*स्पर्धेने ऊर्जा निर्माण होते,जिंकण्यासाठी जिद्द निर्माण होते-सौ.किर्तीताई पांगारकर*
दि-६ डिसेंबर(बीड प्रतिनिधी)-बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त २ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खुप मोठ्या उत्साहाने या क्रिडा स्पर्धा अटीतटीच्या झाल्या.त्या स्पर्धेचं बक्षीस मिळवण्यासाठी सहभागी प्रत्येक खेळाडू जिद्दीने जिंकेल या वृत्तीने खेळला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित करून मा. जयदत्त (अण्णा)क्षीरसागरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. आपल्या शाळेत वाढदिवसानिमित्त क्रिडा स्पर्धा घेऊन या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक उपक्रम खूप महत्वाचा आहे.स्पर्धेच्या या युगामध्ये स्पर्धा असावी.गुणवत्ता सिद्ध होते, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कला,गुण शाळेत दिसत असतात,ते जोपासणे व त्यांच्यात प्रगती होणे महत्वाचे असते."क्रिडा स्पर्धेमुळे ऊर्जा मिळते,जिंकण्याची जिद्द निर्माण होते",म्हणून या क्रिडा स्पर्धेचे आयोजन आपल्या शाळेत करण्यात आले.असे आपल्या खास शैलीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवर व शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते शालेय क्रिडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले,या वेळी बक्षीस मिळवलेल्या मुला मुलींचा चेहऱ्यावरचा आनंद खुप काही सांगून जात होता.या क्रिडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये क्रिडा स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे खास सूत्रसंचालन तन्वीर पठाण सरांनी केले तर आभार शिवलिंग क्षीरसागर सरांनी मानले.

No comments:
Post a Comment