Friday, 3 January 2025

सावित्रीबाई फुले जयंती २०२५

 विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*


बीड- दि.३जानेवारी(बीड प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस विनायक प्राथमिक शाळेत 'बालिका दिन, 'महिला मुक्ति दिन' म्हणून साजरा करण्यात आला.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.यावेळी शाळेतील मुली सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत येऊन लक्ष वेधत होती आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा शाळेचे शिक्षक अशोक काशीद गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील मुला- मुलींनी क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची ओळख भाषणांतून करून दिली.सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक शैक्षणिक योगदानाचे महत्व आपल्या भाषणांतून व्यक्त केले. शाळेतील शिक्षक बाळू काळे सर,श्रीमती भारती क्षीरसागर मॅडम, श्रीमती मंगल क्षीरसागर मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, तन्वीर पठाण सर,मनिषा चौधरी मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,अजीजराजा शेख सरांनी मनोगत व्यक्त केले.

समाजातील अज्ञान,अंधार दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी खुप कष्ठ घेतले.ज्ञानाची,शिक्षणाची ही गंगा मुलींना खुप लाख मोलाची आहे. सावित्रीबाईंच्या विचाराचा,सामाजिक विचारांचा, शैक्षणिक कामाचा हा अनमोल वारसा "आम्ही सावित्रीच्या लेकी पुढे नेऊ, त्यांच्या कर्तव्याचा जागर, स्त्रियांच्या मनामनात करवू,स्वप्न सावित्रीचे साकार करू"  उद्याचा भारत घडवण्यासाठी,प्रगतीसाठी सावित्रीबाईंच्या फुलेंच्या विचाराने प्रभावित होऊन स्व.लोकनेत्या माजी खा.केशरकाकू क्षीरसागरांनी एक महिला म्हणून केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गुणगौरव आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गव्हाणे सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती मोहिते मॅडमनी मानले.




No comments:

Post a Comment