Wednesday, 24 January 2018

"स्वार्थ"

 एकदा खूप भरोसा एका व्यक्तीवर ठेवला खूप जीव लावला तळहाताच्या फोडासारखे सांभाळले इतका प्रगल्भ माया मी मित्रावर ठेवून होतो, सत्य, खूप त्रास देते राव आपण ज्याला सोबत घेतो त्याला खूप महत्व येते, लोक माणसे मित्र  तोडण्यासाठी असे मुद्दाम करतात जस की गाडी थांबवण्यासाठी तिला पंपचर करावे तसे लोक एखाद्या माणसाजवळचे लोक बाजूला वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून तोडत असतात , त्या व्यक्तीला ही वाटते आपण खूप मोठे आहोत आशा जोशात राहतात.स्वार्थाच्या बाजारात ही लोक कधी स्वार्थाच्या समुद्रात बुडून जातात ते त्यांनासुद्धा कळत नाही मग कुठेतरी फसल्यानंतर पुन्हा ते परतीच्या प्रवासाला लागतात पण जीवभावाच्या व्यक्तीच्या विश्वासातून मात्र कायमचे  तुटतात...या सर्व प्रवासात त्या लोकांचा स्वार्थ जागा होतो पण विश्वास मात्र टिळभर पण राहत नाही या लोकांवर, या लोकांना वाटते की समोरच्या व्यक्तीला काहीच कळत नाही त्याला एकच सांगावे वाटते शिष्याच्या सगळ्या युक्त्या आधी गुरूला माहिती असतात..
   मी अशा बऱ्याच संधीसाधू स्वार्थी लोक किती खालच्या थराला जातात हे जवळून बघितले आहे या लोकांची माझ्याकडे शून्य किंमत असेल... आयुष्यात अशा लोकांना क्षणभर आनंद मिळतो पण विश्वास मात्र कायमचा तुटतो... म्हणून मी आशा संधीसाधू लोकांपासून थोडं दूर झालोय... स्वार्थी लोकांपासून दूर झालोय कारण यांच्या सावलीखाली जायचे पण नाही असं निश्चित ठरवलं आहे...!

My video