Saturday, 23 January 2021

विनायक प्राथमिक शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी




 *विनायक प्राथमिक शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी*

( बीड प्रतिनिधी) - दि-२३ जानेवारी या रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विनायक प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली.सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर , सौ.भारतीताई क्षीरसागर  मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य, देशासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे.त्यांचे आदर्श, विचार,सदैव आठवणीत राहील असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त करून सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती राहिली.




No comments:

Post a Comment