Saturday, 21 December 2019

विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड२०१९

*विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर*...
दि-१८ डिसेंबर(बीड प्रतिनिधी)-जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठान चा 'यशवंतराव








होळकर' आदर्श शिक्षिका पुरस्कार विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांना जाहीर झाला आहे. बीड शहरातील पेठ बीड भागातील विनायक प्राथमिक शाळेच्या माध्यमातून गरीब,वंचीत मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्व. लोकनेत्या माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी सोय केली आहे,हाच उद्देश,ध्येय पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर कार्य करत आहेत.शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून त्या परिचित आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव वेगवेगळी कल्पक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे तत्परतेने त्यांचे प्रयत्न असतात.सकारात्मक विचारांची शिकवण विदयार्थ्यांना देण्यासाठी बालसंस्कारयुक्त मार्गदर्शन नेहमीच आपल्या मौलिक विचारांतून व्यक्त करत असतात.शाळेचं यश हे शिक्षकांवर अवलंबून असते त्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी आपल्या अनुभव संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहतात.शाळेतील मुलांना मोफत शालेय गणवेश,शाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी सदैव तत्पर राहतात.विविध शैक्षणिक उपक्रम राबवून ज्ञानार्जनाचे पवित्र काम करण्यासाठी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नेहमीच प्रयोगशील राहतात.शाळेतील प्रत्येक मुला मुलींच्या प्रगतीसाठी विविधांगी सहशालेय कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून  बौद्धिक,कला,क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून चालना,प्रेरणा देत असतात.शाळेबरोबर विविध सामाजिक कामात त्या अग्रेसर असतात.अध्यापनामध्ये संस्कारमय, सहज,अभ्यासाची गोडी लावून ती साकारण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणारे अथक प्रयत्न ही सौ.किर्तीताईंच्या कार्याची खरी ओळख आहे.हेच शैक्षणिक कर्तव्याचे साधन यशाचे गमक आहे म्हणून नवनवीन संकल्पना राबवून आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम त्या करत असतात.शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी विविध शिबिरे आयोजित करून मोफत औषधी व साहित्य उपलब्ध करून देतात.विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना संस्कारीत आदर्श व्यक्तिमत्व बनवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.सातत्यपूर्ण विविध शैक्षणिक कार्यक्रमांच आयोजन शाळेमध्ये राबवत असतात.किर्तीताईंच्या या सर्व विविधांगी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन,त्यांचे हे कार्य मार्गदर्शक,प्रेरणादायी आहे,एक आदर्श आहे त्यांचा गौरव म्हणून जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठानने "यशवंतराव होळकर"मानाचा आदर्श शिक्षिका म्हणून सौ.किर्तीताई पांगारकर यांची या महत्वपूर्ण पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Tuesday, 10 December 2019

जयदत्त अण्णा क्षीरसागर वाढदिवस आयोजित क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम

*स्पर्धेने ऊर्जा निर्माण होते,जिंकण्यासाठी जिद्द निर्माण होते-सौ.किर्तीताई पांगारकर*
दि-६ डिसेंबर(बीड प्रतिनिधी)-बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त २ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खुप मोठ्या उत्साहाने या क्रिडा स्पर्धा अटीतटीच्या झाल्या.त्या स्पर्धेचं बक्षीस मिळवण्यासाठी सहभागी प्रत्येक खेळाडू जिद्दीने जिंकेल या वृत्तीने खेळला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित करून मा. जयदत्त (अण्णा)क्षीरसागरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. आपल्या शाळेत  वाढदिवसानिमित्त क्रिडा स्पर्धा घेऊन या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक उपक्रम खूप महत्वाचा आहे.स्पर्धेच्या या युगामध्ये स्पर्धा असावी.गुणवत्ता सिद्ध होते, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कला,गुण शाळेत दिसत असतात,ते जोपासणे व त्यांच्यात प्रगती होणे महत्वाचे असते."क्रिडा स्पर्धेमुळे ऊर्जा मिळते,जिंकण्याची जिद्द निर्माण होते",म्हणून या क्रिडा स्पर्धेचे आयोजन आपल्या शाळेत करण्यात आले.असे आपल्या खास शैलीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवर व शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते शालेय क्रिडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले,या वेळी बक्षीस मिळवलेल्या मुला मुलींचा चेहऱ्यावरचा आनंद खुप काही सांगून जात होता.या क्रिडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये क्रिडा स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे खास सूत्रसंचालन तन्वीर पठाण सरांनी केले तर आभार शिवलिंग क्षीरसागर सरांनी मानले.



Monday, 2 December 2019

विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा

*विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा*
दि-२६नोव्हेंबर(बीड प्रतिनिधी) विनायक प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार,संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेचे शिक्षक अशोक काशीद सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेतील विद्यार्थी वैष्णवी अटपळकर, सय्यद अक्सा,काळे ज्ञानेश्वरी, सोनटक्के श्रेया, प्रभाळे संतोष, मुळेकर श्रीपाद,गवळी राधिका, शेख अजमत, होनमाणे आस्था, माहीन शेख,आफ्रीन कुरेशी या  मुला मुलींनी संविधान दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.शाळेतील शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी भारतीय संविधानाचे विविध पैलू,संकल्पना याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली,तन्वीर पठाण सर, शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर,बाळू काळे सर,प्रतिभा वाघमारे मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,सुनीता चौधरी मॅडम,मनिषा चौधरी मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,उत्तरेश्वर भारती सर,विवेक गव्हाणे सर,गणेश भागडे सर,अमोल पाटोळे सर,अनिल लेहणे सर यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे प्रमुख होते.त्यांच्या अथक परिश्रमाने व अभ्यासाने आपल्याला २६ नोव्हेंबर १९४९ ला राज्यघटना मिळाली म्हणजेच संविधान मिळाले व प्रत्यक्षात ते अंमलात आणले.देशात राष्ट्रीय एकात्मता राहावी,आपले हक्क आपले सरकार ,आपली अभिव्यक्ती चे जतन आपल्याला संविधानाच्या निमित्ताने मिळतात म्हणून संविधान हे आपल्यासाठी, आपल्या देशात एकता, अखंडता राहण्यासाठी महत्वाचे आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.या संविधान दिनाच्या निमित्ताने  वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शाळेतील मुला मुलींनी विशेष सहभाग घेऊन प्राविण्य मिळवले.संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेतील मुला मुलींनी भारताचे संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली व तिचे तंतोतंत पालन करण्याची प्रतिज्ञा केली.
    हा संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार सिमा उदगीरकर मॅडम यांनी मानले..








विनायक प्राथमिक शाळेत मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा आयोजन

*विनायक प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन*...
(बीड प्रतिनिधी)-दि.२ डिसेंबर आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांचा ७ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे या वाढदिवसानिमित्त विनायक प्राथमिक शाळेत २ डिसेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत शालेय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्धघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते.शाळेतील मुलांच्या सुप्त कला,गुणांना वाव मिळावा,त्यांच्यातील उपजत गुण समृद्ध होण्यासाठी मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय स्पर्धा घेऊन एक खुप चांगला उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेची संधी उपलब्ध करून दिली.शालेय स्पर्धेमध्ये वैयक्तिक स्पर्धा धावणे,ऊंच उडी, लांब उडी, लिंबू, चमचा,काव्यगायन,संगीत खुर्ची,कथाकथन,निबंधलेखन,चित्रकला, सांघिक खेळामध्ये खोखो,कब्बडी,प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शाळेतील सर्व मुला मुलींनी या स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळवावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी केले आहे.