Thursday, 20 February 2020

स्व. सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांची जयंती2020

*स्व.सोनाजीराव क्षीरसागर(नाना)केशरकाकूंचे आधारस्तंभ होते*-सौ किर्तीताई पांगारकर
(बीड प्रतिनिधी)-दि.१५ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना यांची जयंती साजरी करण्यात आली.स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी करून अभिवादन केले. यावेळी शाळेच्या जेष्ट शिक्षिका मुंडे मॅडम,भारती क्षीरसागर मॅडम, शाळेतील सर्व  शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शाळेचे शिक्षक अशोक काशीद सर,तन्वीर पठाण सरांनी स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदानाची माहिती शाळेतील  विद्यार्थ्यांना करून दिली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना हे एक उत्तम पैलवान होते,व्यायामाची आवड असल्यामुळे भारदस्त शरीरयष्टीचे मल्ल सुप्रसिद्ध होते.आपल्या पत्नीला राजकीय योगदानाची संधी देण्यात सिहांचा वाटा त्यांचा होता.स्वतःपाठीमागे राहून स्व.केशरकाकूंना राजुरीच्या सरपंच पदापासून ,बीड पंचायत समिती सभापती,सलग तीन वेळेस बीडच्या खासदार,आशिया खंडातील पहिल्या महिला गजानन साखर कारखान्याच्या अध्यक्षा,शैक्षणिक संस्था अशा विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये स्व.सोनाजीराव क्षीरसागरांची भक्कम अशी साथ लाभली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना लोकनेत्या स्व.केशरकाकूंचे एक आधारस्तंभ होते.आपल्या जीवनाचे सार्थक करून त्यांनी दाखवले.ग्रामीण भागामधील लोकांना आयुर्वेदिक वनऔषधी सांगत होते.आपल्या परिवारावर त्यांचा धाक होता,दबदबा होता म्हणूनच त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केले.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांच्या जयंती निमित्त अभिवादन करून आपल्या भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या.या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती वाघमारे मॅडम यांनी मानले.

विनायक प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी२०२०

*विनायक प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी*
(बीड प्रतिनिधी)- दि.१९ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून शिवरायांच्या नामाचा गजर करण्यात आला.





Saturday, 15 February 2020

विनायक प्राथमिक शाळेचा सह्याद्री देवराई येथील वृक्षसंमेलनात सहभाग २०२०

*विनायक प्राथमिक शाळेचा सह्याद्री देवराई येथील 'वृक्ष संमेलनात' सहभाग*
बीड प्रतिनिधी-बीड दि-१४ फेब्रुवारी- विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका यांनी सह्याद्री देवराई येथील वृक्ष संमेलनास उपस्थित राहून वृक्ष लागवड या उपक्रमात सहभागी झाले. शाळेतील मुला मुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली.झाडाविषयी माहिती,उपयुक्तता समजून घेऊन त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज लक्षात घेऊन सहयाद्री देवराई चा सिने अभिनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी राबवलेला उपक्रम पर्यावरणासाठी समतोल राखण्यासाठी खुप महत्वाचा आहे.त्यांचं हे कार्य उद्याच्या भारताच्या भविष्यासाठी आदर्श आहे हे या देवराईच्या उपक्रमातून दिसून येत आहे. विनायक प्राथमिक शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद या सह्याद्री देवराईच्या उपक्रमात सहभागी होऊन फुल न फुलांची पाखळी सदैव आपल्या स्मृरणात राहावी म्हणून शाळेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची विविध झाडे लावून तिचे संवर्धन करण्याचा मानस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी मनोदय व्यक्त करून शाळेतील प्रत्येक  विद्यार्थ्यांनी झाडे लावून सह्याद्रीच्या देवराईच्या पावन भागामध्ये आपली आठवण म्हणून झाडे लावून ती जगवण्याची प्रतिज्ञा आपण करूया सयाजी शिंदेच्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन उज्वल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी 'झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश अंमलात आणला पाहिजे. वाढते प्रदूषण, वाढती वाहनांची संख्या, वाढती लोकसंख्या,वाढती वृक्षतोड,वाढती कारखानदारी यामुळे पर्यावरनावर अनिष्ट परिणाम झालेला दिसून येत आहे.निसर्गाचे नैसर्गिक चक्र बदलले आहे,अवेळी पाऊस पडतो आहे, दुष्काळाच्या कायम झळा सोसाव्या लागतात,शेतीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होतो आहे, लोकसंख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण घटले आहे,यामुळे महागाई वाढली आहे,विकासदर खुंटला आहे, हा परिणाम फक्त मानवनिर्मित प्रदूषणामुळं निर्माण झाला आहे यावर वेळीच उपाययोजना आपण करायला पाहिजे तेच आपल्या हाती आहे, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करून तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे अशी माहिती विद्यार्थ्यांना सौ.किर्तीताई पांगारकर यांनी करून दिली.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी सह्याद्री देवराई च्या वृक्ष संमेलनात सहभाग घेऊन निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे हा संदेश मनात घेतला व तो अंमलात आणण्याचा संकल्प केला...




Saturday, 1 February 2020

विनायक प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळावा संपन्न२०२०

*विनायक प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*
बीड-दि.३०जानेवारी(बीड प्रतिनिधी)-  शहरातील पेठ बीड विभागातील विनायक प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ.सारीकाताई योगेश क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी,स्व.माजी खासदार केशरकाकूंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी पेठ बीड पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर, नगरसेवक विकास जोगदंड,सय्यद इलियास, मुन्ना इनामदार, संभाजी प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विनाताई भोज,भारतीताई क्षीरसागर मॅडम,पत्रकार इम्रानजी शाह साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेच्या शैक्षणिक वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला व पालकांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण,कलागुण विकसीतपूर्ण शिक्षण मिळणे महत्वाचे आहे असे आपल्या मनोगतातून पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून आपण शिक्षण दिले तर नक्कीच  शिक्षणाचे महत्त्व लक्षात येईल,संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विनाताई भोज मॅडम,यांनी ही या स्नेहसम्मेलनाच्या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. विनायक प्राथमिक शाळा हे काकूंनी लावलेले छोटेसे रोपटे मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे.पुढील काळात विनायक प्राथमिक शाळेची नवीन इमारत नक्कीच बांधू असे आश्वासन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भावना व्यक्त करत, स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षिका यांचे कौतुक केले.इयत्ता बालवाडी ते ४ थी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील मुला मुलींनी या स्नेहसम्मेलनामध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असणारे गुणप्रदर्शन उत्साहपूर्ण नृत्याने करून उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, विविध शैक्षणिक, सामजिक, राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांना,पालक वर्ग यांना मंत्रमुग्ध केले.आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट असे नृत्य मूल मुली करत होती व उपस्थितांची वाहवा मिळवत होती.देशभक्ती गीत,पारंपरिक नृत्य,ग्रामीण जीवनाची गाणी,लोकगीत,गौळण,पोतराज,देवदेवतांची गाण्यावर,कोळीगीत,स्वच्छता संदेश देणाऱ्या गाण्यावर मूल हुभेहुब आपल्या कलेचे चित्रण करत होती.अतिशय देखने,उत्कृष्ट असे स्नेहसंमेलन विनायक प्राथमिक शाळेमध्ये संपन्न झाले.हा स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.या स्नेहसम्मेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अशोक काशीद सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार तन्वीर पठाण सरानी मानले.