*विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
(बीड प्रतिनिधी)- दि. ८ मार्च २०२४ रोजी विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊंच्या व लोकनेत्या स्व.माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व पाहुण्या भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. महिला दिनानिमित्त महिलेच्या अंगी असणाऱ्या भावगुणांना साद कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणांतून वाघमारे प्रतिभा मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. अठरा पगड जातीधर्माच्या , गोरगरीब, मुलांना शिक्षणाची सोय सुविधा निर्माण करणाऱ्या स्व.लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांची दूरदृष्टी महान होती असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक अशोक काशीद सरांनी व्यक्त करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांचे पेठ बीड विभागात आजही स्व. काकूंच्या आदर्शाने व माजी मंत्री जयदत्त अण्णांच्या मार्गदर्शनाने कार्य करत आहेत असे महिला दिनानिमित्त आपल्या विचारांतून मनोगत व्यक्त केले.महिलांना सर्वच जबाबदाऱ्या पार करून पुढे यावे लागते, घरातील सर्वांची काळजी घेणारी, मुलाबाळांच्या अडचणी सोडवणारी महिला आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते सतत ती राब राबते , घरातील प्रत्येक गोष्टीकडे तीचे लक्ष असते. स्व. केशरकाकुंचे कार्य ही बीड जिल्ह्यासाठी महत्वाचे ठरले एक लोकनेत्या खंभीर महिला म्हणून आज ही त्यांचे नाव आदराने घेतले जाते याचा मला अभिमान वाटतो असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर विचारांतून भारतीताई क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करून किर्तीताईंच्या व्यस्त दिनचर्येची स्वलिखित कवितेच्या माध्यमातून कार्य दर्शवले या कवितेने किर्तीताईंना गहिवरून आले.माझ्या जीवनाच्या आधारस्तंभ असणाऱ्या काकूं माझ्या सर्वस्व आहेत. गोरगरीब लोकांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे त्याने उघडली. आज मी जे काही काम करते ते स्व. केशरकाकूंच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून करते त्यांमधून प्रेरणा व ऊर्जा मिळते असे आपल्या अध्यक्षीय समारोपीय भाषणातून सौ. किर्तीताई पांगारकरांनी विचार व्यक्त करून महिलांच्या आजच्या समस्या यांवर प्रकाश टाकून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिवर्षाप्रमाणे या महिला दिनाचे औचित्य साधून वर्षभरामध्ये केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शाळेच्या वतीने २०२३ चा विनायक स्टार पुरस्कार शाळेतील शिक्षिका श्रीमती रिता वाघमारे मॅडमना खास स्मृतिचिन्हासह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अनेक महिला शिक्षकांनी महिलांच्या महतीची विविध गाणी,कविता सादर केल्या.जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.या दिमाखदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बाळू काळे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री.विवेक गव्हाणे सरांनी मानले..