Tuesday, 31 January 2023

भक्ती स्नेहसंमेलन २८ जानेवारी २०२३






 *ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल च्या भक्तीने सूत्रसंचालन गाजवले*

 (बीड प्रतिनिधी)- दि.२८ जानेवारी

बीड शहरातील नामांकीत अशा ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल मध्ये स्नेहसंमेलन पार पडले . या स्नेहसंमेलनासाठी भारताचे मर्सिडीज बेंझ चे एक्सक्यूटीव्ह डायरेक्टर कुलकर्णी साहेब उपस्थित होते. रंगतदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेकॉर्डब्रेक सादरीकरण या इंग्लिश स्कूल मधील शाळेतील मुला- मुलींनी अतिशय देखणे रंगमंच सादरीकरण केले. भक्ती गव्हाणे या विद्यार्थिनींनी केलेलें सूत्रसंचालन अतिशय आधुनिक व स्मार्ट होते. या कार्यक्रमासाठी भारतीय संस्कृतीचे, बोली भाषेचे उत्कृष्ट म्याजीकल  इंडियाना पार्श्वभूमी घेऊन पारंपरिक नृत्य, बोली भाषेतील नृत्य, विनोदी नृत्य ,फिल्मी गाण्यातील मिक्सिंग गीतांवर नृत्य करून उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली अतिशय देखणे ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलची ग्यादरिंग  व्यवस्थित पार पडली. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ..


Monday, 23 January 2023

जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी २०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*... 

दि-१२ जानेवारी (बीड प्रतिनिधी)- राष्ट्रमाता ,राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस सोहळा व स्वामी विवेकानंद जयंती सोहळा विनायक प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे शैलजा बावस्कर मॅडम,भारती क्षीरसागर मॅडम,वर्षा म्हेत्रे मॅडम,सिमा उदगीरकर मॅडम,दिलीप तकीक सर, उत्तरेश्वर भारती सर,सुनिता चौधरी मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,विवेक गव्हाणे सर, गणेश भागडे सर, शहेबाज शेख सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करून जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.जिजाऊंचे स्फूर्ती गीत गाऊन वंदन करण्यात आले.जिजाऊंच्या जीवन कार्य आदर्श,पराक्रम,स्वाभिमान, कर्तबगारी, विचार, सर्वधर्म समभाव असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आढावा शैलजा बावस्कर मॅडमनी प्रास्ताविकातून घेतला.हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या कार्याने शिवरायांच्या रूपाने प्रत्यक्षात हिंदवी स्वराज्य स्थापन,साकार करून घेणाऱ्या जिजाऊ एक कर्तबगार राजमाता होत्या असे अजिंक्य चांदणे सरांनी आपल्या मनोगतातून जिजाऊंच्या कार्याला गौरविले.आपल्या स्वाभिमानाने कठोरातले कठोर रितशीर निर्णय क्षमता, जिजाऊंच्या आदर्शरूपी, जनतेविषयी असणारी आत्मीयता,भावना आपल्या खास शैलीत अशोक काशीद सरांनी मांडल्या. तन्वीर पठाण सरांनी शिवरायांना घडवणाऱ्या व हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन जनतेच्या मना मनातल्या आदर्श अशा जिजामाता खरोखरच एक महान राष्ट्रमाता होऊन गेल्या असे आपल्या अभ्यास पूर्ण विचारातून जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची सखोल माहिती मनोगतातून व्यक्त केली.  राजमाता जिजाऊ यांच्या नावातच खासियत आहे. शिवरायांच्या आई जिजाऊ धन्य झाल्या,त्यांच्या पोटी शिवबांनी जन्म घेऊन जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न साकारले. शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता होत्या.स्वाभिमान, कर्तबगारीने, सडेतोड निर्णय क्षमता हे गुण त्यांच्या अंगी होते.जनतेला प्रेम, न्याय, जिंव्हाळा,आपुलकी दाखवणाऱ्या जिजाऊं खरोखरच एक रत्न व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात.आजही जिजाऊंच्या कार्याचे अभिमानाने गोडवे गायीले जाते असे त्यांचे महान कार्य आपल्याला प्रेरक, प्रेरणा देणारे उत्साह वाढवणारे आहे.जिजाऊ नसत्या तर नसते घडले शिवराय,नसते स्थापन करता आले हिंदवी स्वराज्य. निजामशाही,आदिलशाही, मुघलशाही उलथवून भारतीय मातृभूमीतून निष्ठेचा बाण निघावा आणि गणिमावर तो अग्नी म्हणून बरसावा असे केव्हढे अलौकिक शौर्य जिजाऊंच.इतिहासाच्या कालपटलावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमठवणाऱ्या एकमेव राजमाता, शिवरायांच्या माता आपणा सर्वांच्या राजमाता जिजाऊंना कोटी कोटी वंदन हे जिजाऊंचे आदर्श, प्रेरणा, विचार सदैव जिवंत ठेवू ,युवकांचे प्रेरणास्थान अभ्यासू स्वामी विवेकानंद यांचे कार्य खूप मोलाचे आहे त्यांचा जन्मदिवस आपण युवक दिन म्हणून साजरा करत आहोत आहे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदनाने करण्यात आली.जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खूप सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन बाळू काळे सरांनी

केले तर आभार श्री.अनिल लेहने सरांनी मानले.







सुभाषचंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारी २०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी*

( बीड प्रतिनिधी) - दि-२३ जानेवारी या रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विनायक प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली.सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर  व  सौ.भारतीताई क्षीरसागर  मॅडम ,महानंदा मुंडे मॅडम, मंगल क्षीरसागर मॅडम,अशोक काशीद सर, तन्वीर पठाण स,शहेबाज शेख सर, सिमा उदगीरकर मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, सुनिता चौधरी मॅडम,संजीवनी पवळ मॅडम ,कविता घोडके मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,अनिल लेहने सर, विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर,अजिंक्य चांदणे सर  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य, देशासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे.त्यांचे आदर्श, विचार,सदैव आठवणीत राहील असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती राहिली.






Wednesday, 4 January 2023

सावित्रीबाई फुले जयंती ३ जानेवारी२०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

बीड- दि.३जानेवारी(बीड प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस विनायक प्राथमिक शाळेत 'बालिका दिन, 'महिला मुक्ति दिन' म्हणून साजरा करण्यात आला.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.यावेळी शाळेतील मुली सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत येऊन लक्ष वेधत होती आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा शाळेचे शिक्षक श्री.विवेक गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील मुला- मुलींनी क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची ओळख भाषणांतून करून दिली.सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक शैक्षणिक योगदानाचे महत्व आपल्या भाषणांतून व्यक्त केले. शाळेतील शिक्षक बाळू काळे सर,महानंदा मुंडे मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम, मनिषा चौधरी मॅडम, वाघमारे मॅडम,अशोक काशीद सर,संजीवनी पवळ मॅडम,अजीजराजा शेख सर, अजिंक्य चांदणे सरांनी

समाजातील अज्ञान,अंधार दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी खुप कष्ठ घेतले.ज्ञानाची,शिक्षणाची ही गंगा मुलींना खुप लाख मोलाची आहे. सावित्रीबाईंच्या विचाराचा,सामाजिक विचारांचा, शैक्षणिक कामाचा हा अनमोल वारसा "आम्ही सावित्रीच्या लेकी पुढे नेऊ, त्यांच्या कर्तव्याचा जागर, स्त्रियांच्या मनामनात करवू,स्वप्न सावित्रीचे साकार करू"  उद्याचा भारत घडवण्यासाठी,प्रगतीसाठी सावित्रीबाईंच्या फुलेंच्या विचाराने प्रभावित होऊन स्व.लोकनेत्या माजी खा.केशरकाकू क्षीरसागरांनी एक महिला म्हणून केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गुणगौरव आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी भावना व्यक्त केल्या व सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची प्रेरणा,शक्ती,ऊर्जा देणाऱ्या स्फूर्ती गीतातून सावित्रीबाई फुलेंना आदरांजली












वाहिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश भागडे सरांनी केले तर आभार तन्वीर पठाण सरांनी  मानले.