.शाळेतील शिक्षकांनी स्व.काकूंच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आलेल्या अनुभवातून शब्दबद्ध केले.अलौकीक समाज कार्य करणाऱ्या  'कांकू' माझ्या सर्वस्व गुरू म्हणून पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या.माझ्या आदर्श आहेत. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकरानी भावना व्यक्त करून स्व. काकूंना आदरांजली वाहत मुलींनी केलेली काकूंची वेशभूषा पाहून कौतुक केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. गणेश भागडे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सिमा उदगीरकर मॅडम यांनी मानले.

Monday, 14 March 2022

विनायक प्राथमिक शाळेचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा..८ मार्च २०२२

 *विनायक प्राथमिक शाळेचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न*


(बीड रिपोर्टर) दि.१२ मार्च- 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२२ रोजी  विनायक प्राथमिक शाळेचा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई, लोकनेत्या स्व.माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या  डॉ. सारिकाताई क्षीरसागर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षभरामध्ये राबवलेले शैक्षणिक उपक्रम, योजना, विविध आयोजित करण्यात आलेले अध्ययन, अध्यापनासाठी नवनवीन शैक्षणिक प्रयोग, संपूर्ण वार्षिक लेखाजोखा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून आढावा घेतला. वार्षिक कार्याची संक्षिप्त पुस्तकरूपी २०२१/ २२ या सत्रातील वार्षिक अहवालाचे प्रकाशन डॉ. सारीकाताई क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, सौ.भारतीताई क्षीरसागर, वार्षिक अहवाल लिहिणारे  श्री. गव्हाणे सरांची प्रमुख उपस्थिती होती.  जागतिक महिला दिनाचे औचित्य  साधून शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षांचा शाळेने राबवलेल्या विविधांगी कार्याचा आढावा हा वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आला.. शाळेने राबवलेल्या संपूर्ण नियोजनपूर्वक कार्यासाठी  सौ.सारिकाताई क्षीरसागर यांनी विशेष कौतुक केले. शाळेचा वर्षभराचा संपूर्ण कार्याचा आढावा ज्यांनी लिहिला त्या गव्हाणे सरांचे विशेष कौतुक केले.आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून  सर्व महिला भगिनींचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.या वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खुप सहकार्य केले. या वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. विवेक गव्हाणे सरांनी मानले...




Tuesday, 8 March 2022

विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन ८ मार्च २०२२






 *एक खंभीर महिला म्हणून स्व. केशरकाकूंचे नांव आजही आदराने घेतले जाते*- डॉ. सारीकाताई क्षीरसागर

 (बीड प्रतिनिधी)- दि. ८ मार्च २०२२ रोजी विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व लोकनेत्या स्व. माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुण्या डॉ.सारीकाताई क्षीरसागर व कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिला दिनानिमित्त महिलेच्या अंगी असणाऱ्या भावगुणांना साद कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणांतून सौ.वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. अठरा पगड जातीधर्माच्या , गोरगरीब, मुलांना शिक्षणाची सोय सुविधा निर्माण करणाऱ्या स्व.लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांची दूरदृष्टी महान होती असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी व्यक्त करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांचे पेठ बीड विभागात आजही स्व. काकूंच्या आदर्शाने कार्य करत आहेत असे महिला दिनानिमित्त आपल्या विचारांतून मनोगत व्यक्त केले.महिलांना सर्वच जबाबदाऱ्या पार करून पुढे यावे लागते, घरातील सर्वांची काळजी घेणारी, मुलाबाळांच्या अडचणी सोडवणारी महिला आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते सतत ती राब राबते , घरातील प्रत्येक गोष्टीकडे तीचे लक्ष असते. स्व. केशरकाकुंचे कार्य ही बीड जिल्ह्यासाठी महत्वाचे ठरले एक लोकनेत्या खंभीर महिला म्हणून आज ही त्यांचे नाव आदराने घेतले जाते याचा मला अभिमान वाटतो असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर विचारांतून डॉ.सारीकाताई क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करून सौ.किर्तीताईंच्या कार्याबद्दल गौरविले, शाळेतील सर्व महिला भगिनींना त्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या जीवनाच्या आधारस्तंभ असणाऱ्या काकूं माझ्या सर्वस्व आहेत. गोरगरीब लोकांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे त्याने उघडली. आज मी जे काही काम करते ते स्व. केशरकाकूंच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून करते त्यांमधून प्रेरणा व ऊर्जा मिळते असे आपल्या अध्यक्षीय समारोपीय भाषणातून सौ. किर्तीताई पांगारकरांनी विचार व्यक्त करून महिलांच्या आजच्या समस्या यांवर प्रकाश टाकून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांच्या विजेत्यांना डॉ. सारीकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते विविध बक्षिसे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वर्षभरामध्ये राबवलेल्या विविध उपक्रमाचा लेखा जोखा विनायक प्राथमिक शाळेच्या २०२०- २०२१ वार्षिक अहवालाचे प्रकाशन त्यांनी केले.जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. या दिमाखदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तन्वीर पठाण  सर, अजीजराजा शेख सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. गणेश भागडे सर , शैला बावस्कर  यांनी मानले..