Sunday, 14 July 2019

विनायक प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने बालदिंडी निघाली..

*विनायक प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन*
दि-१२जुलै(बीड प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्ताने विनायक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विठुमाऊलीच्या जयघोषाने सुंदर अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली  केले.शाळेतील लहान लहान मुलां- मुलीं हुबेहूब विठ्ठल रुक्मिणी च्या वेशभूषेत आले होते.टाळ मृदंगाच्या नादामध्ये हरिनामाचा जागर शाळेमध्ये असमात दुमदुमत होता.वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुलं-मुली दिंडीचे लक्षवेधुन घेत होती.शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अतिशय सुंदररीत्या आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले शाळेचा परिसरामध्ये पांडुरंगाच्या जयघोष व आनंद लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षक शिक्षकांचे खुप कौतुक केले.बालमनावर अभ्यासाबरोबर शांतीसाठी,एकात्मतेसाठी ,चांगले संस्कार करण्यासाठी अध्यात्मातून गोडी निर्माण करून संस्कारित पिढी निर्माण करणे ही काळाची गरज लक्षात घेऊन लहानपणापासूनच असे उपक्रम शाळेत राबवतो त्यासाठी विनायक प्राथमिक शाळा नेहमी नवोपक्रम राबवत असते.सुंदर अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी व सहभागी विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका,पालक वृंद यांनी उत्कृष्ट पणे साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त करून आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देऊन पांडुरंगा चरणी चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली.या दिंडी सोहळ्यामध्ये शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.















No comments:

Post a Comment