Sunday, 17 October 2021

आदर्श मुख्याध्यापिका

 *मुख्याध्यापक* 

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

सोप नसतं राव..

शाळेचा मुख्याध्यापक होणं

आईच्या मायेनं

प्रत्येकाला समजावुन घेणं


नाराज होतात काही

कितीही राहा राईट

मुख्याध्यापकांना त्यावेळी

किती वाटत वाईट


जरी त्यांची त्यात

काहीच नसते चुक

तरी सुद्धा त्यांना

राहाव लागतय मुक


सर्वाचे हित त्यांना

मनात धरावे लागते

इच्छा नसली तरीही

एखाद्याला नाराज करावे लागते


काही सन्माननीय शिक्षक

कायम असतात गप्प

शाळेचा कारभार तेव्हा

होऊन जातो ठप्पं


तरी सुद्धा त्यांना

गप्प बसावं लागतं

इच्छा नसली तरीही

खोट खोट हसावं लागतं


प्रवास करावा सर्वानी पण

त्यांनाच भरावा लागतो टोल

चुकीच्या गोष्टीसाठी मात्र

त्यांनाच चुकवावे लागते मोलं


अल्पमतातील सरकार सारखं

त्याना निमुट बसाव लागत

कितीही चढला पारा तरी

शालिनतेनं राहाव व वागाव लागतयं


स्वत: सर्व सहन करुन

वसवतात जे आनंदाच गाव

माझ्या मते त्याचचं

मुख्याध्यापक हे नावं


बाकी सब कुछ बकवास है

अंधारलेल्या वाटेसाठी

मुख्याध्यापक असतात तारा

गुदमरणार्या जीवासाठी

मुख्याध्यापक असतात झुळझुळता वारा


रखरखणार्या वाळवंटातील

मुख्याध्यापक असतात हिरवळ

अंतराच्या कुपीतील

चहुकडे पसरणारा सुगंधी दरवळ


सुदाम्याच्या मनाची

मुख्याध्यापक असतात ओढ

शबरीच्या बोरा सारखच

मुख्याध्यापक असतात गोड


किलबिलणार्या पाखरांचा

मुख्याध्यापक असतात थवा

भळभळणार्या जखमांसाठी

मुख्याध्यापक असतात दवा


कोकिळेच्या कंठातील

मुख्याध्यापक असतात गीत

जणु यशोदा कृष्णाची

मुख्याध्यापक असतात प्रीत


कधी कधी फुल

तर कधी कधी अंगार

लढणार्या समशेरीची

मुख्याध्यापक असतात धार


*बहरणार्या प्रतिभेचा*

*मुख्याध्यापक असतात बहार*

*सरस्वतीच्या गळ्यातील*

*जणु अनमोल असा हार*


एक गोष्ट ध्यानात ठेवा

मुख्याध्यापक उगीचच नसतात

तुम्ही सर्व झोपी गेला तरी

मुख्याध्यापक सदैव जागेच असतात


कर्णासारख भरभरुन

मुख्याध्यापक सतत देतात दान

बघा बर किती मोठा

सर्वांना सतत देतात मान


*तुमच्या हाती हुकुमाचं*

*मुख्याध्यापक देतात पान*

*स्वत:च्या काळजात*

*मुख्याध्यापक देतात स्थान*


शब्दांच्या दरबारावर

मुख्याध्यापक देतात पहारा

जेव्हा कोणीच नसत तेव्हा

अडचणीत देतात सहारा


*वार्यावर झुलणार*

*मुख्याध्यापक असतात पातं*

*जीवापाड जपाव अस*

*यांच सर्वाशी असत नात*


अजुन काय व किती लिहु

बाकी सार काॅमन आहे

एवढचं म्हणतो शेवटी

मुख्याध्यापक सर तुम्हाला

त्रिवार वंदन आहे..



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹📚📚📚📚📚📚📚📚📚📚

Saturday, 9 October 2021

स्व. गोविंदराव मचाले मामा यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी पुण्यतिथी निमित्ताने आदरांजली वाहिली २०२१

 *एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.. ज्या व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी आज विनायक प्राथमिक शाळेत कार्य करत आहे,याचा अभिमान मला वाटतो ते म्हणजे स्व. गोविंदराव मचाले मामा . मामा म्हणजे एक समजूतदार व्यक्तिमत्व .. शैक्षणिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनुभवाला आलेले मामा खरंच अतुलनीय एक व्यक्तिमत्व मला भावले.*सगळ्यांना समजून घेणारं, आपलंसं वाटणारं नेतृत्व स्व. केशरकाकूंच्या  पाठीमागे खंभीरपणे  आधार देणारं व्यक्तिमत्व जे मी आदर्श मानते.. शांत संयमी स्वभाव  मी जवळून बघीतला आहे.. *कधी एखादी चूक झाली तर रागावून बोलणारी व्यक्ती गुण सुद्धा मी बघितला आहे.. आज तुमच्या या पावन स्मृती दिनानिमित्त मामांचे अलौकीक कार्य मला शब्द बद्ध करता येतील का नाही हे मला माहित नाही*.. *यामध्ये आज मी जे काही आहे स्व. गोविंदराव मचाले मामा यांचा सिंहाचा वाटा  आहे.. अलौकिक, अविस्मरणीय कार्य असणाऱ्या स्व. गोविंदराव मचाले मामांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन*..💐💐💐🙏🙏🙏.       *दुःखांकीत,*                                                      सौ. किर्ती पांगारकर/ सोळुंके


स्व.गोविंदराव मचाले मामा यांचा ८ वा स्मृतीदिन विनायक प्राथमिक शाळेत साजरा २०२१






 *स्व. गोविंदराव मचाले मामा एक भक्कम आधार देणारे व्यक्तिमत्त्व*- सौ. किर्तीताई पांगारकर(बीड प्रतिनिधी)-दि ८ ऑक्टोबर रोजी स्व.गोविंदराव मचाले मामा यांचा ८ व्या स्मृती दिनानिमित्ताने विनायक प्राथमिक शाळेत आदरांजली वाहण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते स्व. गोविंदराव मचाले मामा यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.भारतीताई क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये  करण्यात आले. स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्या शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, कार्याची ओळख जेष्ठ शिक्षक श्री.बाळू काळे सरांनी करून दिली.शाळेचे शिक्षक श्री.अशोक काशीद सर,श्रीमती भारतीताई क्षीरसागर,श्रीमती मंगल क्षीरसागर मॅडम,श्रीमती सिमा उदगीरकर मॅडम,श्रीमती प्रतिभा वाघमारे मॅडम,शेख शहेबाज सर यांनी स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.स्व. गोविंदराव मचाले मामा म्हणजे एक भक्कम आधार देणारे व्यक्तिमत्व स्व. केशरकाकू क्षीरसागरांचे भाऊ  होते.शांत,संयमी स्वभाव गुण असणारे, कधी चुकले तर रागावणारेही मामा मी जवळून पाहिले.स्व.काकूंच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असणारे गोविंदराव मचाले मामा अत्यंत दयाळू होते. त्यांचे शैक्षणिक,राजकीय, सामाजिक कार्य सदैव स्मृरणार्थ राहील अशी आदरांजली सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या भावना स्व.गोविंदराव मचाले मामा यांच्या स्मृतिदिनी व्यक्त केल्या.या आदरांजली कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती राहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार श्री. तन्वीर पठाण सरांनी मानले.


Monday, 4 October 2021

स्व.केशरकाकू क्षीरसागर यांची १५ वी पुण्यतिथी विनायक प्राथमिक शाळेत साजरी.२०२१



 स्व.केशरकाकू क्षीरसागर एक














संघर्षशील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व*- सौ. किर्तीताई पांगारकर

दि.4 ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.बीड जिल्ह्याच्या माजी खा.लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांची १५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख  सौ.भारतीताई क्षीरसागर  यांच्या हस्ते स्व.केशरकाकू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.. प्रथम माजी खासदार  लोकनेत्या स्व.केशरकाकू यांच्या जीवनकार्याचा आढावा तन्वीर पठाण सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.गिराम सर , उत्तरेश्वर भारती, शारदा बहिरमल मॅडम, अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सर, मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम,महानंदा मुंडे मॅडम, मंगल क्षीरसागर मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,अजिंक्य चांदणे सर,अनिल लेहने सर, शहेबाज शेख सर,विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर ,अजीजराजा शेख सर यांनी स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर सादर केला, स्व.काकूंच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जडणघडणीत स्व .काकूंचा मोलाचा वाटा होता. आयुष्यभर त्या संघर्ष करत सामाजिक व राजकीय स्वतंत्र अस्तित्व त्यांनी आपले दाखवून दिले. गोरगरिबांची मुलं शाळेत शिकावी यासाठी त्यांनी खेडोपाड्यात शाळा सुरू केल्या आज हे शैक्षणिक जाळ खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. काकू नेहमी आपल्या शाळेतील अडचणी, प्रगती याबद्दल नेहमी विचारणा करायच्या.बीड जिल्ह्याच्या घराघरात काकू पोहचल्या होत्या. राजकीय, सामाजिक कार्यातून आपल्या स्वकर्तव्याने त्यांनी विविध संस्था, कारखाना, सूतगिरणी उभा केल्या यामागे काकूंचा दूरगामी विचार होता. माझ्या जीवनातील सदैव स्मृरणार्थी,माझं आदर्श व्यक्तिमत्व, माझी माया, ममता,माऊली काकूं आहेत.त्यांच्या विचारांचा गाढा आम्ही पुढे घेऊन जाऊ. स्व. केशरकाकू क्षीरसागर हे एक अनमोल व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे कार्य खूप महान होते.आज काकूंची १५व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी काकूंच्या आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.दिलीप तकीक सरांनी केले तर आभार श्रीमती रिता वाघमारे मॅडम यांनी मानले..

Saturday, 2 October 2021

विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.२०२१


 विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*...(बीड प्रतिनिधी)-दि-२ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, सौ.भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा  श्री.पठाण तनवीर सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले, भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे ,'जय जवान जय किसान' या घोषणेचे प्रणेते लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून श्री.अजीजराजा शेख सरांनी त्यांचे कार्य व्यक्त केले.गांधीजी हे एक अनमोल रत्न भारतास लाभले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती श्री.अजिंक्य चांदणे सरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत श्री.अशोक काशीद सरांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले.सत्य, अहिंसा, सहिष्णुता अंगी असणारे महात्मा गांधीजी भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधींच्या जीवनातील भारताच्या स्वतंत्र चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहेत त्यांचे कार्य भारताच्या इतिहासात ओळखले जाते.गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.भागडे सरांनी केले तर आभार श्री.गव्हाणे सरांनी मानले..