Wednesday, 3 July 2019

*विनायक प्राथमिक शाळेत मोफत शालेय गणवेश वाटप*2019

दि-२ जुलै (बीड प्रतिनिधी)आदर्श शिक्षण संस्था संचलित विनायक प्राथमिक शाळेतील इयत्ता १ली ते ४ थी च्या सर्व मुला-मुलींना मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.शाळेच्या प्रमुख सौ. किर्तीताई पांगारकर,आदर्श शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. भारतीताई क्षीरसागर यांच्या शुभहस्ते स्व. काकूं-नाना क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या मोफत शालेय गणवेश वाटपाचा मुख्य उद्देश व संकल्पना आपल्या खास शैलीत श्री.तन्वीर पठाण सरांनी उपस्थित विद्यार्थी पालकांसमोर मांडली.शाळेतील शिक्षक श्री. शिवलिंग क्षीरसागर सर, श्री.दिलीप तकीक सर,बाळू काळे सर,उत्तरेश्वर भारती सर, वैजीनाथ गिराम सर,अशोक काशीद सर,अनिल लेहणे सर,अजिंक्य चांदणे सर,अजीजराजा शेख सर,प्रतिभा वाघमारे मॅडम, रिता वाघमारे,मनिषा चौधरी मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,मंगल क्षीरसागर,महानंदा मुंडे मॅडम,शैला बावस्कर मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,शारदा बहिरमल मॅडम,अमोल पाटोळे सर यांनी आपापल्या वर्गातील मुला-मुलींना गणवेश वाटप केले.उपस्थित विद्यार्थी पालक,प्रमुख पाहुणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी शाळेतील प्रत्येक मुलां-मुलींना मोफत शालेय गणवेश भेट दिला.शाळेच्या स्थापनेपासून स्व.माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांची या शाळेविषयी असणारी तगमगता खुप लाख मोलाची होती.स्व.काकूंनी हे विनायक प्राथमिक शाळेची केलेली स्थापना या पेठ भागातील दिन-दलित, पिडीत, गोरगरीब लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेली एक विलक्षण,अनमोल सोय होती.सर्वांसाठी शिक्षण हा त्यांचा मुख्य उद्देश होता.या भागातील लोक गरीब आहेत, मजूर आहेत, कष्टकरी आहेत, अठरापगड जातीधर्माचे लोक या शालेय परिसरात राहतात त्यांच्या मुला-मुलींसाठी आपली एक शाळा असावी हा दृष्टिकोन ठेवून,कल्पक व प्रेरक सामाजिक, शैक्षणिक योगदानाची आगळीवेगळी ओळख आजही कायम लोकांच्या मनात घर करून आहे.त्यांच्या याच विचाराने आम्ही प्रभावीत होऊन या शैक्षणिक संकुलामध्ये फुलं न फुलांची पाखळी आमच्या शाळेच्यावतीने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोत. यावर्षी पासून शाळेच्या गणवेशामध्ये आम्ही बदल केला आहे.सर्व जातीधर्माची, गोरगरीब घरांतील मुल एकाच गणवेशात दिसावी वं फुलावी यासाठी आम्ही शाळेतील इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या सर्व मुलां-मुलींना मोफत शालेय गणवेश,बुट,सॉक्स,बेल्ट, टाय देत आहोत.शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे प्रत्येक उपक्रम राबवतो.त्यासाठी पालकांचा सहभाग ही महत्वाचा असतो त्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही.तुमची साथ अशीच राहू द्या.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही नवनवीन नवोपक्रम राबवतो.भविष्यातील भविष्य हे विद्यार्थी हेच आहेत.त्यासाठी सतत आमचे प्रयत्न चालू आहेत असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी शाळेच्या भुमिका स्पष्ट केल्या. उपस्थित पालकांच्या काही सुचना व प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकांना आश्वसित केले.शालेय गणवेश वाटप झाल्यानंतर शाळेतील मुला-मुलींचा आनंद खुप काही सांगत होता.अतिशय खेळीमेळीच्या, आनंदाच्या वातावरणामध्ये शाळेतील हा मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलांचे योगदान होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भागडे सरांनी केले तर उपस्थित मान्यवर अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विद्यार्थी पालकांचे आभार श्री.विवेक गव्हाणे सरांनी मानले.











No comments:

Post a Comment