Thursday, 20 February 2020

स्व. सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांची जयंती2020

*स्व.सोनाजीराव क्षीरसागर(नाना)केशरकाकूंचे आधारस्तंभ होते*-सौ किर्तीताई पांगारकर
(बीड प्रतिनिधी)-दि.१५ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना यांची जयंती साजरी करण्यात आली.स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी करून अभिवादन केले. यावेळी शाळेच्या जेष्ट शिक्षिका मुंडे मॅडम,भारती क्षीरसागर मॅडम, शाळेतील सर्व  शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शाळेचे शिक्षक अशोक काशीद सर,तन्वीर पठाण सरांनी स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदानाची माहिती शाळेतील  विद्यार्थ्यांना करून दिली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना हे एक उत्तम पैलवान होते,व्यायामाची आवड असल्यामुळे भारदस्त शरीरयष्टीचे मल्ल सुप्रसिद्ध होते.आपल्या पत्नीला राजकीय योगदानाची संधी देण्यात सिहांचा वाटा त्यांचा होता.स्वतःपाठीमागे राहून स्व.केशरकाकूंना राजुरीच्या सरपंच पदापासून ,बीड पंचायत समिती सभापती,सलग तीन वेळेस बीडच्या खासदार,आशिया खंडातील पहिल्या महिला गजानन साखर कारखान्याच्या अध्यक्षा,शैक्षणिक संस्था अशा विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये स्व.सोनाजीराव क्षीरसागरांची भक्कम अशी साथ लाभली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना लोकनेत्या स्व.केशरकाकूंचे एक आधारस्तंभ होते.आपल्या जीवनाचे सार्थक करून त्यांनी दाखवले.ग्रामीण भागामधील लोकांना आयुर्वेदिक वनऔषधी सांगत होते.आपल्या परिवारावर त्यांचा धाक होता,दबदबा होता म्हणूनच त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केले.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांच्या जयंती निमित्त अभिवादन करून आपल्या भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या.या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती वाघमारे मॅडम यांनी मानले.

No comments:

Post a Comment