*आभार कसे आणि कुणाचे मानू*
आज छप्पन्न व्या वर्षात पदार्पण करत असताना उमर पचपण की और दिल बचपन का! हे विसरून गेलो, आदल्या दिवशी रात्रीपासून व्हाट्सएप आणि फेसबुकवर शेकडो शुभेच्छा बघितल्या प्रत्येकाला रिप्लाय देणे शक्य होईना,तब्बल अडीच वाजले आणि मग झोपलो,नव्या वर्षाची नवी पहाट उगवली आणि थोडा मोठेपणा असल्याचा उगीचच भास होऊ लागला,आपण छप्पन्न वर्षाचे होणार म्हणलं की,विचारात पडलो,तसा मी कधीच कुठला विचार करत नसतो पण आज आपोआपच आला,सकाळी सकाळी पुन्हा मॅसेज,फोन सुरू झाले,मोबाईल गरम होऊ लागला तरी चालूच होता,अनेक ग्रुपवर माझ्या मित्रांनी,चाहत्यांनी शुभेच्छा चा वर्षाव केला,अनेकांनी मनोगत व्यक्त करत माझ्यातील असलेला माणूस मला दाखवला,मी खरोखरच इतका मोठा असेल का?किंवा आहे का?असे वाटू लागले पण म्हणतात ना वयोमानानुसार माणूस मोठाच होत असतो,आयुष्यात मी माणसे जोडण्याचे काम केले,कधी कुठलीही अधिकची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे काम करत राहणे आणि ज्या ज्या देवावर आपली मनापासून श्रद्धा आहे त्याची भक्ती करत राहिलो त्यामुळे मला खरोखरच कधीही कमी जाणवली नाही,वडील गेल्यानंतर काही वर्षातच मला मा जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली,त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार जे हवे ते काम करत राहिलो आणि अक्षरशः मी देखील त्यांच्याकडून शिकत राहिलो,अत्यंत अभ्यासू आणि चौकस विचारशक्ती काय असते याचा अनुभव येऊ लागला,सुख दुःख कुठलेही असो त्यांच्याशी बोलत राहिलो,एखाद्या मुलाप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिले,वडीलकीच्या नात्याने हक्काने मी पण त्यांना व्यक्त होत राहिलो,माणूस कसा ओळखायचा हे त्यांच्यासारख्या मोठ्याच्या सानिध्यात गेल्यावर कळते,आपल्या माणसाची काळजी कशी घेतात हेही त्यांच्याकडूनच शिकावे असे त्यांचे विचार आत्मसात करत राहिलो,डोक्यावर छप्पर असावे म्हणजे घर असावे हे कुणालाही वाटते ती इच्छा देखील माझी त्यांनीच पूर्ण केली,मोठ्या मुलीचे लग्न,मुलाचे शिक्षण आणि लहान मुलींचेही लग्न होत आहे या सगळ्या प्रक्रियेत मला भक्कमपणे जर कुणी पाठबळ दिले असेल तर ते फक्त आण्णासाहेब यांनीच,आणि आई गेल्यापासून आईच्या भूमिकेत माझी मोठी बहीण आणि सुख दुःखाची सतत चौकशी करणारी लहान बहीण,मुलांची देखरेख कमी जास्त बघायला माझा छोटा भाऊ आहेच,सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्यभर सुख दुःखात समर्थ साथ देणारी माझी अर्धांगिनी या सर्वांच्या मुळे मी आयुष्य आतापर्यंत पूर्ण करू शकलो,जिवाभावाचे मित्र,हक्काचे मित्र आणि कुठल्याही बाबतीत सतत बरोबर असणारे महेश काका सोबत असले की मी कुठल्यातरी एका वेगळ्या विश्वातच राहतो की काय असे वाटते आणि आयुष्याचे एक वर्ष कसे संपते हेही कळत नाही
असेच प्रेम कायम राहो यापुढे माझ्याकडून सतत सत्कार्य घडत राहो
शेवटी एकच म्हणेन की,आहे तोपर्यंत मी नक्कीच प्रामाणिक आहे,जाताना मात्र असे करून जाईल की मी केलेल्या चांगल्या कामाची आठवण पिढ्यानपिढ्या राहील
आपलाच
*प्रशांत सुलाखे*


