आजच्या धावपळीच्या जगात जो तो सतत पळत आहे, या पळण्यामध्ये कुठंतरी स्वार्थ दडलेला आपल्याला दिसतो.. मला आलेला अनुभव खूपच वेदना देतो , ज्या लोकांसाठी आपण मदतीचे, सहकार्याचे काम केले ती माणसे ओळखण्यात मी कमी पडलो, मनात स्वच्छ विचारधारा धरून सुध्दा कमकुवत मनाचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी स्वाभिमान बाजारबूनग्यांच्या दावणीला बांधतात, जमानाच अस वागायला लागला आहे असं बिनदिक्कतपणे ही लोक प्रेम, आपुलकी जिव्हाळा सगळं विसरून आंधल्याची सोंग करतात, अशा लोकांना काय म्हणावे ? मी दुःखी राहिलो की त्यांना आनंद मिळतो मग त्यांना काय फायदा होत असावा? पण दुःख माझ्या वाट्याला येत नाही कारण हजारो संकटे सावरण्याची शक्ती आपल्याला आपल्या माणुसकीच्या वागण्यातून मिळते थोडासा त्रास होतो पण क्षणिक दिवसानंतर तो आपोआप निघून जातो म्हणून माणसातील माणूसपण आपण ओळखले पाहिजे जो ओळखेल तो अयशस्वी कधीच होणार नाही...
No comments:
Post a Comment