Sunday, 1 October 2023

महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री जयंती २ ऑक्टोबर २०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री  यांची जयंती साजरी* 


(बीड प्रतिनिधी)-दि-२ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर मॅडम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा अजीजराजा शेख सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले, भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून श्री.अशोक काशीद सरांनी त्यांचे कार्य व्यक्त केले.गांधीजी हे एक अनमोल रत्न भारतास लाभले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती श्रीमती सिमा उदगीरकर मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत श्रीमती महानंदा मुंडे मॅडमनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले. महात्मा गांधींच्या जीवनातील भारताच्या स्वतंत्र चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहेत त्यांचे कार्य खूप मोठे होते गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लाभले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. गणेश भागडे सर यांनी केले तर आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडमनी मानले.


Saturday, 16 September 2023

मराठवाडा मुक्तीसंग्राम 75 वा अमृत महोत्सव २०२३
































 *विनायक  शाळेत ७५ वा  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा*

  (बीड प्रतिनिधी)-दि.१७ सप्टेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन  अमृत महोत्सव उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला.१६ सप्टेंबर सायंकाळी अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेत दिपोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होते १७ सप्टेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सर,शाळेचे पर्यवेक्षक अमरापूरकर सर,प्रा. गाडेकर सर, सिद्धेश्वर सर,सचिन भोज सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महात्मा गांधी,सरदार वल्लभभाई पटेल व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ,गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमांचे पूजन  करून ध्वजारोहण करण्यात आले. या दिनाच्या निमित्ताने विनायक शाळेतील विद्यार्थिनी कु.शेख सिमा अजीज ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातुन प्रथम येऊन वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल विनायक शाळेच्या वतीने विशेष कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने शेख सिमा अजीम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे महत्व विशद केले.मराठवाडा निजामांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ यांचे कार्य खुप महान होते म्हणूनच भारताच्या  स्वातंत्र्यानंतर मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवळ सरांनी ही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सरमल सरानी केले तर उपस्थितांचे आभार श्री.शिवलिंग सरांनी मानले.

Thursday, 7 September 2023

दहीहंडी ७ सप्टेंबर २०२३

 *विनायक प्राथमिक शाळेतील दहीहंडी*

दि-७ सप्टेंबर (बीड प्रतिनिधी)- विनायक प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सवाचे उद्धघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर व  भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी लहान लहान मुले मुली बाळ गोपाळांच्या वेशभूषेत येऊन सर्वांच्या नजरा आकर्षीत करत होती."गोविंदा आला रे, आला" या गाण्याच्या ठेक्यावर नाचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होती.शाळेतील सर्व शिक्षक या लहान बाळ गोपाळांच्या सुरक्षेसाठी तत्पर होती.शाळेतील महिला शिक्षिका यांनी टिपऱ्या खेळून या दहीहंडी उत्स

































वाला आणखी वातावरण सुंदर करून दहीहंडीचा आनंद वाढवला.शाळेतील सर्व मुलं मुली उत्साहाने या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झाली.याप्रसंगी दहीहंडी फोडणाऱ्या लहान मुलांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी बक्षीस देऊन गौरविले.याप्रसंगी शाळेतील शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर,तन्वीर पठाण सर, उत्तरेश्वर भारती सर,बाळू काळे सर,अनिल लेहने सर, विवेक गव्हाणे सर,वर्षा म्हेत्रे मॅडम,संजीवनी पवळ मॅडम, व सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होऊन या लहान बाळ गोपाळांचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.