Wednesday, 30 January 2019

महात्मा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम

*राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अद्वैत क्रांतिकारक नेते* -सौ.किर्तीताई पांगारकर
 बीड-दि.30 जानेवारी(बीड प्रतिनिधी) विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.राष्ट्रपिता गांधींच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते श्री.गिराम वैजिनाथ सर, उत्तरेश्वर भारती सर, भारती क्षीरसागर मॅडम,सुनीता चौधरी मॅडम, शैलजा बावस्कर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांनी बापूंच्या स्मृतीस अभिवादन केले.महात्मा गांधी यांचा व्यक्तीपरिचय श्री.वैजिनाथ गिराम सरांनी मुलांना करून दिला. तन्वीर पठाण सर, विवेक गव्हाणे सर, सुनीता चौधरी मॅडम, भारती क्षीरसागर मॅडम, शैलजा बावस्कर मॅडम, मनीषा वाघमारे मॅडम, अशोक काशीद सर,नईम पठाण सर यांनी महात्मा गांधींच्या जीवन कार्य याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा, स्वदेशी या तत्वांचे उपासक होते.राष्ट्रपिता बापूंच्या जीवनातील अमूल्य विचार, कार्य देशाच्या सामाजिक समतेसाठी महत्वाचे योगदान होते ते एक अद्वैत क्रांतिकारक नेते होते असे आपल्या अध्यक्षीय मनोगत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी व्यक्त करून महात्मा गांधींच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. महात्मा गांधींच्या रघुपती राघव राजाराम या आवडत्या भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागडे यांनी केले तर आभार शिवलिंग क्षीरसागर सर यांनी मानले.



Friday, 25 January 2019

विनायक प्राथमिक शाळेत आनंदनगरी आयोजन


*खरी कमाई विद्यार्थ्यांना स्वावलंबन समजवते*-
 सौ.किर्तीताई पांगारकर

बीड-दि.२५जानेवारी(बीड प्रतिनिधी) या दिवशी विनायक प्राथमिक शाळेत खरी कमाई उपक्रमाअंतर्गत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले. या आनंदनगरी चे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ सपकाळ सर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील श्रीमती भारतीताई क्षीरसागर मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, बाळू काळे सर,सुनीता चौधरी मॅडम, अशोक काशीद सर, शिवलिंग क्षीरसागर सर,तन्वीर पठाण सर,अजिंक्य चांदणे सर, अजीजराजा शेख सर,विवेक गव्हाणे सर,सिमा उदगीरकर मॅडम,प्रतिभा वाघमारे मॅडम,मनीषा चौधरी मॅडम,रिता वाघमारे मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,अनिल लेहणे सर,शहेबाज शेख सर यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेतील लहान मुला-मुलींनी आपापले खाऊंचे दुकाने लावली होती.जो तो खरी कमाई करण्यात दंग होता.ही लहान मुले मोठ्या कौतुकाने आपले दुकान चालवत होती. विदयार्थी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताईनी प्रत्येक मुलांच्या दुकानाची भेट घेतली व मोठ्या आपुलकीने त्या मुलांशी व्यावहारिक ठोकताळे ,दुकानातील खाऊं प्रत्यक्ष खरेदी करून विद्यार्थ्यांना खरी कमाई यांचे महत्व समजावून सांगत होत्या.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी या आनंदनगरी मध्ये मुलांनी तयार करून आणलेले पदार्थ खरेदी करून त्यांना व्यवहाराचे महत्व समजावून सांगितले.या  आनंदनगरी मध्ये वडापाव, कचोरी,समोसे,पापड, गुलाबजामुन,भेळपुरी,चहा,खमंग ढोकळा,अननस,चिक्की, पाणीपुरी,शैक्षणिक साहित्य,मजेशीर विविध खेळ, गंमती जमती,पावभाजी, शेंगदाणे, पाणी, गाजर हलवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपआपले टॉल मुलांनी लावले.यातून त्यांनी खूप खरी कमाई केली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताईंनी या खऱ्या कमाईचे महत्व सांगून खरी कमाई आपल्याला स्वावलंबन शिकवते.त्यामुळे आपल्याला नफा तोटा कळतो, नफा कसा मिळवायचा यासाठी आपण प्रयत्न करतो, जीवन जगण्यासाठी पैसे कमवावे लागतात यासाठी तुम्ही अभ्यास करा, मोठे व्हा, नोकरीला लागाल,काम कराल, मेहनत कराल तेंव्हा त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला पैसा मिळेल हीच तुमची खरी कमाई तुम्हांस स्वावलंबी बनवून तुमच्या जीवनात आनंद निर्माण करील अशा आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी आनंदनगरीच्या समारोपाप्रसंगी मत व्यक्त केले. शाळेतील शिक्षकांनी मुलांना खऱ्या कमाईचे महत्व समजावून सांगितले.या आनंदनगरी कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण फुलमाळी,लक्ष्मण चव्हाण मामा यांचे मोलाचे योगदान लाभले.




नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती

*विनायक प्राथमिक शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी*
बीड दि-२३जानेवारी या रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विनायक प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली.सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे श्री.गिराम सर,तन्वीर पठाण सर,अशोक काशीद सर, अजिंक्य चांदणे सर,मनीषा चौधरी मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री.विवेक गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून घेतला.विविध मुलांनी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.प्रमुख वक्ते तन्वीर पठाण सर, संजीवनी पवळ मॅडम,वैजिनाथ गिराम सरांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य, देशासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे.त्यांचे आदर्श, विचार,सदैव आठवणीत राहील असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.गणेश भागडे सरांनी केले तर आभार बहिरमल शारदा मॅडम यांनी मानले.




Tuesday, 8 January 2019

विनायक विद्यालय येथे विद्यार्थी पालक मेळावा संपन्न

*विनायक विद्यालय येथे विद्यार्थी पालक मेळावा संपन्न*
बीड-दि ८ जानेवारी या दिवशी विनायक विद्यालय येथे विदयार्थी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या पालक मेळाव्याचे उद्धघाटन या पालक मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या बीड जि.प. प्रा./माध्य.उपशिक्षणाधिकारी श्रीमती नजमा उस्मानी मॅडम यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सय्यद नवीदुज्जमा, व नगरसेवक मा.सय्यद इलियास,काझी मोहम्मद जफर मौलाना, पालक प्रतिनिधी पत्रकार देवेंद्र ढाका ,डॉ.मोमीन,डॉ.पाखरे,डॉ. तांदळे,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सपकाळ सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्तीताई पांगारकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्व.माजी खासदार केशरकाकूं च्या प्रतिमेचे पूजन करून उद्धघाटन संपन्न झाले.. उपस्थित पालक मान्यवर व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत विनायक प्राथ.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्तीताई पांगारकर व माध्य.शाळेचे मुख्याध्यापक श्री. सपकाळ सरांनी केले.शाळेतील विविध उपक्रम,जनजागृती कार्यक्रम,विदयार्थी पालक मेळाव्याच्या मुख्य उद्देश, महत्व,कारण,भूमिका उपस्थित पालकांना आपल्या खास प्रास्ताविकातून पर्यवेक्षक श्री.जोगदंड सरांनी आढावा घेतला.
    विनायक विद्यालयाच्या प्रगतीविषयक व पालक मेळावा आयोजना पाठीमागची भूमिका,ध्येय,उद्देश,मार्गदर्शनातून आपले विचार शाळेचे मुख्याध्यापक श्री सपकाळ सरांनी व्यक्त केले.
    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. आज या आधुनिकतेमुळे मुले टर्निंग पॉइंटला वेगळ्याच ट्रॅक जात आहे हे पालकांनी दुर्लक्षून चालणार नाही शाळेच्या विविधांगी उपक्रमास शुभेच्छा व्यक्त करून, विनायक शाळेचे कौतुक केले.बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही नवनवीन साधनतंत्राचा अवलंब करून या मुलांना घडवुन त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहा नक्कीच ही आजची मुले जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे भविष्य सार्थक ठरवतील असे विचार व्यक्त करून पालक मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक उपशिक्षणाधिकारी श्रीमती नजमा उस्मानी मॅडम यांनी विद्यार्थी, पालकांना संबोधित केले.आजच्या या काळामध्ये स्पर्धेत जर टिकायचे असेल तर आपल्या लेकरांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. शिक्षण ही एक बदल घडवणारे शस्त्र आहे ते चालवण्याचे सामर्थ्य आपण आपल्या मुलांना करून दिले पाहिजे असे मार्गदर्शन नगरसेवक मा.सय्यद इलियास यांनी पालक मेळाव्या प्रसंगी उपस्थित पालकांना आपले विचार व्यक्त केले.
    विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्तीताई पांगारकर यांनी शाळेच्या प्रगतीचा सर्वंकष आढावा घेऊन शाळेच्या प्रगतीविषयक उपक्रमाचे अवलोकन करून दिले, विदयार्थी हे शाळेचे मुख्यघटक आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या शाळेविषयी असणाऱ्या कल्पना पालकांना सांगितल्या.शाळेची शिस्त, गणवेश,प्रगती खूप महत्त्वाची आहे त्यासाठी विनायक परिवारातील सर्व शिक्षक वृंद खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतात याचा मला सार्थ अभिमान वाटतो त्यासाठी आम्ही विविध उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहू त्यासाठी तुम्ही साथ द्या.काही अडचण, समस्या असतील तर त्या सुधारण्यासाठी तुम्ही नेहमी शाळेच्या संपर्कात रहा असे आपल्या खास मार्गदर्शनातून ताईंनी आपले मनोगत व्यक्त केले.
   शाळेतील ही छोटी मुले उद्याचे आपले भविष्य आहे.शाळेत मुलांना गोवर व रुबेला लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली त्याचे महत्व उपस्थित पालकांना आपल्या खास शैलीत डॉ. मोमीन डॉ.पाखरे, डॉ. तांदळे यांनी या गोवर व रुबेला लसीकरणासाठी पालकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका हे लसीकरण शासनाने मोफत उपलब्ध केले आहे. आपल्या मुलांना हे लसीकरण करा असे विचार  व्यक्त करून त्यांनी पालक, माता वर्ग यांना संबोधित केले.
    आपले मुले आपण मोठ्या आत्मविश्वास निर्माण करून तुम्ही आमच्याकडे पाठवता त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण, अभ्यास खूप काळाची गरज आहे अतिशय रोचक अशा मार्गदर्शनातून प्रा.जाधव सरांनी  आपले मनोगत व्यक्त केले
   ज्ञान हे मिळवावे लागते त्यातून व्यक्ती घडत असतो. चांगले शिक्षण,चांगले कर्म मानवास माणूस बनवतो ,उत्तम कार्य केल्याने उत्तम होते. शिक्षणाची गोडी ज्याला लागेल तो यशस्वी नक्कीच होतो परंतु आज परिस्थिती खूप बदलत गेली आहे. मुले अभ्यासाकडे लक्ष कमी व इतर मोबाइल खेळ यामध्ये वेडून गेली आहेत याचा त्याच्या मनावर परिणाम होतो आहे म्हणून पालकांनी आपल्या मुलांवर नजर ठेवून नेहमी अभ्यास, चांगल्या संस्काराने शिक्षीत करणे गरजेचे आहे.शासनाच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या गोवर व रुबेला लसीकरण मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे .आपल्या मुलांना,पाल्याना या लसीकरणापासून वंचीत ठेवू नका असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मत मा.सय्यद नवीदुज्जमा यांनी व्यक्त करून शाळेच्या विविधांगी  उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
     या विद्यार्थी, पालक, मेळावा यशस्वी करण्यासाठी विनायक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उनबेग सर यांनी केले तर आभार श्री.तनवीर पठाण सर यांनी मानले









Wednesday, 2 January 2019

सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम

*स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले एक महान आदर्श महिला सदैव स्मरणात राहतील-सौ.किर्तीताई पांगारकर*

बीड दि.३ जानेवारी २०१९ रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व सावित्रीबाई फुलेंचे प्रेरणा गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व शाळेतील सर्व शिक्षक श्री.भारती सर,गिराम सर,गव्हाणे सर,भागडे सर,नइम पठाण,चौधरी मॅडम, बहिरमल मॅडम,देशमुख ताई,लक्ष्मण फुलमाळी उपस्थित राहीले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत विविध मुला-मुलींनी केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवनकार्या,आदर्श,समाजसुधारणांचा आढावा शाळेतील श्री.गव्हाणे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेतील विविध मुला-मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची ओळख करून दिली. सावित्रीबाईं फुलेंच्या वेशभूषेत मुली त्यांच्या आठवणीत दंग झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले महान व्यक्ती होऊन गेल्या.त्यांचे कार्य आजही आपणांस या मुलींच्या शिक्षणाच्या रुपात दिसते.जगाला आदर्श देणाऱ्या सावित्रीबाई फुले थोर समाजसुधारक होत्या. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा उलथवून टाकण्यासाठी, स्त्री-शिक्षणासाठी खूप त्रास सहन करून आपलं काम न डगमगता संपूर्ण आयुष्यामध्ये कार्य करत राहिल्या त्यांच्यामुळेच आज स्त्रियांना मानाचे पुरुषांच्या बरोबरीने स्थान आहे, अनेक महिलांनी आपल्या कर्तबगारीने उंच उंच यशाची शिखरे पार केले.सावित्रीबाई फुलेंचे विचार आदर्श घेऊन आपल्या शाळेच्या निर्मात्या स्व. केशरकाकूं क्षीरसागर यांनीपण आपल्या कार्याचा आदर्श निर्माण करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणा देत राहिल्या,खेडोपाडी, शहरी भागातील गरीब  मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अनेक शाळा स्थापन करून, भारत देशात एक महिला साखर कारखाना निर्माण करणाऱ्या अध्यक्षा ठरल्या हा सन्मान मिळून गेल्या.म्हणून स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले एक थोर समाजसुधारक सदैव स्मरणात राहतील असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांचे आई वडील उसतोडणीसाठी बाहेर गेली आहेत त्या मुलीं आपल्या आजी-आजोबा सोबत राहात आहेत ते गरीब आहेत म्हणून त्यांना शाळेच्या वतीने थंडी वाजू नये म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई यांच्या हस्ते मुलींना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले.
     या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खास सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.भागडे सरांनी केले तर आभार श्रीमती चौधरी मॅडम यांनी मानले..