Saturday, 15 February 2020

विनायक प्राथमिक शाळेचा सह्याद्री देवराई येथील वृक्षसंमेलनात सहभाग २०२०

*विनायक प्राथमिक शाळेचा सह्याद्री देवराई येथील 'वृक्ष संमेलनात' सहभाग*
बीड प्रतिनिधी-बीड दि-१४ फेब्रुवारी- विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका यांनी सह्याद्री देवराई येथील वृक्ष संमेलनास उपस्थित राहून वृक्ष लागवड या उपक्रमात सहभागी झाले. शाळेतील मुला मुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली.झाडाविषयी माहिती,उपयुक्तता समजून घेऊन त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज लक्षात घेऊन सहयाद्री देवराई चा सिने अभिनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी राबवलेला उपक्रम पर्यावरणासाठी समतोल राखण्यासाठी खुप महत्वाचा आहे.त्यांचं हे कार्य उद्याच्या भारताच्या भविष्यासाठी आदर्श आहे हे या देवराईच्या उपक्रमातून दिसून येत आहे. विनायक प्राथमिक शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद या सह्याद्री देवराईच्या उपक्रमात सहभागी होऊन फुल न फुलांची पाखळी सदैव आपल्या स्मृरणात राहावी म्हणून शाळेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची विविध झाडे लावून तिचे संवर्धन करण्याचा मानस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी मनोदय व्यक्त करून शाळेतील प्रत्येक  विद्यार्थ्यांनी झाडे लावून सह्याद्रीच्या देवराईच्या पावन भागामध्ये आपली आठवण म्हणून झाडे लावून ती जगवण्याची प्रतिज्ञा आपण करूया सयाजी शिंदेच्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन उज्वल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी 'झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश अंमलात आणला पाहिजे. वाढते प्रदूषण, वाढती वाहनांची संख्या, वाढती लोकसंख्या,वाढती वृक्षतोड,वाढती कारखानदारी यामुळे पर्यावरनावर अनिष्ट परिणाम झालेला दिसून येत आहे.निसर्गाचे नैसर्गिक चक्र बदलले आहे,अवेळी पाऊस पडतो आहे, दुष्काळाच्या कायम झळा सोसाव्या लागतात,शेतीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होतो आहे, लोकसंख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण घटले आहे,यामुळे महागाई वाढली आहे,विकासदर खुंटला आहे, हा परिणाम फक्त मानवनिर्मित प्रदूषणामुळं निर्माण झाला आहे यावर वेळीच उपाययोजना आपण करायला पाहिजे तेच आपल्या हाती आहे, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करून तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे अशी माहिती विद्यार्थ्यांना सौ.किर्तीताई पांगारकर यांनी करून दिली.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी सह्याद्री देवराई च्या वृक्ष संमेलनात सहभाग घेऊन निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे हा संदेश मनात घेतला व तो अंमलात आणण्याचा संकल्प केला...




No comments:

Post a Comment