*विनायक शाळेत ७५ वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा*
(बीड प्रतिनिधी)-दि.१७ सप्टेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला.१६ सप्टेंबर सायंकाळी अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेत दिपोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होते १७ सप्टेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सर,शाळेचे पर्यवेक्षक अमरापूरकर सर,प्रा. गाडेकर सर, सिद्धेश्वर सर,सचिन भोज सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महात्मा गांधी,सरदार वल्लभभाई पटेल व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ,गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. या दिनाच्या निमित्ताने विनायक शाळेतील विद्यार्थिनी कु.शेख सिमा अजीज ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातुन प्रथम येऊन वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल विनायक शाळेच्या वतीने विशेष कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने शेख सिमा अजीम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे महत्व विशद केले.मराठवाडा निजामांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ यांचे कार्य खुप महान होते म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सरांनी ही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सरमल सरानी केले तर उपस्थितांचे आभार श्री.शिवलिंग सरांनी मानले.































No comments:
Post a Comment