Thursday, 30 March 2023

स्व. केशरकाकू यांची जयंती ३०मार्च २०२३

 विनायक प्राथमिक शाळेत स्व. केशरकाकूंची जयंती साजरी













 (बीड  प्रतिनिधी)-३०मार्च या रोजी बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत स्व. लोकनेत्या केशरकांकुची जयंती निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते स्व.काकूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मंगल क्षीरसागर मॅडम, भारती क्षीरसागर मॅडम, शैलजा बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,महानंदा मुंडे मॅडम,दिलीप तकीक सर, उत्तरेश्वर भारती सर, प्रतिभा वाघमारे, मनिषा चौधरी मॅडम, अनिल लेहने सर,विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर यांची प्रमुख उपस्थिती राहिली. स्व.केशरकाकूंच्या जीवनकार्याची ओळख आपल्या प्रास्ताविकपर विचारांतून श्री.तन्वीर पठाण सरांनी करून दिली.बीड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकनेत्या म्हणजेच ' केशरकाकूं' आजही सदैव आठवतात असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक श्री.अशोक काशीद सरांनी स्व.केशरकाकूंच्या जीवनावर प्रकाश टाकून वातावरण स्तब्ध केले.शाळेतील शिक्षकांनी स्व.काकूंच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आलेल्या अनुभवातून शब्दबद्ध केले.अलौकीक समाज कार्य करणाऱ्या  'कांकू' माझ्या सर्वस्व गुरू म्हणून पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या.माझ्या आदर्श आहेत. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकरानी भावना व्यक्त करून स्व. काकूंना अभिवादन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.बाळू काळे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार  वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले.

Tuesday, 28 March 2023

बीड स्काऊट गाईड सरचिटणीस पदी किर्तीताई पांगारकर यांची निवड २७ मार्च २०२३














 बीड स्काऊट गाईडच्या जिल्हा सरचिटणीस पदी किर्तीताई पांगारकर यांची निवड

(बीड प्रतिनिधी)  बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेच्या शांत,संयमी स्वभाव गुण असणाऱ्या होतकरु व कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून ओळख असणाऱ्या सौ.किर्तीताई पांगारकर यांची बीड जिल्हा स्काऊट गाईडच्या सरचिटणीस पदी व महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईडच्या कार्यकारीणी सभासद म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव जयदत्त(अण्णा







) क्षीरसागर साहेब,व डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दिपाताई क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू मचाले सर, कार्यवाहक  एम.ए. राऊत सर या सर्वांनी अभिनंदन केले.

Friday, 10 March 2023

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी १० मार्च २०२३








 *विनायक प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी साजरी*

(बीड प्रतिनिधी) दि.१० मार्च रोजी विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथीनिमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शाळेतील अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर, शहेबाज शेख सर,महानंदा मुंडे मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम, मंगल क्षीरसागर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती राहिली.सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्याचा आढावा प्रास्ताविकपर मनोगतातून तन्वीर पठाण सरांनी घेतला. स्त्री शिक्षणासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्री ठरल्या असे मौलिक विचार अशोक काशीद सरांनी आपल्या विचारांतून विद्यार्थ्यांना संबोधित केले.जीवनामध्ये जे अतुलनीय लौकिकास पात्र ठरणारी सावित्री आजही आपल्याला या मुलींमध्ये दिसून येते. अनेक महिला, मुली आज उच्च शिक्षित आहेत, उच्च पदावर  आपल्याला दिसत आहेत यामागे सावित्रीबाईंचे कार्य आहे. म्हणूनच आजची मुलगी सावित्रीबाईंच्या रूपांमध्ये आपले उज्ज्वल यश संपादित करून भारताच्या गौरवात भर टाकत आहे.अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योतिस कोटी कोटी वंदन असे महत्वपूर्ण अध्यक्षीय मनोगत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकरांनी व्यक्त करून सावित्रीबाई फुलेंना भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली.या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची उपस्थिती राहून विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन मनिषा चौधरी मॅडमनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रतिभा वाघमारे मॅडमनी मानले