Monday, 24 September 2018

आदर्श शिक्षक

तन्वीर पठाण सर...
    शिक्षण या पवित्र क्षेत्रात काम करत असताना कळत नकळत विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे शिक्षक खूप महत्वाचे असतात..शिक्षक म्हटलं की अंगात भीती वाटत असायची आज आनंददायी शिक्षणाबरोबर ज्ञानरचनावाद व मनोरंजनातून शिक्षण द्यावे लागते त्या भूमिका त्या कल्पना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी शिक्षकाचे कौशल्य खूप महत्वाचे असते .असेच विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथील शिक्षक त्यांच्या कामाचे कौतुक करावे ते थोडे होईल.अंगामध्ये असणाऱ्या उपजत कलांना ओळखून त्या प्रत्यक्षपणे अनुभवातून प्रगट करून दगडाला आकार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारा शिक्षक खूपच महत्वाचा आहे.परिस्थिती कशीही असुद्या पण सक्षमपणे पेलवण्याची टाकत ठेवतो तो शिक्षक खूपच महत्वाचा वाटतो.
     आमच्या शाळेतील पठाण तन्वीर सर हे एक अनमोल रसायन आहे.विविध प्रकारच्या कला गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या आपल्या शिक्षक सहकाऱ्यांचे कौतुक करावे ते थोडे असेल..अंगी , मनी एकच ब्रीद व तळमळ लक्षात घेता त्याप्रमाणे हसत खेळत विद्यार्थी हे आपले दैवत समजून पूर्णपणे त्यामध्ये झोकून देणारा व्यक्ती आम्ही जवळून बघितलाय.
 अशा या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याची नोंद घेऊन वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण असणारे व्यक्तिमत्व खूप उजळावे, हर्षावे, उंच उडावे म्हणून सतत कलात्मक प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रामधून सामाजिक ,शैक्षणिक योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या यशातील बक्षीस असते.
    तन्वीर पठाण सर एक हुशार व हजरजबाबी माणूस खूप महत्वाचा आहे त्यांना वेगवेगळया सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार आणखी बळ वाढवणारे असते. तन्वीर पठाण सरांना आपल्या अल्पावधीच्या कालावधीतून मिळालेले पुरस्कार हे यशाचे लाखमोलाचे आहेत.सतत विद्यार्थी व तन्वीर पठाण सर हे आपल्या कामावर  मन लावून लहान होऊन आनंद घेत असतात.
    या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना अत्यंत प्रभावीपणे आपल्या कौशल्याने आत्मविश्वासाने समरस होऊन विद्यार्थी दैवताच्या पूजनेसाठी नवनवीन सहशालेय उपक्रमाची व अभ्यासाची गोडी लावणारा अवलिया खूपच प्रेरणादायी असतो.
   तन्वीर पठाण सरांच्या या अनमोल योगदानाबद्दल त्यांचे संपूर्ण जीवनप्रवास शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही .अनेक व्यक्तीच्या नावाने दिले जाणारे आदर्श पुरस्काराचे मानकरी आम्हां सोबती लाभले याचा सार्थ अभिमान आम्हांस वाटतो.
  त्यांची प्रेरणा, मार्ग, दिशा  ही समर्थपणे चालवण्यासाठी आम्हांस ती प्रेरक ,दिशादर्शक ठरेल यांचा आम्हाला हेवा वाटतो म्हणून त्यांच्या शैक्षणिक कार्यांचा हा लेखाजोखा याचे बक्षीस म्हणजे त्यांना मिळालेले विविध आदर्श शिक्षक पुरस्कार हे त्यांचे भाग्य कर्म यांचे यथार्थपणे स्वीकारलेले अंगीकृत असे बक्षीस वाटते...
    त्यांच्या या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानांकन दिलेल्याव त्यांना निवडलेल्या विविध प्रतिष्ठानचे कौतुक करावे ते थोडे असेल..
अशा हुरहुन्नरी व हसमुख व्यक्तित्वास पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!

गणेशोत्सवा निमित्त विविध शालेय स्पर्धा, रंगभरण स्पर्धेचे आयोजन...

आपल्या शाळेच्या या संकुलामध्ये आपण वेगवेगळे उपयोजनात्मक उपक्रम आपण राबवतो त्या पाठीमागे आपला हेतू फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठंतरी पुढे आले पाहिजे त्यांच्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना कुठंतरी संधी आपण पुढे उपलब्ध करून दिली तर नक्कीच ही मुले पुढे येऊन आपली कौशल्य दाखवतील म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या कल्पनेतून साकारलेली ही रंगभरण स्पर्धा खूपच चांगल्या प्रकारे पार पडली यामध्ये सौ. किर्तीताई पांगारकर या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चित्राला देणाऱ्या रंगाचे परीक्षण करून या लहान मुलांच्या आनंददायी या स्पर्धेमध्ये त्याही सहभागी होऊन आपल्या अंगी हातात असणाऱ्या रंगाच्या सुबक छटाना रंग देऊन या लहान लहान मुलांमध्ये बसून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये समरस झाल्या होत्या. विद्यार्थ्यांप्रति असणारी किर्तीताई यांची तळमळ,आपुलकी पाहून सर्व शिक्षक शिक्षिकाही या रंगभरण स्पर्धेमध्ये आनंदाने सहभागी होऊन या लहान मुलांच्या  रंगभरण स्पर्धेचा आनंद सर्वांनी मिळून द्विगुणित केला...
*गणेशोत्सवा निमित्त रंगभरण स्पर्धा व क्रीडास्पर्धा संपन्न*..

दि-24/09/2018 बीड--विनायक प्राथमिक शाळेत गणेशोत्सवा निमित्त विविध शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व लहान मुलां- मुलींनी सहभाग घेतला. आपल्या सुंदर कल्पनेने मनमोहक रंग गणरायाच्या चित्रात देण्यासाठी तल्लीन होऊन प्रत्यक्ष गणपतीचे हुबेहूब रंगछटा चित्रास देऊन आपले कौशल्य दाखवत होती या रंगभरण स्पर्धेचे परीक्षण आदरणीय मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर,श्री.भारती सर,जमाले सर,गिराम सर,पठाण तन्वीर सर,गव्हाणे सर, भागडे सर, चौधरी मॅडम, पवळ मॅडम, बहिरमल मॅडम यांनी केले.या रंगभरण स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सौ. किर्तीताई यांनी सुद्धा या रंगभरण स्पर्धेत स्वतः भाग घेऊन गणरायाच्या प्रतिमेस आपल्या कल्पक, रंगानी रंग दिला. अशाप्रकारे हा अतिशय आगळावेगळा उपक्रम विनायक प्राथमिक शाळेत राबवून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या अंगी असलेले कल्पक उपजत गुण यांना संधी उपलब्ध करून हा शालेय उपक्रम कार्यक्रम स्पर्धा खूप उत्साहात संपन्न झाला...

Friday, 7 September 2018

रक्षाबंधन


*बहीण व भाऊ हे बंधन खूपच प्रेमाचे* :किर्तीताई पांगारकर
 बीड :  बीड मधील विनायक  प्राथमिक शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते सरस्वती चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  या प्रसंगी रक्षाबंधनाचे महत्व  गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.शाळेतील मुलींनी मुलांना राखी बांधून औक्षण केले.बहीण व भावाचे अतूट नाते या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त समृद्ध होते असे आपल्या मनोगतातून श्री. भागडे सरांनी व्यक्त केले. बहीण व भाऊ हे बंधन खूपच प्रेमाचे, आपुलकीचे,मायेचे असते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण नेहमी रक्षाबंधनाच्या प्रसंगी प्रार्थना करते,भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी राखी बांधून घेत तिच्या पाठीमागे खंभीरपणे उभा राहण्याचा संकल्प करतो असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व मुला-मुलींना राखीपोर्णिमेच्या शुभेच्या दिल्या. 
    याप्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्री. भारती सर, चौधरी मॅडम, गिराम सर, जमाले सर, पठाण नईम सर, पवळ मॅडम, बहिरमल मॅडम, देशमुख मॅडम,फुलमाळी मामा, यांचे सहकार्य लाभले.
    कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पठाण तन्वीर सर यांनी केले तर आभार पवळ मॅडम यांनी मानले.



गुरू तुमचा वारसा आम्ही पुढे चालवू..

गुरू तुमचा वारसा, आम्ही पुढे चालवू....सौ.किर्तीताई पांगारकर

बीड-दि.5 सप्टेंबर--- विनायक प्राथमिक शाळेत शिक्षक दिन हा  उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक श्री. काळे सर, उगले सर,आदर्श शिक्षक पठाण सर, जमाले सर, गिराम सर, भारती सर यांच्या हस्ते करण्यात आले.या शिक्षक दिनाचे महत्व,  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री. गव्हाणे सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेतील छोट्या छोट्या मुलां-मुलीनी,चि. शेख समीर, अनेराव आदिनाथ,घोडके तेजस, शेख अजमत या मुलांनी शिक्षक दिना प्रसंगी आपल्या शिक्षकांप्रति आदर,भावना व्यक्त करून, शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छागुच्छ देऊन स्वागत केले.विविध मुला- मुलींनी आपल्या शिक्षकांप्रती आदरभाव आपल्या भाषणातून व्यक्त करून उपस्थीत मान्यवरांकडून कौतुकाची थाप मिळवली, शिक्षकांचा आदर आपण सन्मानाने करतो कारण संस्कार व जगण्यासाठी विनम्रता आपल्या अंगी बिंबवण्याचे काम शिक्षक करतात आपल्या प्रमुख विचारांतून श्री.काळे सरांनी व्यक्त केले, आयुष्याच्या सुरुवातीपासून दिशा, मार्ग, संस्कार, शिस्त व कल्पना अंगी बाळगून शिक्षक सदैव परिश्रम घेत असतात त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणे हे मी कर्तव्य समजतो आपल्या  मार्गदर्शन भाषणांतून श्री. तन्वीर पठाण सरांनी विचार व्यक्त केले. गुरुशिवाय आपण काहीच नाहीत, जीवनाच्या प्रवासात आई वडिलांबरोबर प्रमुख गुरू म्हणून शिक्षक असतात, कुंभार जसा चिखलाला आकार देऊन जसा घडवतो तसा शिक्षक मुलांना चांगले शिक्षण, शिस्त, मार्गदर्शनरुपी आकार देऊन घडवीत असतो , मी जे घडले त्या माझ्या गुरुवर्यामुळे म्हणून त्यांचा हा  वारसा प्रामाणिकपणे पुढे चालवू असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी  आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सर्व शिक्षकांना  शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्या व्यक्त केल्या..   
     हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्वश्री, बहिरमल मॅडम, पवळ मॅडम , नईम पठाण सर,देशमुख मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. भागडे सरांनी केले तर चौधरी मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून सर्व शिक्षक बांधवाना शिक्षक दिनाच्या शुभेच्या व्यक्त केल्या...